Friday, 21 February 2020

केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धात भारताच्या कोनेरू हम्पीला विजेतेपद


🌅 जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे डिसेंबरमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कोनेरू हम्पीने केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धाजिंकली.

🌅 तसेच याबरोबरच दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद हम्पीला तिच्या नावे करता आले. हम्पीला त्यामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवता आला. कारण तिच्या खात्यात पाच गुणांची भर पडली.

🌅 तर स्पर्धेत अखेरच्या म्हणजेच नवव्या फेरीत हम्पीने भारताच्या द्रोणावल्ली हरिकाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. परिणामी, सहा गुणांसह हम्पीने केर्न्‍स चषकावर नाव कोरले.

🌅 याच स्पर्धेत विजेतेपदाची आणखी एक दावेदार विश्वविजेती वेंजून जू हिला 5.5. गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. वेंजून जू हिने रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकविरुद्ध विजय मिळवला.

🌅 कोस्टेनियूकला स्पर्धेत चौथे स्थान मिळाले. भारताच्या हरिकाला 4.5 गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

थल सेना भवनची संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी.

🌅 दिल्ली छावणीत उभारल्या जाणा-या थल सेना भवन, अर्थात लष्कराच्या नव्या मुख्यालय इमारतीची पायाभरणी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाली.

🌅 माणेकशॉ केंद्राजवळ एकोणचाळीस एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर हे मुख्यालय उभारलं जात आहे.

🌅 या बहुमजली इमारतीत सहा हजार कर्मचा-यांची राहण्याची सोय होईल, तसंच लष्कराची सर्व कार्यालयं याच संकुलात असतील. नव्यानं तयार केलेल्या संरक्षण दल प्रमुखांचं कार्यालयही तिथच असेल. 

🌅 येत्या पाच वर्षात हे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाहनांमुळे होणा-या वायू प्रदूषणाची समस्या दूर करण्यातही या नव्या संकुलाची मदत होईल, असं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं. 

🌅 सशस्त्र दलांच्या जवानांचं शौर्य आणि बलिदानामुळे भारत हा एक समर्थ देश म्हणून पुढं आला आहे, असंही ते म्हणाले.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...