Monday, 9 March 2020

MPSC -आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा......

👉आपल्या सभोवती असे खूप लोक असतील जे 4 /5 वर्ष अभ्यास करतात पण अजून त्यांना post निघालेली नसते पण अभ्यास करत आहेत आणि  बाकीचे असतात जे नवीनच mpsc करण्यासाठी आलेले असतात ते त्यांच्याकडे बघून स्वतःला समजवतात की माझ्या जवळ पण अजून 5 वर्ष आहेत....आणि येथेच ते चुकतात..

👉एकदा माणूस comfart zone मध्ये गेला की त्याला बाहेर यायला खूप वेळ लागतो कारण त्याला तो zone खूप आवडतं असतो कारण तिथे त्याला छान वाटत असते...एवढंच आपलं जग आहे असं समजून तो वावरत असतो..त्यामुळे पहिला आपला comfart zone सोडून द्या.....

👉जे 5 /6 वर्ष अभ्यास करतात त्यांनी त्या नवीन लोकांना आपण काय चूका केल्या,ज्या त्या नवीन लोकांनी  करू नये यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे...(काही तरी चुकलेच असेल ना ज्यामुळे 5 /6 वर्ष mpsc करण्यात घालवली?).

👉मार्गदर्शन-mpsc मार्गदर्शन शिवाय अजिबात करता येत नाही,स्वतः करतो म्हंटल तर 1/2 वर्ष  जाते समजायला की mpsc काय आहे??त्यामुळे प्रत्येकास स्वतःचा एक तरी गुरू असावा जो योग्य मार्गदर्शन देईल.नसेल तर चांगला गुरू शोधा.. आज -आता.

👉वेळ- mpsc ला छळणारी सगळ्यात वाईट गोष्ट. येथे वेळ कोणाला पुरतच नाही,किती केला अभ्यास तरी वेळ कमीच पडतो.त्यामुळे वेळेचं बंधन असणे खूप गरजेचं आहे.ज्याला वेळेला जिंकता आलं त्यानं सगळं जिंकलं..

👉ध्येय - मी आता  कोण आहे? मला काय करायचं आहे? मी करू शकेल का?? या प्रश्नांची उत्तरे शोधा मगच अभ्यासला सुरवात करा.जायचं कुठे हेच माहीत नसेल तर कधीच रस्ता सापडणार नाही..असेच भटकत जाणार जिथं कधीं जायचंच नव्हतं...

👉नियोजन- mpsc फिरते नियोजना भोवती,जर नियोजन नसेल तर कोणतीच गोस्ट करता येणार नाही.1 वर्ष/1 महिना/1 आठवडा/1 दिवस या सगळ्यांच नियोजन असंन गरजेचं आहे.सगळेच पाळलं जाईल असा नाही पण ज्यावेळी हे सगळे व्यवस्थित तुमच्या आयुष्यात घडत असेल त्यावेळी तुमचा असलेला हुरूप/आनंद एका वेगळ्याच point ला असेल..

👉स्वतः ला वेळ-   खूप गरजेची गोष्ट...
आठवड्यात एक दिवस संध्याकाळी किमान 2 तास .mobile /tv/family/frnds सगळ्या पासून दूर जाऊन आत्मपरीक्षण करणे गरजेच आहे.काय चुकते ??हा प्रश्न विचारला आणि प्रामाणिक उत्तरे दिली आणि त्यावर उपाय निघाला  तर तुमच्या एवढा आनंदी व्यक्ती कोणीच नसेल..(,नरेंद मोदीजी meditation करततात,एवढा मोठा व्यक्ती स्वतःला एवढ्या व्यापातुन वेळ देत असेल ...तर आपण का नाही?

👉प्रेम- नक्की करा,GF वरच केलं पाहिजे असं नाहीये.जी व्यक्ती तुम्हाला आनंदित पाहण्यासाठी खूप प्रयत्न करत असते त्या व्यक्तीवर करा..सगळ्यांना वेळ द्या पण मर्यादेत.... दुःख सांगून येत नसतात पण स्वतः च्या कृती मुळे दुःख येईल असं काय करू नका...

👉आत्मविश्वास-सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ,जास्त असून पण चालत नाही ,नसून पण चालत नाही... पण पाहिजे नक्की..या गोष्टीमुळे अशक्य गोष्टी सहज होऊ शकतात..confident रहा...

👉जीवन-आयुष्य सुंदर आहे,व्यर्थ नका घालवू .ज्या त्या वयात त्या गोष्टी करा..प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या..मजेत राहा-शांत रहा-आनंदित रहा...यश तुमचंच आहे..

