१५ फेब्रुवारी २०२०

भारत-अमेरिका व्यापार कराराचे ट्रम्प यांचे संकेत.

♾वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ व २५ फेब्रुवारीला भारतात येत असून त्यांनी या दौऱ्याबाबत आशावादी असल्याचे सांगून दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील असे सूचित केले आहे.

♾पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत असून ते गुजरातमधील अहमदाबाद येथे थांबणार आहेत. मोदी व ट्रम्प यांची संयुक्त सभा (मेळावा)  तेथील स्टेडियमवर होणार आहे.

♾ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात वार्ताहरांना सांगितले की,‘ मोदी हे सभ्यगृहस्थ आहेत, भारत दौऱ्याकडे आपण आशावादी दृष्टिकोनातून पाहात आहोत.

♾ महिनाअखेरीस हा दौरा होणार आहे.’ व्हाइट हाऊ सने त्यांच्या दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्यानंतर ते बोलत होते.

♾एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तो व्यापार करार योग्य असेल तरच मान्य केला जाईल.

♾भारत काहीतरी करू इच्छित आहे, त्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत जर योग्य असा व्यापार करार होणार असेल तर त्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.’

♾अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी सांगितले की, ‘ट्रम्प व मोदी यांच्यात व्यक्तिगत संपर्क चांगला आहे. त्यातूनच ट्रम्प यांची भारतभेट घडून येत आहे. अमेरिकेला भारताबरोबरचे संबंध एका नव्या उंचीवर नेण्याची इच्छा आहे हे यातून सूचित होते आहे.’

२९ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पाच दिवसांचा आठवडा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय


- राज्य सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलंय. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 5 दिवसाचा आठवडा करण्याची केलली मागणी महाविकास आघाडी सरकारने मान्य केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ही बातमी असून त्यांचा विकेंड मजेत जाणार आहे.

- सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पाच दिवसांचा आठवडा करण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार, दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी गेल्या मंगळवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. त्यानंतर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

- राज्यात पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात लवकरात लवकर प्रशासनाने आपल्याकडे प्रस्ताव पाठवावा, अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

▪️ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळातील निर्णय

1. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 5 दिवसांचा आठवडा. 29 फेब्रुवारीपासून

2. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता " "बहुजन कल्याण विभाग"

3. बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. 2 कोटींची तरतूद

4.राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अहमदाबादच्या स्टेडियमवर ‘केम छो ट्रम्प’ मेळाव्याचे आयोजन.

● अहमदाबाद : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबाद येथे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्यांचा मोठा रोड शो होणार आहे.

● साबरमती आश्रमाची सफर त्यांना घडवली जाणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन ते पंतप्रधान मोदी यांच्या समवेत करणार आहेत. याच स्टेडियमवर ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ मेळाव्याच्या धर्तीवर ‘केम छो ट्रम्प’ मेळावा (हाउडी ट्रम्प) घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास लाखो लोकांची उपस्थिती राहणार आहे.

● २४ फेब्रुवारीला ट्रम्प हे अहमदाबादला येणार असून मोदी त्यांच्या राज्यात अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचा खास पाहुणचार करणार आहेत. अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम या दहा कि.मीच्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा रोडशो होणार असून यावेळी लाखो भारतीय दुतर्फा त्यांच्या स्वागतास सज्ज असतील.

गगनयान मोहिमेतील चौघांचे रशियात प्रशिक्षण सुरू

🔰भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत प्राथमिक निवड करण्यात आलेल्या चार उमेदवारांचे प्रशिक्षण रशियातील मॉस्को येथे असलेल्या गागारिन संशोधन व अवकाशवीर प्रशिक्षण केंद्रात (जीसीटीसी) सुरू झाले आहे.
भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड यात अवकाशवारीसाठी करण्यात आली आहे.

🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था 2022 मध्ये गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीयांना अवकाशात पाठवणार आहे.
तर या मोहिमेत एकूण तीनजणांना सात दिवस अवकाशवारीची संधी मिळणार असून गगनयान मोहिमेचा खर्च 10 हजार कोटींच्या घरात आहे.

