Tuesday, 25 February 2020

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवड निश्चित

​​

◾️ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर
📌 भाजप आपले ३ तर
📌 महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.

◾️यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपला १-१ उमेदवार देणार आहेत तर उरलेल्या १ जागेवर तिन्ही पक्षांमीळून एक उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

◾️तत्पूर्वी, राज्यसभेच्या एका नियुक्तीसाठी ३७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते

◾️ महाराष्ट्रात सध्या भाजपचे १०५ आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते.

◾️ तर
📌 शिवसेनेचे ५६,
📌राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि
📌 काँग्रेसचे ४४ आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते.

◾️ त्यामुळे महाविकासआघाडीकडून ०४ तर भारतीय जनता पक्षाकडून एकूण ०३ उमेदवार देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

◾️ म्हणजेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण ०७ खासदार नियुक्त होणार आहेत.

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

• मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

• बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

• भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

• दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

• फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

• हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.

• चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

• उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

• कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

• नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

दूरसंचार विभागाने 5G हैकथॉन लॉन्च केले

👉डीओटीने 5 जी हॅकाथॉन लॉन्च केले आहे. दूरसंचार विभाग (दूरसंचार विभाग) यांनी शासन, शैक्षणिक आणि उद्योग भागीदारांच्या सहकार्याने हा '5 जी हॅकाथॉन' सुरू केला आहे.

👉हे हॅकाथॉन व्यावहारिक 5G उत्पादने आणि सोल्यूशन्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकते अशा धारदार कल्पनांची यादी करेल. 

👉या कार्यक्रमाचा समारोप यावर्षी 16 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल कॉंग्रेसच्या भव्य समारंभात होईल. विविध टप्प्यातील विजेत्यांमध्ये एकूण अडीच कोटी रुपयांचे बक्षीस असेल.

✅5 जी

👉5 जी वायरलेस संप्रेषण तंत्रज्ञान थर्ड जनरेशन पार्टनरशिप प्रोजेक्ट (3 जीपीपी) वर आधारित आहे. 4 जी एलटीई नंतर मोबाइल नेटवर्क तंत्रज्ञानाचा हा पुढचा टप्पा आहे. 

👉5 जी तंत्रज्ञानामध्ये डाउनलोड आणि अपलोड गती विद्यमान 4 जी नेटवर्कपेक्षा 100 पट वेगवान असेल. यामुळे इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअल्टी (व्हीआर) ची जाहिरात होईल.

👉डिसेंबर 2017 मध्ये 3 जीपीपीने 5 जी रेडिओ मानकांचा पहिला सेट पूर्ण केला. 

👉5 जी च्या वेगामुळे, क्लाउड सिस्टमवरून संगीत सहजपणे प्रवाहित केले जाऊ शकते, ज्यामुळे चालकाशिवाय वाहनावर नेव्हिगेशन डेटा प्रदान करणे सुलभ होते. 

👉कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्जच्या विकासासाठी 5 जीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज

📌देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.

📌याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन व्हावे, यासाठी गुजरात सरकार कामाला लागले आहे.

📌या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे.

📌या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी ट्रम्प हे अहमदाबाद येथून सरळ हेलिकॉप्टरने स्टेडियमवर येतील.

📌उद्घाटनासाठी येणाऱ्या लोकांसाठी २ किमीच्या आत १७ पार्किंग प्लॉट तयार करण्यात आले आहेत.या प्लॉटमध्ये एक हजार बसेस आणि १० हजार चारचाकी उभ्या राहतील. व्हीव्हीआयपींसाठी विशेष ४ पार्किंग प्लॉट असतील. ही सर्व कामे जोरात सुरू आहेत.

🔴प्रचंड सुरक्षा

📌२४-२५ फेब्रुवारी रोजी या स्टेडियमचे उद्घाटन होईल, अशी आशा केली जात आहे.

📌या कार्यक्रमासाठी अहमदाबाद महानगरपालिकेला खास जबाबदारी देण्यात आली आहे.

थाई मागूर माश्यांच्या संवर्धनावर महाराष्ट्रात बंदी


- विदेशी थाई मागूर माशांची संगोपन केंद्रे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक विशेष मोहीम राबविण्यास हाती घेतली आहे.