General Knowledge


▪ “RaIDer-X” नावाचे नवीन स्फोटक शोधन यंत्र कुणी तयार केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪ ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ (NPS) जागृती व तक्रार निवारण कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : जम्मू

▪ अकरावी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद 2020’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

▪ ‘ऑफशोअर पेट्रोल व्हसेल-6’ या जहाजाचे कुठे अनावरण झाले?
उत्तर : चेन्नई

▪ ‘राष्ट्रीय तपास संस्था’ कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे?
उत्तर : गृह मंत्रालय

▪ “RAISE 2020” कार्यक्रम कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली

▪ 2020 या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : आय एम जेनेरेशन इक्वलिटी: रियलाईजिंग विमेन्स राइट्स

▪ भारतीय रेल्वेनी कोणत्या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले?
उत्तर : असनसोल स्थानक

▪ "डू यू नो" ट्विटर शृंखला कशाशी संबंधित आहे?
उत्तर : कौटुंबिक निवृत्तीवेतन

▪ कोणत्या संघाने ‘खेलो इंडिया विद्यापीठ खेळ’ यामध्ये पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : बंगळुरू केंद्रीय विद्यापीठ

Current Affairs - 09/03/2020

*खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे/गिरीस्थाने दिली आहेत. त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमामध्ये मांडा.*

A) कळसूबाई, भीमाशंकर, महाबळेश्वर, तारामती 
B) कळसूबाई, तारामती, महाबळेश्वर, भीमाशंकर
C) कळसूबाई, महाबळेश्वर, तारामती, भीमाशंकर ✅✅✅
D) कळसूबाई, महाबळेश्वर, भीमाशंकर, तारामती

*49 व्या राज्यमराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला? *

A) देऊळ 
B) बालगंधर्व 
C) शाळा ✅✅✅
D) जन गण मन

♻️*महाराष्ट्रात आयपॅडवरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते ?*
A) महाराष्ट्र टाईम्स 
B) सकाळ
C) लोकमत
D) लोकसत्ता ✅✅

♻️59 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?*

A) अप्पु कुट्टी
B) गिरीष कुलकर्णी  ✅✅
C) नील दत्त
D) गुरविंदर सिंग

*_______ या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे. *

A) अग्नी-5  ✅✅
B) अंतरिक्ष-2 
C) पृथ्वी-3 
D) अग्नी-2 

*मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना जाहीर केली?*

A) लाडली लक्ष्मी
B) बालिका समृद्धि
C) भाग्य लक्ष्मी
D) सुकन्या ✅✅✅

*खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने 24 मार्च 2012 रोजी महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना डी.लिट. पदवी देउन सन्मानित केले?*

A) अमरावती विद्यापीठ
B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 
C) पुणे विद्यापीठ
D) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ✅✅

*17 वी संयुक्त राष्ट्रांची हवामान परिवर्तन परिषद कोणत्या देशात भरली होती ?*

A) भारत
B) दक्षिण आफ्रिका ✅✅
C) चीन
D) बांग्लादेश

*2009 - 10 मध्ये आयोजित एन.एस.एस.ओ. च्या सर्वेक्षणानुसार इंटरनेट वापरात देशात सर्वात अव्वल स्थानी असलेले राज्य कोणते ? *

A) केरळ
B) हिमाचल प्रदेश 
C) महाराष्ट्र ♻️✅✅
D) हरियाणा

*खालीलपैकी कोणत्या संघटनेला शांतता कार्यासाठीचे नोबेल पारितोषिक तीन वेळा प्रदान करण्यात आले?*

A) आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती  ✅✅
B) जागतिक व्यापार संघटना 
C) युनो
D) यापैकी नाही



1)भारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?
(A) 6 जानेवारी
(B) 7 जानेवारी.  √
(C) 5 जानेवारी
(D) 8 जानेवारी

2)भारतीय रिझर्व्ह बँकेनी 5 मार्च 2020 रोजी कोणत्या बँकेचे व्यवहार एका महिन्यासाठी मर्यादित केले?
(A) येस बँक.  √
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बंधन बँक
(D) AU स्मॉल फायनान्स बँक

3)कोणत्या वर्षी नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने ईशान्य क्षेत्र मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड’ याची स्थापना केली?
(A) 2014
(B) 2015
(C) 2016
(D) 2017.  √

4)‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेच्या “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवालातल्या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?
(A) 81
(B) 83.  √
(C) 84
(D) 80

5)2020 साली 'बेंगळुरू इंडिया नॅनो' या परिषदेची कितवी आवृत्ती संपन्न झाली?
(A) 14 वी
(B) 13 वी
(C) 12 वी
(D) 11 वी.  √

6)भारतीय रेल्वेच्या कोणत्या जुन्या रेलगाडीला नवे रूप दिले जाणार आहे?
(A) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स
(B) लाईफलाईन एक्सप्रेस
(C) डेक्कन क्वीन एक्सप्रेस.  √
(D) द गोल्डन चॅरियट