🔰पृथ्वीपासून 300-400 कि.मी.च्या कक्षेत हे अवकाशवीर यानातून फिरणार आहेत.तसेच या प्रशिक्षणासाठी ग्लावकॉसमॉस, जेएससी व इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र यांच्यात करार झाला आहे. हे प्रशिक्षण बारा महिन्यांचे असून त्यात र्सवकष बाबींचा समावेश आहे. जैववैद्यकीय प्रशिक्षण यात महत्त्वाचे असून त्याबरोबरच अवकाशातील शारीरिक हालचालींचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

🔰तसेच सोयूझ या माणसाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या अवकाशयानातील यंत्रणांची माहिती त्यांना करून देण्यात येईल. वजनरहित अवस्थेत राहण्यासाठी त्यांना खास विमानाने नेऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे. अवकाशयानाचे अवतरण दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने झाले तर काय कृती करायची हेही संभाव्य अवकाशवीरांना शिकवले जाणार आहे.
मानवी अवकाश मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र व ग्लावकॉसमॉस यांच्यात 27 जून 2018 रोजी करार झाला होता.

बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी

👉भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.

👉GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार, अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण.

👉यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद.

👉मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ.

👉सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे.

✅भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी

२०१९: ३६ व्या क्रमांकावर
२०१८: ४४ व्या क्रमांकावर
२०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई

✅जग क्रमवारी

1.अमेरिका
2.यूके
3.स्वीडन
4.फ्रान्स
5.जर्मनी
6.आयर्लंड

👉भारतीय पेटंट कायदा, २००५
कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा
हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात.
👉कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट.

👉तृतीय पक्षाला परवाना बंधनकारक
विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य

Oscars 2020


◾️92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर)हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

◾️.दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला.

◾️ यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला

◾️. या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.

🏆सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रेनी झेल्वेगरला (Judy)

🏆सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)

🏆सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - बाँग जून हो यांना (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - जोकर

🏆सर्वोत्कृष्ट मूळ गीत - 'आय एम गॉन अ लव्ह मी अगेन' (रॉकेटमॅन)

🏆सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - बॉम्बशेल

🏆सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फोर्ड व्हर्सेस फेरारी

🏆सर्वोत्कृष्ट छायांकन - रॉजर डेकिन्स (१९१७)

🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - १९१७

🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन  - फोर्ड व्हर्सेस फेरारी

🏆सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)

🏆सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)

🏆सर्वोत्कृष्ट माहितीपट - अमेरिकन फॅक्टरी

🏆सर्वोत्कृष्ट वेशभूषा - जॅकलिन दुरान (लिटील वूमन)

🏆सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड

🏆सर्वोत्कृष्ट 'लाईव्ह ऍक्शन' लघुपट - द नेबर्स विंडो

🏆सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - ताइका वाईतीती (जोजो रॅबिट)

🏆सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - बाँग जून हो (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट - हेअर लव्ह

🏆सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट - टॉय स्टोरी ४

🏆सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पुदुच्चेरी विधानसभेत सीएएच्या विरोधात ठराव पारित

◾️काँग्रेसचे शासन असलेल्या पुदुच्चेरीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात विधानसभेत बुधवारी ठराव पारित करण्यात आला.

◾️ या कायद्याला नकार देणारा पुदुच्चेरी हा देशातील ❗️पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे.

🔘 यापूर्वी
📌 केरळ व
📌पश्चिम बंगाल या राज्यांनी या कायद्याविरुद्ध ठराव संमत केले आहेत.

◾️पुदुच्चेरी विधानसभेच्या एक दिवसाच्या विशेष सत्रात मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी मांडलेला प्रस्ताव संमत करण्यात आला.

◾️ राष्ट्रीय नागरिक नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यांनाही ठरावात विरोध नोंदवण्यात आला.

◾️सीएए हा ‘धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या संपूर्णपणे विरोधात असल्यामुळे’ तो परत घेण्यात यावा, असे आवाहन या ठरावाद्वारे केंद्र सरकारला करण्यात आले.

◾️ हा ठराव एकमताने स्वीकारण्यात आल्याचे अध्यक्ष व्ही.पी. शिवाकोलुंदु यांनी जाहीर केले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तीन भारतीय कलाविष्कारांचा गिनीज विश्वविक्रम

🔰त्यागया चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.

🔰कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.

🔰1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.

