२६ फेब्रुवारी २०२०

कलम १४४ म्हणजे काय? संचारबंदी

◾️नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधक आणि समर्थक गटांमध्ये उसळलेल्या दंगली ४८ तासांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही आटोक्यात आणण्यात पोलीस अपयशी ठरले.

◾️ अतिसंवेदनशील बनलेल्या भागांमध्ये कलम १४४ म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली.

◾️मात्र संचारबंदी म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल कायदा काय सांगतो हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे.

🔰कलम १४४ आहे तरी काय? कोण लागू करू शकते हे कलम?

◾️कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम आहे

◾️. हे कलम अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची वा दंगलीची संभावना असेल.

◾️हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.

◾️संचारबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.

◾️ यात वर नमूद अधिकारी फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम १३४ अन्वये नोटीस पाठवून एखाद्या ठरविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध घालण्याचे निर्देश देऊ शकतात.

◾️मात्र यासाठी काही अटी आणि नियम आहेत. अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तींवर किंवा लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांवर सुद्धा बजावली जाऊ शकते.

◾️ कोणत्याही भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ संचारबंदीचा आदेश लागू करता येत नाही.

◾️एखाद्या ठिकाणी दोन महिने संचारबंदी लागू केल्यानंतर ती संपुष्टात आल्यावर पुन्हा नव्याने संचारबंदीचा आदेश काढता येतो.

◾️ पण जर राज्य सरकारला वाटले नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल असे वाटले तर ही संचारबंदी ६ महिन्यांपर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले

​◾️राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.

◾️याबाबतचे विधेयक बुधवारी विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले

◾️ या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना १ लाख रुपयांच्या दंडाची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे.

◾️यानंतर विधानसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

◾️ येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा राज्यभर लागू होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

◾️"सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक विधानपरिषदेत मांडले जाणार असून त्यानंतर ते मराठी भाषा दिनानिमित्त उद्या विधानसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येईल."

◾️त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी भाषेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

➖➖➖

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून विधेयक मंजूर

◾️सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास

📌राज्यपालांनी नकार दिल्यानंतर राज्य सरकारने सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक 
मंजूर केलं आहे.

◾️आज विधानसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून

◾️ त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल झाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शास्त्रीय उपकरणे व वापर

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

1 मार्चपासून या देशात सार्वजनिक वाहतूक सर्वांसाठी मोफत

🔰दिल्लीमध्ये महिलांसाठी सार्वजनिक बसमधून प्रवास करणे मोफत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.

🔰मात्र 1 मार्चपासून एका देशातील सर्व नागरिकांसाठी रेल्वे अथवा बसमधून प्रवास करणे मोफत केले जाणार आहे.

🔰या देशाचे नाव लग्झमबर्ग असून, अशी सुविधा देणारा हा पहिलाच देश आहे.

🔰लग्झमबर्ग हा यूरोपमधील सातवा सर्वात लहान, मात्र श्रींमत देश आहे.

🔰येथे 1 मार्चपासून
👉रेल्वे,
👉ट्राम आणि
👉बसमधून प्रवास करण्यासाठी पैसे घेतले जाणार नाहीत.

🔰देशातील नागरिकांसाठी परिवहनाची सर्व सुविधा मोफत असतील.

🔰केवळ देशातील नागरिकांसाठीच नाही तर परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील ही सेवा मोफत असेल.

🔰वर्ष 2018 मध्ये जेव्हियर बेटल यांनी लग्झमबर्गचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

🔰त्याआधी निवडणूक प्रचारात त्यांनी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याची घोषणा केली होती.

🔰या निर्णयामुळे जवळपास 6 लाख नागरिक, 1,75,000 हजार परदेशी मजूर आणि येथे दरवर्षी येणाऱ्या 12 लाख पर्यटकांना फायदा होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"Current Affairs - 26/02/2020"

1)शास्त्रज्ञांना  या राज्यात एक नवीन प्रकारचा गुहेमध्ये राहणारा मासा सापडला.
(A) मणीपूर
(B) मेघालय✅
(C) मिझोरम
(D) महाराष्ट्र

2)_______ यांनी ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’ सादर केला.

