२३ फेब्रुवारी २०२०

भारतातील पहिल्या महिला...

भारतीय महिलांचा इतिहास पायदळांपेक्षा मोठा आहे, ज्यांनी कठोर परिश्रम घेत राजकारण, कला, विज्ञान, कायदा इत्यादी क्षेत्रात प्रगती केली आहे.

आपण पाहूया प्रत्येक क्षेत्रातील प्रथम स्त्री चे योगदान.

१) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी

२) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : श्रीमती प्रतिभा पाटील

३) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती : श्रीमती मीरा कुमारी

४) भारतात परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर : डॉ. आनंदीबाई जोशी

५) भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष : अॅनी बेझंट (१९१७)

६) भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष : सरोजिनी नायडू (१९२५)

७) पहिली महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू

८) पहिली महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी ( १९६३-६७, उत्तर प्रदेश)

९) पहिली महिला बॅरिस्टर : कार्नेलीया सोराबजी

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
__ हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

♻️♻️
‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)🔰✅✅

♻️♻️
_______ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

♻️♻️
________ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग🔰✅✅✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

🔰🔰
कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅👍✅✅✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

🔰🔰♻️
_____ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली🔰✅✅👍
(D) लखनऊ

✅🔰♻️
कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र🔰✅✅👍

🔰♻️
_________ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर🔰🔰✅✅
(D) महेंद्र सिंग धोनी

♻️♻️👍
विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र👍✅✅✅✅✅

✅🔰♻️
फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)🔰✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

🔰🔰
_____ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

General Knowledge

▪ ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी कोणत्या मार्गावर धावणार?
उत्तर : वाराणसी-इंदौर

▪ ‘फिरते मधमाशा पालनगृह’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे?
उत्तर : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

▪ ‘भारतीय नौदल अकादमी’ कुठे आहे?
उत्तर : केरळ

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणती व्यक्ती पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या ‘संरक्षण व अंतर्गत सुरक्षा गट’चे अध्यक्ष आहे?
उत्तर : एन. के. सिंग

▪ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?
उत्तर : मुंबई

▪ ‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय कुठे आहे?
उत्तर : देहरादून

▪ कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪ 'जागतिक युनानी दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : हकीम अजमल खान

▪ ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय हिवाळी खेळांचे आयोजन कुठे केले जाणार आहे?
उत्तर : गुलमर्ग
---------------------------------------------------

नसबंदीचं कर्मचाऱ्यांना टार्गेट, कमलनाथ सरकारचा अजब निर्णय.

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने पुरुष बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवा आद्यादेश जारी केला आहे. २०१९-२० या वर्षात जर कमीत कमी एकाची नसबंदी करण्यात अपयश आल्यास त्याचं वेतन कपात केलं जाईल, असा आदेश कमलनाथ सरकारनं जारी केला आहे.

काही प्रसारमाध्यांच्या वृत्तानुसार, नसबंदीसंबंधी दिलेलं टार्गेट पुर्ण न केल्यास त्या कर्मचाऱ्याला सक्तीची निवृत्ती दिली जाईल. या आद्यादेशामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार मध्य प्रदेशातील ०.५ टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे.

राष्ट्रीय कुटुंब नियोजनाच्या सर्वेक्षण अहवाल पुढे करत राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ने जिल्हाधिकारी, मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना झिरो वर्क आऊटपूट देणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिलेत. काम नाही, तर पगारही नाही, या तत्तावर काम करावं, असे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच पुरुष कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत नसबंदीसाठी लक्ष्य देण्यात यावं, असंही यामध्ये म्हटलेय.

१०१ पक्षी प्रजातींच्या संवर्धनाची गरज.

मुंबई, नागपूर: ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार शिकारी, समुद्र किनाऱ्यावरील स्थलांतरित आणि पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात गरुड आणि गिधाडांच्या संख्येत घट झाली असून, मोरांच्या संख्येत नाटय़मयरीत्या वाढ झाली आहे.

देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला.