7)“प्रज्ञान परिषद 2020” याच्या पहिल्या सत्राचा विषय काय होता?
(A) ट्रान्सफॉर्मेशन इन द बॅटल स्पेसेस.  √
(B) ट्रान्सफॉर्मेशन इन द आर्मी
(C) इनोव्हेशन इन द बॅटल स्पेसेस
(D) इनोव्हेशन अँड आर्मी

8)1 एप्रिल 2020 पासून कोणत्या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन होणार?
(A) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि बंधन बँक
(B) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया.  √
(C) आंध्र बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया
(D) आंध्र बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया

9)कोणत्या राज्य सरकारने उच्च शिक्षणासाठी कर्जासाठी हमी देण्याची घोषणा केली आहे?
(A) आंध्रप्रदेश
(B) हरयाणा.  √
(C) छत्तीसगड
(D) उत्तराखंड

10)बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची किरकोळ किंमत मर्यादित करण्याचे आदेश ___ राज्य सरकारने दिले.
(A) आंध्रप्रदेश
(B) केरळ.  √
(C) छत्तीसगड
(D) उत्तराखंड

पोलीस भरती प्रश्नसंच


1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी


1. संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.





उत्तर :- क

2. बीसीजी व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात.

Infra muscular
Sub cutuneous
Intradermal
Inravenous
उत्तर :-Intradermal

3. गोवरची लस बालकाला किती महिन्याला धावयाची असते?

अडीच ते साडेतीन
जन्मल्यानंतर सहाव्या आठवड्याला
18 ते 24 महीने
09 ते 12 महीने
उत्तर :-18 ते 24 महीने

4. केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले.

2004
2005
2006
2007
उत्तर :-2005

5. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

सदाफुली
सिंकोना
तुळस
अडुळसा
उत्तर :-तुळस

6. कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?

लुई पाश्चर
अॅलेक्झांडर फ्लेमिंग
जे.जे. थॉमसन
रेबिज
उत्तर :-लुई पाश्चर

7. जगातील पहिली टेस्ट ट्यूब या ____ जन्मली.

1975
1978
1980
1982
उत्तर :-1978

8. 1 जानेवारी, 2010 ला शुक्रवार होता, तर 1 जानेवारी 2013 ला कोणता वार असेल?

सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
उत्तर :-मंगळवार

9. अमित, स्वप्नील व आनंद यांच्या वयांची बेरीज पाच वर्षापूर्वी 55 वर्षे होती. तर आज त्यांच्या वयांची बेरीज किती?

74 वर्षे
70 वर्षे
72 वर्षे
60 वर्षे
उत्तर :-70 वर्षे

10. 2 वाजण्यास 10 मिनिट कमी असल्यास घड्याळातील तीस व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल?

245
115
254
151
उत्तर :-115

11. जर 343 : 64 तर 1000 : ?

100
131
172
121
उत्तर :-121

12. गटात न बसणारा अंक ओळखा.3, 5, 7, 11, 13, 15

7
11
13
15   
उत्तर :-15

13. पुढे येणारी संख्या कोणती.

9/45
10/50
50/10
10/60
उत्तर :-9/45

14. विसंगत घटक ओळखा.

सतार
वीणा
सरोद
तबला
उत्तर :-तबला

15. ताशी 54 की.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

540 मी.
200 मी.
270 मी.
480 मी.
उत्तर :-200 मी

16. एक व्यवसायात झालेला 7200 रु. नफा A, B व C यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये असेल?

1600 रु.
3200 रु.
2400 रु.
2800 रु.
उत्तर :-2400 रु.

17. पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षा कमी आहे. तर सर्वाधिक लांब काय?

वही
पुस्तक
पेन
पेन्सिल
उत्तर :-पुस्तक

18. My friend called my mother and ____ for lunch.

I
me
my
mine
उत्तर :-me

19. Why don’t you go ____ your friend?

with
by
alongwith
Away
उत्तर :-with

20. Find the correct spelling

Guidance
Guidence
Gaidance 
Gaidence
उत्तर :-Guidance

21. Choose the correct alternative to complete the sentence.

It _____ continuously since eight o clock this morning.

is raining
have rained
has been raining
had been raining
उत्तर :-has been raining

22. Which is the correct meaning of the following. “Industrious”

Hard working
Succeed
Follow
Industrial
उत्तर :-Hard working

23. Choose the correct preposition to fill in the blank. I have been here ____ 1988.

from
since
for
during
उत्तर :-since

24. I don’t belive you. I think you’re ____ lies.

speaking
telling
saying
taiking
उत्तर :-telling

25. A person who does not belive in the existence of God.

King
priest
Atheist
Disciple
उत्तर :-Atheist

1. The old man was suffering from weak hert and needed ____care in hospital.

good

very good

intensive 

medical  

उत्तर :-intensive

2. Don’t stare ____ strangers.

to

it

that

at  

उत्तर :-at

3. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहणारी नदी कोणती?