- थाई मागूर हा मासा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढू शकतो. तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्ध इतर स्थानिक मासे प्रजातींना तो धोकादायक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलनावर व इतर स्थानिक माशांच्या प्रजातीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

- यापूर्वीच, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने थाई मागूर माशांचे संवर्धन करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

- राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार थाई मागूर माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घातण्यात आली आहे. या माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

- आदेशानुसार, थाई मागूर मासे पूर्णत: नष्ट करावेत. तपासणी पथकास थाई मागूर माशांचे संवर्धन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.

▪️ मागुर मासे प्रजाती

- मागुर माश्यामध्ये भारतीय मागुर (Clarias batrachus), थाईमागुर (Clarias gariepinus) व मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) ह्या तीन वायूश्वासी माश्याच्या प्रजाती आहेत.

- त्यापैकी महाराष्ट्रमध्ये भारतीय मागुरला देशी मागुर किंवा गावरान मागुर म्हणतात. भारतातील विविध राज्यामधली ही मूळ प्रजाती आहे. मागुर हा बिहार राज्याचा राष्ट्रीय मासा आहे.

- भारतीय मागुरच्या विशिष्ट चवी व औषधी गुणधर्मामुळे बाजारांमध्ये मोठी मागणी आहे. मागूरमध्ये मुबलक प्रथिने (21%) व जीवनसत्त्व (बी1, बी2, डी) योग्य प्रमाणात आढळते व दुसऱ्या माशांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण खूप कमी असते. मानवी शरीर मागूर मधील प्रथिने सहज पचवू शकते. महिलांना गर्भावस्थेमध्ये या माशाचे सेवन करण्यास वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. या माशाच्या सेवनाने मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

- थाईमागुर (Clarias gariepinus) 1989च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशामधून बेकायदेशीररित्या भारतामध्ये थाई मागुरचा प्रवेश झाला.

-  1997 साली केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मत्स्यपालन विभागातर्फे थाई मागुरवर (Clarias gariepinus) बंदी घालण्यात आली होती. मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) मलेशिया, कंबोडिया, थायलंड व व्हिएतनाम ह्या देशामध्ये आढळतो.
——————————————————

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪ ‘नेचर रँकिंग इंडेक्स 2020’ यामध्ये कोणती संस्था अग्रस्थानी आहे?
उत्तर : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

▪ ‘वर्ल्ड वाइड एज्युकेशन फॉर द फ्यूचर इंडेक्स’ कोणी प्रकाशित केले?
उत्तर : इकनॉमिक इंटेलिजेंस यूनिट

▪ ‘अटल किसान - मजदूर कँटीन’ उघडण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला?
उत्तर : हरयाणा

▪ कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
उत्तर : पी. व्ही. सिंधू

▪ ‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
उत्तर : क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस

▪ कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
उत्तर : तिताबोर

▪ कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
उत्तर : आसाम

▪ नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त कोण आहेत?
उत्तर : संजय कोठारी

▪ कोणते राज्य 20 फेब्रुवारी या दिवशी स्थापना दिवस साजरा करतात?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

▪ कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : भारतीय रेल्वे

अंकगणित प्रश्नसंच

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

SCD, TEF, UGH, ____, WKL

A. CMN    

B. UJI

C. VIJ   

D. IJT

 

2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

B2CD, _____, BCD4, B5CD, BC6D

A. B2C2D    

B. BC3D  

C. B2C3D    

D. BCD7

 

3. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

FAG, GAF, HAI, IAH, ____

A. JAK   

B. HAL

C. HAK    

D. JAI

 

4. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

ELFA, GLHA, ILJA, _____, MLNA

A. OLPA    

B. KLMA

C. LLMA    

D. KLLA

  

5. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

CMM, EOO, GQQ, _____, KUU

A. GRR    

B. GSS

C. ISS   

D. ITT

 

6. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

ZA5, Y4B, XC6, W3D, _____

A. E7V    

B. V2E

C. VE5    

D. VE7  

 

7. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

QPO, NML, KJI, _____, EDC

A. HGF   

B. CAB

C. JKL    

D. GHI

 

8. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

JAK, KBL, LCM, MDN, _____

A. OEP    

B. NEO  

C. MEN    

D. PFQ

 

9. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

BCB, DED, FGF, HIH, ___

A. JKJ   

B. HJH

C. IJI    

D. JHJ

 

10.रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

P5QR, P4QS, P3QT, _____, P1QV

A. PQW    

B. PQV2

C. P2QU   

D. PQ3U

( उत्तरे : Q.1 = C, Q.2 = B, Q.3 = A, Q.4 = D, Q.5 = C, Q.6 = D, Q.7 = A, Q.8 = B, Q.9 = A, Q.10 = C )

चालू घडामोडी प्रश्नसंच

1)‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.