🔰त्यागराज पंचरत्नम संगीतावरचे नृत्यदिग्दर्शन पार्वती, कुचीपुडी तज्ञ एम.व्ही.एन. मूर्ती आणि कृष्णकुमार ह्यांनी केले होते. त्यांनी 1200 लोकांच्या बँडला प्रशिक्षण दिले.

🔴भारतीय नृत्यशैली

🔰भारतात दोनशेहून अधिक लोकनृत्ये प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातल्या कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

🔴राज्यात रुजलेले नृत्यप्रकार

🔰अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
🔰आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
🔰आसाम - बिहू, जुमर नाच
🔰उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
🔰उत्तराखंड - गढवाली
🔰उत्तरांचल - पांडव नृत्य
🔰ओरिसा - ओडिसी, छाऊ
🔰कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
🔰केरळ - कथकली
🔰गुजरात - गरबा, रास
🔰गोवा - मंडो
🔰छत्तीसगढ - पंथी
🔰जम्मू व काश्मीर - रौफ
🔰झारखंड - कर्मा, छाऊ
🔰मणिपूर - मणिपुरी
🔰मध्यप्रदेश - कर्मा, चरकुला
🔰महाराष्ट्र - लावणी
🔰मिझोरम - खान्तुम
🔰मेघालय - लाहो
🔰तामिळनाडू - भरतनाट्यम
🔰पंजाब - भांगडा, गिद्धा (गिद्दा)
🔰पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
🔰बिहार - छाऊ
🔰राजस्थान - घूमर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2017-18 साली देशातला बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांमध्ये सर्वाधिक

🔰 देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक राहिला आहे.

🔰 राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षणानुसार देशातला 2017-18 या वर्षाचा बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के होता.

❇️ सर्वेक्षणानुसार, :

🔰 1972-73 या वर्षात हा बेरोजगारीचा दर सगळ्यात जास्त होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बेरोजगारीच्या दरात गंभीर वाढ झाली आहे.

🔰 गेल्या काही वर्षांमध्ये कामगारांची गरज कमी होत गेल्याने त्यांना कामावरून हटवण्यात आले. नोटाबंदीमुळे आलेल्या मंदीनंतर अनेकांचा रोजगार हिरावला.

🔰 2017-18 या वर्षात ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता, तर शहरी भागात 7.8 टक्के राहिला.

🔰 तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजेच 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला आहे.

🔰 शहरी भागात 15 ते 29 या वयोगटातले तरुण सगळ्यात जास्त बेरोजगार आहेत. या वयोगटातले 18.7 टक्के पुरुष तर 27.2 टक्के महिला नोकरीच्या शोधात आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दीर्घकाळ अंतराळात राहणारी महिला, 'अमेरिकेची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच

🅾दीर्घकाळ अंतराळात राहणारी महिला, असा विक्रम अमेरिकेची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच हिने आपल्या नावावर केला आहे. तब्बल 328 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्य करून ती सुखरूपपणे पृथ्वीवर परतली आहे.

🅾 कझाकिस्तानच्या डझहेजझगन येथे गुरुवारी ख्रिस्तिना उतरली आहे. ख्रिस्तिनाने अंतराळात 328 दिवस व्यतीत करण्यासह पृथ्वीला 5,248 वेळेस प्रदक्षिणा घातल्या आहेत.

🅾 यासाठी तिने 3.9 कोटी किलोमीटरचे अंतर पार केले. हे अंतर पृथ्वी ते चंद्र यांच्यात 291 फेऱया मारण्याइतके आहे. गेल्या 11 महिन्यांत तिने 6 वेळा ‘स्पेस वॉक’ केले.

🅾 ख्रिस्तिना यांच्या मोहिमेचा मुख्य उद्देश आगामी चंद्र आणि मंगळ मोहिमांबरोबरच गुरुत्वाकर्षण आणि अंतराळातील किरणोत्सर्गाचा महिलांच्या शरीरावर पडणारा प्रभावाचा अभ्यास करणे हा होता.

🅾 चंद्रावर अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे ‘नासा’चे ध्येय असून, त्यासाठी हे अध्ययन उपयुक्त ठरणार आहे.

मध्यप्रदेशात देशातील पहिले गो- अभयारण्य

🔰 देशातील पहिल्या गो- अभयारण्याचा प्रारंभ मध्यप्रदेशात झाला. यावेळी अकरा गाईंची पूजा करून गो-अभयारण्याचे उद्धघाटन करण्यात आले.