1. जागतिक आरोग्य संघटना (WHO)

2. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)

3. द लॅन्सेट मेडिकल जर्नल

दिलेल्यापैकी अचूक उत्तर निवडा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3)✅✅

3)भारतीय हवाई दलाचे ‘AN-32’ विमानाने भारतात तयार केलेल्या 10 टक्के मिश्रित जैव-जेट इंधनाचा उड्डाणासाठी वापर करून इतिहास रचला. जेट्रोफा झाडांपासून मिळविलेल्या तेलापासून इंधन तयार केले गेले आणि नंतर त्यावर _ येथे प्रक्रिया केली गेली.
(A) CSIR-IIP, देहरादून✅✅
(B) CSIR-IIP, गांधीनगर
(C) CSIR-IIP, दिल्ली
(D) CSIR-IIP, बेंगळुरू

4)‘भारतातले सार्वजनिक ग्रंथालय’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. आतापर्यंत 15 राज्यांनी स्वत:चा सार्वजनिक ग्रंथालय कायदा लागू केला आहे.

2. तामिळनाडू (पूर्वीचा मद्रास) हे सार्वजनिक वाचनालय कायदा लागू करणारे पहिले राज्य होते.

दिलेल्यापैकी अचूक विधान असणारा पर्याय निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)✅✅✅
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

5)राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) मान्यता दिल्यानंतर ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ ‘व्याघ्र प्रकल्प’ बनणार. ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ला _ या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत.
(A) कर्नाटक आणि तामिळनाडू.  √
(B) कर्नाटक आणि केरळ
(C) केरळ आणि तामिळनाडू
(D) कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू

6)पक्के व्याघ्र प्रकल्पातून 629 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प _ या राज्यात आहे.
(A) आसाम
(B) मणीपूर
(C) अरुणाचल प्रदेश🔰🔰🔰🔰
(D) कर्नाटक

7)कोणत्या व्यक्तीने ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2020’ जिंकला?
(A) डॉ. ए. जी. के. गोखले
(B) डॉ. अदिती गोवित्रीकर
(C) डॉ. अनिल अग्रवाल
(D) डॉ. नीती कुमार✅✅✅

8)_________ राज्यात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मकता शिबीर’ आयोजित करण्यात आले.
(A) सिक्किम♻️✅🔰✅✅
(B) मणीपूर
(C) आसाम
(D) त्रिपुरा

9)_______ येथे ‘राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद 2022’ ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार.
(A) चंदीगड✅♻️✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) बंगळुरू

10)22 व्या विधी आयोगाच्या स्थापनेस सरकारने मान्यता दिली. ते _ वर्षाकरीता नियुक्त केले गेले आहे.
(A) 2 वर्ष
(B) 3 वर्ष✅✅
(C) 4 वर्ष
(D) 5 वर्ष

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवड निश्चित

​​

◾️ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर
📌 भाजप आपले ३ तर
📌 महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.

◾️यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपला १-१ उमेदवार देणार आहेत तर उरलेल्या १ जागेवर तिन्ही पक्षांमीळून एक उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

◾️तत्पूर्वी, राज्यसभेच्या एका नियुक्तीसाठी ३७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते

◾️ महाराष्ट्रात सध्या भाजपचे १०५ आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते.

◾️ तर
📌 शिवसेनेचे ५६,
📌राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि
📌 काँग्रेसचे ४४ आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते.

◾️ त्यामुळे महाविकासआघाडीकडून ०४ तर भारतीय जनता पक्षाकडून एकूण ०३ उमेदवार देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

◾️ म्हणजेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण ०७ खासदार नियुक्त होणार आहेत.

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

• मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

• भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

• दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

• फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

• हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.

• चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

• उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

• कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

• नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

दूरसंचार विभागाने 5G हैकथॉन लॉन्च केले

👉डीओटीने 5 जी हॅकाथॉन लॉन्च केले आहे. दूरसंचार विभाग (दूरसंचार विभाग) यांनी शासन, शैक्षणिक आणि उद्योग भागीदारांच्या सहकार्याने हा '5 जी हॅकाथॉन' सुरू केला आहे.

👉हे हॅकाथॉन व्यावहारिक 5G उत्पादने आणि सोल्यूशन्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकते अशा धारदार कल्पनांची यादी करेल. 

👉या कार्यक्रमाचा समारोप यावर्षी 16 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल कॉंग्रेसच्या भव्य समारंभात होईल. विविध टप्प्यातील विजेत्यांमध्ये एकूण अडीच कोटी रुपयांचे बक्षीस असेल.