1. भाषिक व सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 2000 पासून दरवर्षी 22 फेब्रुवारी या दिवशी हा दिन पाळतात.

2. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा बांग्लादेशाचा पुढाकार होता.

3. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी वर्ष 2018 ला आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष पाळला.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) केवळ (2).  √
(D) (1), (2) आणि (3)

2)‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिलेल्या खेळांमध्ये प्रतिभावंत खेळाडूंना 8 वर्षांसाठी वर्षाकाठी 8 लक्ष रुपये प्रदान केले जातात.

2. ही एक केंद्रीय योजना असून ती युवा कल्याण व क्रिडा मंत्रालय राबवित आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

3)कचऱ्यामुळे कमी होणार्‍या आकारामुळे सेन्की नदी चर्चेत आहे. ही नदी कोणत्या शहरामधून वाहते?
(A) शिलांग
(B) दिसपूर
(C) इटानगर.  √
(D) इम्फाळ

4)जगातले सर्वात मोठे क्रिडामैदान चर्चेत आहे. त्याचे नाव ____ हे आहे.
(A) सरदार पटेल क्रिडामैदान, मोटेरा, अहमदाबाद.  √
(B) ईडन गार्डन, कोलकाता
(C) मेलबर्न क्रिकेट मैदान
(D) सिडनी क्रिकेट मैदान

5)‘अटल नवकल्पना अभियान’ हा _ यांचा प्रमुख उपक्रम आहे.
(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
(B) NITI आयोग. √
(C) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

6)‘हेराथ महोत्सव’ हा कोणत्या राज्यातला एक महत्वाचा उत्सव आहे?
(A) आसाम
(B) नागालँड
(C) जम्मू व काश्मीर.  √
(D) त्रिपुरा

7)_______ या राज्यात प्रथम ‘भारत-बांगला पर्यटन उत्सव’ आयोजित करण्यात आला.
(A) पश्चिम बंगाल
(B) त्रिपुरा.  √
(C) आसाम
(D) ओडिशा

8)_______ या शहरात तृतीय चित्र भारती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
(A) अहमदाबाद.  √
(B) सुरत
(C) वडोदरा
(D) नवी दिल्ली

9)‘जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक’ हा ___ यांचा प्रकल्प आहे.

1. न्यूक्लियर थ्रेट इनिशीएटीव्ह (NTI)

2. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी (CHS)

3. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU)

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3).  √

10)कोणत्या संस्थेनी ‘थिरुमती कार्ट अॅप’ विकसित केले?
(A) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), गोवा
(B) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), इलाहाबाद
(C) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), त्रिची, तामिळनाडू.  √
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), दिल्ली

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच


1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक

सामान्य विज्ञान वरील प्रश्न :

1. वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

 20 टक्के

 21 टक्के

 40 टक्के

 96 टक्के

उत्तर : 21 टक्के

2. मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?

 15

 13

 12

 14

उत्तर : 14

3. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

 प्लेग

 कॅन्सर

 मलेरिया

 मधुमेह

उत्तर : मलेरिया

4. मानवी शरीरात —– मणके असतात.

 23

 46

 14

 33

उत्तर : 33

5. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

 चीन

 भारत

 अमेरिका

 पॅरिस

उत्तर : पॅरिस

6. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?

 C-DAC

 B-DAC

 C-CAC

 B-BAC

उत्तर : C-DAC

7. भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?

 1950

 1967

 1946

 1956

उत्तर : 1956

8. 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?

 पोखरण

 चेन्नई

 गाझियाबाद

 दिल्ली

उत्तर : पोखरण

9. न्यूटनचा दुसरा नियम —– चे मापन देतो?

 संवेग

 बल

 त्वरण

 घडण

उत्तर : संवेग

10. मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

 आरोग्य

 हवामानशास्त्र

 प्राणीशास्त्र

 मानसशास्त्र

उत्तर : हवामानशास्त्र

11. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे —– एवढे असते?

 4 टक्के

 9 टक्के

 8 टक्के

 12 टक्के

उत्तर : 9 टक्के

12. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?

 अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

 फ्लेमिंग

 लॅडस्टीनर

 कार्ल स्पेन

उत्तर : अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

13. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

 मेलॅनिन

 इन्शुलिन

 यकृत

 कॅल्शियम

उत्तर : इन्शुलिन

14. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

 22

 23

 46

 44

उत्तर : 23

15. मनुष्यास —– डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

 100 डेसिबल्स

 200 डेसिबल्स

 1000 डेसिबल्स

 2000 डेसिबल्स

उत्तर : 100 डेसिबल्स

16. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

 50 टक्के

 60 टक्के

 40 टक्के

 80 टक्के

उत्तर : 60 टक्के

17. मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?