यामध्ये देशभरातील सुमारे ८६७ पक्ष्यांच्या सद्य:स्थितीचा मागोवा घेण्यात आला. गेल्या २५ वर्षांतील निरीक्षणांचा यामध्ये समावेश आहे. ‘ई-बर्ड’ या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्यात आली आहे. हा अहवाल गांधीनगर येथे स्थलांतरित पक्षी परिषदेत सोमवारी प्रकाशित करण्यात आला.

शिकारी पक्षी, स्थलांतरित पाणपक्षी आणि अधिवासनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे या अभ्यासातून दिसून येते. तसेच कीटकभक्षी पक्ष्यांची संख्या कमी होणे हेदेखील धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

त्याचबरोबर १२६ प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण स्थिर अथवा वाढत असल्याचे यामध्ये आढळून आले. मात्र गेल्या पाच वर्षांत पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९ टक्के घट झाल्याचे दिसून येते ही धोक्याची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आयर्लंडचे पंतप्रधान वराडकर यांचा राजीनामा

-  आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वराडकर यांच्या फाईन गेईल पक्षाची पीछेहाट झाली. त्यामुळे ते पंतप्रधान पदावरून पायउतार झाले.

- आयर्लंडमध्ये नुकतीच निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. फेरनिवडीसाठी वराडकर खासदारांचे आवश्‍यक संख्याबळ पाठिशी उभे करू शकले नाहीत. आता नवे सरकार स्थापन होईपर्यंत 41 वर्षीय वराडकर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळतील.

-  त्यांनी 2017 मध्ये सुत्रे स्वीकारली त्यावेळी ते आयर्लंडचे सर्वांत तरूण पंतप्रधान ठरले. वराडकर यांचे पूर्वज मूळचे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. काही महिन्यांपूर्वी केलेल्या भारत दौऱ्यात त्यांनी आवर्जून मूळगावाला भेट दिली होती
————————————————--

तान्हाजी’ने जागतिक स्तरावर नोंदवला नवा विक्रम.

अजय देवगणचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सहाव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर तळ ठोकून आहे. काही राज्यांत टॅक्स फ्री असल्याने ‘तान्हाजी’ची कमाई सुरु आहे.

भारतीय सिनेप्रेमींना ‘तान्हाजी’ने वेड लावलेच. पण आता तर जागतिक स्तरावरही ‘तान्हाजी’ने नवा विक्रम केला आहे.

तसेच या सिनेमाने 41 दिवसांत जगभरात तब्बल 347 कोटींचा बिझनेस केला आहे. या कमाईसोबत ‘तान्हाजी’ जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 16 वा सिनेमा ठरला.

संजय कोठारी: केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC)

राष्ट्रपतींचे सचिव असलेले संजय कोठारी ह्यांची नवे केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती शरद कुमार ह्यांच्या जागेवर झाली.

या नियुक्तीव्यतिरिक्त केंद्रीय माहिती आयुक्त (CIC) पदावर वर्तमानात माहिती आयुक्तपदी कार्यरत असलेले बिमल जुल्का ह्यांचीही निवड केली गेली आहे.

केंद्रीय दक्षता आयोग...

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission) ही एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी केंद्र सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी 11 फेब्रुवारी 1964 रोजी स्थापन करण्यात आली. 2003 साली आयोगाला वैधानिक दर्जा बहाल केला. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि जास्तीतजास्त दोन दक्षता आयुक्त असतात.

पीकविमा योजना आता ऐच्छिक ; मंत्रिमंडळ निर्णय

◾️केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना पीकविमा योजना ऐच्छिक केली आहे.

◾️कृषी कर्जावरील व्याजदरात केंद्राकडून दिली जाणारी सूट २ टक्‍क्‍यांवरून २.५ टक्के करण्यात आली आहे.

◾️ याचा फायदा ९५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. दरम्यान, ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजनेचा ९० टक्के प्रीमियम केंद्र सरकार देईल.  

 ◾️वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पीकविमा योजनेतील बदलाला मंजुरी दिली.

◾️आता ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असेल.

◾️ पिकांचा विमा काढायचा की नाही, याचा निर्णय शेतकरी स्वतः करू शकेल.

◾️ सरकारने दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ४,५८८ कोटी रुपयांच्या डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधी योजनेला मंजुरी दिली.

◾️ ही योजना धवलक्रांतीला नवा आयाम जोडणारी असेल. यामध्ये ९५ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...