तापी

नर्मदा

गोदावरी

चंबळ

उत्तर :-नर्मदा

4. कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

पंजाब

राजस्थान

जम्मू काश्मीर

हरियाणा 

उत्तर :-हरियाणा 

5. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण?

अरुणा असफ अली

बचेंद्री पाल

आरती सहा

सरोजिनी नायडू

उत्तर :- बचेंद्री पाल

6. अकोला जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले?

1995

1997

1998

1999 

उत्तर :- 1999

7. विधवा विवाहास पुरस्कृत करणार्या कोणत्या समाजसुधारकाने आपल्या विधवा मुलीच्या विवाहास संमती दिली?

रा.गो. भांडारकर 

महात्मा फुले

विष्णुबुवा ब्रम्हचारी

गो.ग आगरकर

उत्तर :-रा.गो. भांडारकर

8. भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो.

राष्ट्रपती

उपराष्ट्रपती

पंतप्रधान

वरील सर्व

उत्तर :-पंतप्रधान

9. सरपंच व उपसरपंच यांच्यातील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात सभेचे अध्यक्षस्थान ___ भूषवितो.

तहसीलदार 

तलाठी

ग्रामसेवक

गट विकास अधिकारी

उत्तर :-तहसीलदार

10) राज्यसभेचे सदस्य ___ या पद्धतीने निवडलेले जातात.

प्रादेशिक प्रतिनिधित्व

व्यावसायिक प्रतिनिधित्व

अल्पसंख्याक प्रतिनिधित्व

प्रमाणशीर प्रतिनिधित्व  

उत्तर :-प्रमाणशीर प्रतिनिधित्व

11. गीतांजली एक्सप्रेस कोठूण कोठे धावते?

हावडा – मुंबई 

हावडा – चेन्नई

हावडा – गुवाहाटी

मुंबई – नवी दिल्ली

उत्तर :-हावडा – मुंबई

12. रेहेकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

मोर

वाघ

काळवीट

कोल्हा

उत्तर :-काळवीट

13. “त्या दुकानात काय वाटेल ते मिळते” सर्वनामचा प्रकार ओळखा.

प्रश्नार्थक सर्वनाम 

अनिश्चित सर्वनाम

आत्मवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :-प्रश्नार्थक सर्वनाम

14. “बाबांनी शारदेला मारले” वाक्यातील प्रयोग ओळखा?

कर्तरी प्रयोग

भावे प्रयोग

कर्मणी प्रयोग

कर्म – कर्तरी प्रयोग

उत्तर :-भावे प्रयोग

15. ओस या शब्दाचा समानार्थी कोणता?

ओसरी

निर्जन

आकाश

निर्जीव

उत्तर :-निर्जन

16. “कष्ट करणारे” या शब्दसमुहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

कामगार

कष्टकरी

कामकरी

नोकर

उत्तर :-कष्टकरी

17. “महानायक” ह्या कादंबरीचे लेखक कोण?

सुनीता देशपांडे

विश्वास पाटील

बाबा आढाव

द्या पवार

उत्तर :-विश्वास पाटील

18. पुढीलपैकी बरोबर शब्द ओळखा ?

स्वाधीन 

स्वधीन

स्वाधिन

स्वधिन

उत्तर :-स्वाधीन

19. “सतत तेवणारा दिवा” समानार्थीचा शब्द ओळखा.  

दीप

नंदादीप  

समई

दीपज्योत

उत्तर :-नंदादीप

20) “पृथ्वी” समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

धरणी

अवनी

नलिनी 

वसुंधरा

उत्तर :-नलिनी

21) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! अलंकार ओळखा.

अनूप्रास

उपमा

उपमेय

उत्प्रेक्षा

उत्तर :-उपमा

22) काव्यपंक्तीतील “रस” ओळखा ? “आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी”

शृंगार रस

शांत रस

करुण रस

अद्भुत रस

उत्तर :-करुण रस

23) अली म्हणजे

डोंगर

भ्रमर

मकरंद

मधमाशी

उत्तर :-भ्रमर

24) ‘जहाल’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

मवाळ 

शेळपट

भित्रा

निहाल

उत्तर :-मवाळ

25) अर्थ सांगा : वाकडे पाऊल पडणे

वाट चुकणे

सरळ न चालणे

दूर्वर्तन करणे

भलत्याच ठिकाणी पोहचणे

उत्तर :- दूर्वर्तन करणे

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...