 300

 400

 290

 250

उत्तर : 250

18. मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?

 आठ

 सात

 पाच

 नऊ

उत्तर : आठ

19. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

 यकृत

 हृदय

 लहान मेंदू

 पाय

उत्तर : लहान मेंदू

20. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

 91 टक्के

 81 टक्के

 78 टक्के

 12 टक्के

उत्तर : 91 टक्के

इतिहासावरील प्रश्न :


1. वसईचा तह कोणात झाला?

 टिपू सुलतान – इंग्रज

 दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज

 रघुनाथ पेशवे – इंग्रज

 पेशवे – पोर्तुगीज

उत्तर : दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज

 2. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते?

 आत्माराव तर्खडकर

 रा.गो. भांडारकर

 गो.ग.आगरकर

 न्यायमूर्ती म.गो. रानडे

उत्तर :गो.ग.आगरकर

3. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?

 पीट्स इंडिया

 1935 चा कायदा

 रेग्युलेटिंग अॅक्ट

 रौलेक्ट अॅक्ट

उत्तर :रौलेक्ट अॅक्ट

4. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

 सर वॉरन हेस्टिंग

 लॉर्ड विल्यम बेटींक

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड क्लोईव्ह

उत्तर :लॉर्ड विल्यम बेटींक

5. सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

 लॉर्ड लिटन

 लॉर्ड कर्झन

 लॉर्ड क्लाईव्ह

 लॉर्ड डलहौसी

उत्तर :लॉर्ड डलहौसी

6. —– रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला?

 29 मार्च 1857

 26 मार्च 1857

 28 डिसेंबर 1853

 13 मार्च 1857

उत्तर :29 मार्च 1857

7 —– रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंड करून उठली?

 8 मे 1857

 9 मे 1857

 10 मे 1857

 11 मे 1857

उत्तर :10 मे 1857

8. खालीलपैकी —– येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?

 अलाहाबाद

 दिल्ली

 मद्रास

 अयोध्या

उत्तर :मद्रास

9. काँग्रेसचे 1936 चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?

 फैजपूर

 आवडी

 मद्रास

 रामनगर

उत्तर :फैजपूर

10. चौरी-चौरा घटनेने —– हे आंदोलन संपुष्टात आले?

 रौलट विरोधी सत्याग्रह

 छोडो भारत

 असहकार

 सविनय कायदेभंग

उत्तर : असहकार

11. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

 व्योमेशचंद्र बॅनर्जी

 दादाभाई नौरोजी

 बद्रुद्दीन तैय्यबजी

 महात्मा गांधी

उत्तर :व्योमेशचंद्र बॅनर्जी

12. स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

 रिपन

 लिटन

 डफरीन

 कॉर्नवॉलिस

उत्तर :रिपन

13. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?

 लॉर्ड माऊंटबॅटन

 सी. राजगोपालचारी

 बॅरिस्टर जिना

 सरदार पटेल

उत्तर :लॉर्ड माऊंटबॅटन

14. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?

 महात्मा गांधी

 मंहमद इक्बाल

 खान अब्दुल गफारखान

 मौलाना आझाद

उत्तर :खान अब्दुल गफारखान

15. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?

 मंगल पांडे

 लोकमान्य टिळक

 वीर सावरकर

 गो.कृ.गोखले

उत्तर :लोकमान्य टिळक

16. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

 रवींद्रनाथ टागोर

 लाला लजपतराय

 लाला हरदयाळ

 महात्मा गांधी

उत्तर :रवींद्रनाथ टागोर

17. सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?

 लॉर्ड कॅनिंग

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेंटिक

 लॉर्ड रिपन

उत्तर :लॉर्ड कॅनिंग

18. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकार्‍याने पुढाकार घेतला?

 लॉर्ड रिपन

 अॅलन ह्युम

 लॉर्ड डफरिन

 लॉर्ड कर्झन

उत्तर :अॅलन ह्युम

19. 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली?

 लॉर्ड कर्झन

 लॉर्ड मिंटो

 लॉर्ड चेम्सफोर्ड

 पंचम जॉर्ज

उत्तर :लॉर्ड कर्झन

20. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?

 1905

 1906

 1907

 1908 

उत्तर : 1906

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...