🔰 6000  गाई येथे राहू शकतील एवढी क्षमता या अभयारण्याची आहे. सध्या 4000 गायी या परिसरात आहेत.

🔰 आगर-मालवा जिल्ह्यातील सूसनेर येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सालरियां गावात 472 हेक्टर जागेत हे अभयारण्य उभारण्यात आले आहे.

🔰 पाच वर्षापूर्वी याचे भूमिपूजन झाले होते. अभयारण्य उभारण्यास 31 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.

✅काय असेल त्या ठिकाणी......

🔰 गाईंना राहण्याची आधुनिक व्यवस्था, रूग्णालय, गाईंच्या प्रजातींवर संशोधन, दुध, शेण, मुत्र यावर संशोधन केंद्र,
भाकड गाईंचा विभाग आदी विविध विभाग येथे आहे.

🔰 यासाठी 24 शेड बांधण्यात आल्या आहेत. सहा महिने पुरले एवढ्या चाऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

🔰 वीज कंपनी, पीडब्ल्यूडी, पीएचई, मत्स्य, वन, सौर ऊर्जा व कृषी असे नऊ विभाग या गो- अभयारण्याची देखभाल करणार आहेत.

🔰 त्यासाठी 85 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तीन पशुवैद्यकीय अधिकारीही या गाईच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला

भारतीय स्त्रीवादी विद्वान आणि कार्यकर्त्या गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला आहे. डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार सेन यांना स्त्री-पुरुष समानता (वर्तमान श्रेणी) या गटात दिला जात आहे.

डेबोरा डिनीझ आणि सेन यांना हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जात आहे. डेबोरा डिनीझ हे इंटरनॅशनल प्लान्ड पॅरेन्टहुड फेडरेशन-वेस्टर्न हेमिस्फेयर रिजन यासाठी हक्क व न्याय केंद्राचे उपसंचालक आहेत.

इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे. मे 2020 या महिन्यात तेल अवीव येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात तीन गटात सहा जणांना हा सन्मान दिला जाणार आहे.

गीता सेन विषयी

सेन यांना लोकसंख्येबाबतचे धोरण, प्रजनन आणि आरोग्य, दारिद्र्य, महिलांचे हक्क, कामगार पेठ आणि जागतिक प्रशासन अक्षय क्षेत्रांमधल्या त्यांनी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सेन हार्वर्ड विद्यापीठात जागतिक आरोग्य आणि लोकसंख्येच्या एक संलग्न प्राध्यापक आहेत आणि ती भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बेंगळुरू येथे सार्वजनिक धोरणाच्या प्राध्यापकही राहिलेल्या आहेत. त्या ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ येथे ‘रामालिंगास्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डिटेर्मिनेंट्स ऑफ हेल्थ’ याच्या संचालिका आहेत.

इतर गटाचे विजेते –

🔸सांस्कृतिक जतन आणि पुनरुज्जीवन (भूतकाळ श्रेणी) - लोनी जी. बंच तिसरा (वॉशिंग्टन, अमेरिका) आणि बारबरा किर्शेनब्लाट-गिम्ब्लेट (न्यूयॉर्क विद्यापीठ)

🔸कृत्रिम बुद्धिमत्ता (भविष्य श्रेणी) - डेमिस हसाबिस आणि अ‍ॅमनोन शाशुआ (जेरुसलेमचे हिब्रू विद्यापीठ).

पुरस्काराविषयी

डॅन डेव्हिड पुरस्कार दरवर्षी जागतिक स्तरावर प्रेरणा देणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्कार स्वरूपात प्रत्येकी एक दसलक्ष डॉलर एवढ्या रोख रकमेसह तीन पुरस्कार दिले जातात. एकूण तीन दशलक्ष डॉलर एवढ्या मूल्यांसह हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वाधिक मूल्य असलेल्या पुरस्कारांपैकी एक आहे.

खादी व ग्रामोद्योग आयोगाचे ‘फिरते मधमाशा पालनगृह’

13 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘फिरते मधमाशा पालनगृह’ (Apiary on Wheels) या पुढाकाराला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

कीटक जातीतल्या मधमाशा पालनात अनेक आव्हाने असतात. या उपक्रमांमुळे मधमाशा पालन सुलभ होण्यास मदत होणार. मधमाशा पालन करणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीचा समग्र दृष्टीकोन फिरत्या मधमाशा पालनगृहाच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.

