Sunday, 23 February 2020

आता मतदार कार्डलाही जोडणार ‘आधार’

🔰मतदार ओळखपत्रास आधार कार्डशी जोडणी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास कायदा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

🔰यासाठी आता सरकारकडून निवडणूक आयोगास कायदेशीर अधिकार मिळणार आहेत. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डशी जोडणी केल्यानंतर बोगस मतदारांना रोखता येणार आहे. याचबरोबर प्रवाशी मतदारांना रिमोट वोटिंगचा अधिकार देणेही सोपे होणार आहे.

🔰बोगस मतदानाला आळा घालून ‘एक व्यक्ती एक मत’ योग्यरित्या राबवायचे असेल तर मतदार कार्ड आधारला जोडणे आवश्यक असल्याची मागणी आयोगाकडून अनेक वर्षांपासून केली जात होती.

🔰पेड न्यूज व चुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासह निवडणूक सुधारणा या सारख्या मुद्यांवरही आयोगाची कायदा मंत्रालयाबरोबर बैठक झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्रालयाचे सचिव जी नारायण राजू यांच्या ही बैठक पार पडली.

कृषी अधिकारी म्हणून मुलींची लक्षणीय संख्येत निवड

🔰वर्धा : महिलांसाठी लांबच्या समजल्या जाणाऱ्या कृषी खात्यात प्रथमच लक्षणीय संख्येत कृषी अधिकारी म्हणून मुलींची निवड झाली आहे.

🔰महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कृषी सेवा गट?ब अंतर्गत ८३ उमेदवारांची शिफारस कृषी खात्याकडे केली आहे. यापैकी जवळपास एक तृतियांश महिला असून परिविक्षाधीन कालावधीसाठी कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती प्रस्तावित आहे. शिक्षणात वैद्यकीय व अभियांत्रिकीपाठोपाठ कृषी शिक्षणास प्राधान्य मिळत असल्याचे कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी चाललेल्या चढाओढीतून दिसून येते. कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी  आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांमुळे आगामी काळात कृषी खात्याची सूत्रे महिलांकडे जाण्याची चिन्हे आहेत.

🔰निवडप्राप्त सर्व महिलांना एक महिन्याच्या आत रूजू व्हायचे आहे. महिला आरक्षित पदावर शिफारस झालेल्या महिला उमेदवारांच्या प्रमाणपत्राची तपासणी महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येणार आहे. नेमणूक झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमास हजेरी लावणे अनिवार्य आहे.

🔰कृषी विभागातील ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यासंदर्भात म्हणाल्या, कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती स्वागतार्ह आहे. निवड झालेल्या ९० टक्के महिला या शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीविषयक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्या अधिक तत्परतेने सोडवण्याची अपेक्षा आहे.

संजय कोठारी: केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC)

🔰राष्ट्रपतींचे सचिव असलेले संजय कोठारी ह्यांची नवे केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती शरद कुमार ह्यांच्या जागेवर झाली.

🔰या नियुक्तीव्यतिरिक्त केंद्रीय माहिती आयुक्त (CIC) पदावर वर्तमानात माहिती आयुक्तपदी कार्यरत असलेले बिमल जुल्का ह्यांचीही निवड केली गेली आहे.

🔴केंद्रीय दक्षता आयोग...

🔰केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission) ही एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी केंद्र सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी 11 फेब्रुवारी 1964 रोजी स्थापन करण्यात आली. 2003 साली आयोगाला वैधानिक दर्जा बहाल केला. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि जास्तीतजास्त दोन दक्षता आयुक्त असतात.

भारतातील ११ विद्यापीठांचा समावेश

- लंडनविकसनशील देशांमधील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांनी चांगली कामगिरी केली असून, विकसनशील देशांतील पहिल्या १००

- विकसनशील देशांमधील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांनी चांगली कामगिरी केली असून, विकसनशील देशांतील पहिल्या १०० विद्यापीठांत भारतातील ११ विद्यापीठांचा समावेश आहे. 'टाइम्स हायर एज्युकेशन (टीएचई) इमर्जिंग इकॉनॉमिज युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२०'मध्ये या विद्यापीठांचा समावेश झाला आहे.