✅5 जी

👉5 जी वायरलेस संप्रेषण तंत्रज्ञान थर्ड जनरेशन पार्टनरशिप प्रोजेक्ट (3 जीपीपी) वर आधारित आहे. 4 जी एलटीई नंतर मोबाइल नेटवर्क तंत्रज्ञानाचा हा पुढचा टप्पा आहे. 

👉5 जी तंत्रज्ञानामध्ये डाउनलोड आणि अपलोड गती विद्यमान 4 जी नेटवर्कपेक्षा 100 पट वेगवान असेल. यामुळे इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअल्टी (व्हीआर) ची जाहिरात होईल.

👉डिसेंबर 2017 मध्ये 3 जीपीपीने 5 जी रेडिओ मानकांचा पहिला सेट पूर्ण केला. 

👉5 जी च्या वेगामुळे, क्लाउड सिस्टमवरून संगीत सहजपणे प्रवाहित केले जाऊ शकते, ज्यामुळे चालकाशिवाय वाहनावर नेव्हिगेशन डेटा प्रदान करणे सुलभ होते. 

👉कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्जच्या विकासासाठी 5 जीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज

📌देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.

📌याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन व्हावे, यासाठी गुजरात सरकार कामाला लागले आहे.

📌या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे.

📌या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी ट्रम्प हे अहमदाबाद येथून सरळ हेलिकॉप्टरने स्टेडियमवर येतील.

📌उद्घाटनासाठी येणाऱ्या लोकांसाठी २ किमीच्या आत १७ पार्किंग प्लॉट तयार करण्यात आले आहेत.या प्लॉटमध्ये एक हजार बसेस आणि १० हजार चारचाकी उभ्या राहतील. व्हीव्हीआयपींसाठी विशेष ४ पार्किंग प्लॉट असतील. ही सर्व कामे जोरात सुरू आहेत.

🔴प्रचंड सुरक्षा

📌२४-२५ फेब्रुवारी रोजी या स्टेडियमचे उद्घाटन होईल, अशी आशा केली जात आहे.

📌या कार्यक्रमासाठी अहमदाबाद महानगरपालिकेला खास जबाबदारी देण्यात आली आहे.

थाई मागूर माश्यांच्या संवर्धनावर महाराष्ट्रात बंदी


- विदेशी थाई मागूर माशांची संगोपन केंद्रे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक विशेष मोहीम राबविण्यास हाती घेतली आहे.

- थाई मागूर हा मासा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढू शकतो. तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्ध इतर स्थानिक मासे प्रजातींना तो धोकादायक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलनावर व इतर स्थानिक माशांच्या प्रजातीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

- यापूर्वीच, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने थाई मागूर माशांचे संवर्धन करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

- राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार थाई मागूर माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घातण्यात आली आहे. या माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

- आदेशानुसार, थाई मागूर मासे पूर्णत: नष्ट करावेत. तपासणी पथकास थाई मागूर माशांचे संवर्धन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.

▪️ मागुर मासे प्रजाती

- मागुर माश्यामध्ये भारतीय मागुर (Clarias batrachus), थाईमागुर (Clarias gariepinus) व मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) ह्या तीन वायूश्वासी माश्याच्या प्रजाती आहेत.

- त्यापैकी महाराष्ट्रमध्ये भारतीय मागुरला देशी मागुर किंवा गावरान मागुर म्हणतात. भारतातील विविध राज्यामधली ही मूळ प्रजाती आहे. मागुर हा बिहार राज्याचा राष्ट्रीय मासा आहे.

- भारतीय मागुरच्या विशिष्ट चवी व औषधी गुणधर्मामुळे बाजारांमध्ये मोठी मागणी आहे. मागूरमध्ये मुबलक प्रथिने (21%) व जीवनसत्त्व (बी1, बी2, डी) योग्य प्रमाणात आढळते व दुसऱ्या माशांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण खूप कमी असते. मानवी शरीर मागूर मधील प्रथिने सहज पचवू शकते. महिलांना गर्भावस्थेमध्ये या माशाचे सेवन करण्यास वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. या माशाच्या सेवनाने मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

- थाईमागुर (Clarias gariepinus) 1989च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशामधून बेकायदेशीररित्या भारतामध्ये थाई मागुरचा प्रवेश झाला.

-  1997 साली केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मत्स्यपालन विभागातर्फे थाई मागुरवर (Clarias gariepinus) बंदी घालण्यात आली होती. मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) मलेशिया, कंबोडिया, थायलंड व व्हिएतनाम ह्या देशामध्ये आढळतो.
——————————————————

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...