उपक्रमाविषयी

🔸मधमाश्यांच्या सुलभ स्थलांतरासाठी बनविलेली ही एक अनोखी कल्पना आहे. हा खादी व ग्रामोद्योग आयोगाचा (KVIC) उपक्रम आहे.

🔸प्रायोगिक तत्वावर फिरते मधमाशा पालनगृह दिल्लीच्या सीमेवर मोहरीच्या शेतांजवळ तैनात करण्यात येणार आहे. यशस्वी अंमलबजावणीनंतर देशभरात ही संकल्पना राबवली जाणार आहे.

🔸एक वाहन 20 पालनगृहांना कोणत्याही अडचणीशिवाय एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊ शकते. अश्या वहनामुळे अत्याधिक गरमीतही मधमाशा स्थलांतरित होऊ शकतात. वाहनात त्यानं थंडावा मिळावा यासाठी सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC)

खादी व ग्रामोद्योग आयोग एप्रिल 1957 मध्ये स्थापन करण्यात आले. ही भारत सरकारने तयार केलेली एक वैधानिक संस्था आहे. हे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत खादी व ग्रामीण उद्योगांच्या संदर्भातली ही एक शीर्ष संस्था आहे. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे.

खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 2017 साली “मध मोहीम (Honey Mission)” राबविण्यास सुरूवात केली. या उपक्रमाच्या अंतर्गत मधुमक्षिका पालकांना प्रशिक्षण दिले गेले, मधमाशी पालनगृहांचे वाटप करण्यात आले आणि ग्रामीण, सुशिक्षित परंतु बेरोजगार तरुणांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यात मदत केली गेली.

लोकसंख्या दर

🔰आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

◾️जागतिक लोकसंख्या अहवाल 2019 नुसार वर्ष 2027 च्या सुमाराला भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

◾️जनगणना 2011 नुसार
📌 देशाचा दशकीय वृद्धी दर 17.7 टक्के होता.
📌 महाराष्ट्रातला दशकीय वृद्धी दर 16 टक्के होता.

◾️ एकूण प्रजनन दर कमी होऊन 2017 मध्ये तो 2.2 वर आला आहे.

◾️2005 मध्ये तो 2.9 होता. किशोरवयीन जन्मदर निम्म्याने
कमी होऊन 8 टक्क्यांवर आला आहे.

◾️आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

   
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अंटार्क्टिका तापमान पहिल्यांदाच 20 अंशांच्या पुढे

◾️ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

◾️ पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर असलेला खंड अंटार्क्टिका  तापमान पहिल्यांदाच 20 अंशांच्या पुढे गेले आहे.

◾️अंटार्क्टिका येथील सेमूर बेटावर असलेल्या संशोधन स्थानकातून 9 फेब्रुवारी रोजी या तापमानाची नोंद केली
गेली आहे.

◾️ या दिवशी तापमान 20.75 अंश सेल्सिअस होते. या आधी जानेवारी 1982 मध्ये अंटार्क्टिकाचे तापमान 19.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

🔰समुद्री प्रवाहांचा परिणाम?🔰

◾️ब्राझीलच्या अंटार्क्टिका प्रोग्रॅमशी संबंधित वैज्ञानिकांच्या मते दक्षिण ध्रुवावरील वाढत्या तापमानाचे कारण समुद्री प्रवाह आणि अल नीनोच्या प्रभावातून झालेले असू शकते. सध्या वातावरणात बदल होत आहेत. त्यामुळेही ध्रुवांवरील तापमानात वाढ झालेली

🔰 अंटार्क्टिका क्षेत्रात जगातील ७० टक्के ताजे पाणी 🔰

◾️अंटार्क्टिका खंडामध्ये 60 अक्षांश आणि त्यावर जगातील 70 टक्के
ताजे पाणी आहे.

◾️ जर येथील सर्व हिमनद्या वितळल्या तर समुद्राची पातळी 50-60 मीटर उंच होईल. संयुक्त राष्ट्राच्या वैज्ञानिकांच्या मते 21 व्या शतकाअखेरीस समुद्राची पाणी पातळी 30 ते 110
सेंटीमीटर वाढेल.

◾️ते थांबविण्यासाठी काहीही करून कार्बन उत्सर्जन रोखले पाहिजे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...