- जगातील एकूण ४७ देशांमधील विद्यापीठांचा या यादीत समावेश आहे. पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये भारतापेक्षा केवळ चीनची विद्यापीठे अधिक असून, त्यांची संख्या ३० इतकी आहे. मंगळवारी सायंकाळी लंडन येथे हे रँकिंग जाहीर करण्यात आले.

- विकसशील देशांतील विद्यापीठांच्या पूर्ण रँकिंगमध्ये ५५३ विद्यापीठांत भारतातील ५६ विद्यापीठांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) ही भारतीय संस्था यादीत १६व्या स्थानी आहे, तर इंडिय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) ही संस्था त्यानंतरच्या क्रमांकावर आहे.

- 'जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या यशाबद्दल दीर्घकाळापासून चर्चा होत आली आहे, तसेच जागतिक पातळीवर भारतीय विद्यापीठांची कामगिरी कमी राहिलेली आहे,' असे 'टीएचई'चे चीफ नॉलेज ऑफिसर फिल बॅटी म्हणाले. 'इमर्जिंग इकॉनॉमिज युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२०'मध्ये विविध संस्थांनी केलेली प्रगती दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.

- भारत सरकारने २०१७मध्ये इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स स्कीम सुरू केली. त्यामध्ये सहभागी झालेल्या अमृता विश्वविद्यापीठमने या यादीतील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. २०१९मध्ये हे विद्यापीठ १४१व्या स्थानी होते. यंदा या विद्यापीठाचे स्थान ५१ वे आहे, असेही 'टीएचई'ने म्हटले आहे. इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स स्कीम योजनेतील विद्यापीठांपैकी आयआयटी खरगपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास यांचाही या यादीत समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रोपर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी या संस्थांचा पहिल्या १०० विद्यापीठांत प्रथमच समावेश झाला आहे.
————————————————

पीएम किसान योजनेत बदल : पीक विमा करायचा की नाही आता शेतकरी ठरवणार

🌅 केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

🌅 तर याचबरोबर पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना या बद्दल माहिती दिली.

🌅 तसेच मंत्रिमंडळाने 22 व्या कायदा आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. ज्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली.

🌅 हा आयोग सरकारला कायदेशीर प्रश्नांबाबत सल्ला देण्याचे काम करणार आहे.

🌅 कायदा आयोगाचा कार्यकाळ यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कायदा मंत्रालय आता नवीन आयोगासाठी अधिसूचना जारी करणार आहे.

🌅 नव्या आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.

भारतातील पहिल्या महिला...

भारतीय महिलांचा इतिहास पायदळांपेक्षा मोठा आहे, ज्यांनी कठोर परिश्रम घेत राजकारण, कला, विज्ञान, कायदा इत्यादी क्षेत्रात प्रगती केली आहे.

आपण पाहूया प्रत्येक क्षेत्रातील प्रथम स्त्री चे योगदान.

१) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी

२) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : श्रीमती प्रतिभा पाटील

३) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती : श्रीमती मीरा कुमारी

४) भारतात परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर : डॉ. आनंदीबाई जोशी

५) भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष : अॅनी बेझंट (१९१७)

६) भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष : सरोजिनी नायडू (१९२५)

७) पहिली महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू

८) पहिली महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी ( १९६३-६७, उत्तर प्रदेश)

९) पहिली महिला बॅरिस्टर : कार्नेलीया सोराबजी

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
__ हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

♻️♻️
‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)🔰✅✅

♻️♻️
_______ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

♻️♻️
________ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग🔰✅✅✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

🔰🔰
कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅👍✅✅✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

🔰🔰♻️
_____ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली🔰✅✅👍
(D) लखनऊ

✅🔰♻️
कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र🔰✅✅👍

🔰♻️
_________ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर🔰🔰✅✅
(D) महेंद्र सिंग धोनी

♻️♻️👍
विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र👍✅✅✅✅✅

✅🔰♻️
फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)🔰✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

🔰🔰
_____ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...