Sunday, 9 February 2020

खुशखबर; लवकरच मोठी भरती

💁‍♂ लोकसेवा आयोगाने यावर्षी पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क या विभागांमधील पदांच्या भरतीचे नियोजन केले आहे.

👉 पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कधी होतील, जाहिरात कधीपर्यंत प्रसिध्द होईल याचेही नियोजन करुन अर्थ विभागाला सादर केले आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला तर मुख्य परीक्षा 2, 3, 4 ऑगस्ट 2020 मध्ये घेतली जाणार आहे.

🧐 *परीक्षेचे नियोजन :*

▪ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदांडाधिकारी प्रथम वर्गची पूर्वपरीक्षा 1 मार्चला तर मुख्य परीक्षा 14 जूनला घेण्याचे नियोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

▪ राज्य परिवहन विभागात मोठ्या प्रमाणावर सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्‍त असून या पदांची भरतीही केली जाणार आहे. 15 मार्चला या पदांसाठी पूर्वपरीक्षा होणार असून 12 जुलैला मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.

▪ महाराष्ट्र दुय्यमसेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 3 मे रोजी होणार असून मुख्य परीक्षा घेण्याचेही नियोजन ठरले आहे. या विभागाकडून आयोगाला मागणीपत्र प्राप्त झाले असून या पदांच्या भरतीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

▪ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2020, पेपर क्रमांक दोन (लिपीक- टंकलेखक), दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन, कर सहायक मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन आणि महाराष्ट कृषी सेवा परीक्षांचे नियोजन ठप्प आहे.

▪ अभियांत्रिकी सेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 17 मे रोजी घेण्याचे नियोजन आहे, परंतु, मुख्य परीक्षेचे नियोजन ठरलेले नाही.

📍 दरम्यान, वनसेवा परीक्षेचे नियोजन करुनही मागणीपत्र नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.

मेरठ येथे प्राण्यांसाठीचे पहिले युद्ध स्मारक नियोजित


--------------------------------------------------------
● प्राण्यांसाठीचे पहिले युद्ध स्मारक मेरठ येथे नियोजित

● ठिकाण :- मेरठ, उत्तर प्रदेश

● योजना :- भारत सरकार

★ विशेषता :- भारताचे पहिले प्राण्यांसाठीचे युद्ध स्मारक

● उभारणी केंद्र :- रिमाउंट आणि पशुवैद्यकीय केंद्र (Remount and Veterinary Corps - RVC) केंद्र आणि महाविद्यालय, मेरठ

----------------------------------------------

🚂 भारतीय रेल्वेचा पहिला कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प भुवनेश्वरमध्ये सुरू 🚂
-----------------------------------------------------
● भुवनेश्वरमध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा भारतीय रेल्वेचा पहिला सुरू

● ठिकाण :- मंचेश्वर कॅरेज दुरुस्ती कार्यशाळा, भुवनेश्वर

● उभारणी सहकार्य:  पूर्व किनारा रेल्वे झोन

काँग्रेसचे माजी खासदार राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले विश्वस्त


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
√सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे.

√ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली. ट्रस्टच्या विश्वस्तांची निवडही सरकारकडून करण्यात आली असून, काँग्रेसकडून दोन वेळा खासदार राहिलेले के. परासरन हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे पहिले विश्वस्त आहेत.
- परासरन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात केंद्रात महाधिवक्ता म्हणूनही काम केलं आहे.

√ राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली.
- ट्रस्टवर १५ विश्वस्त नेमले जाणार आहेत. त्यातील दहा जणांची निवड केंद्र सरकारनं केली आहे.
-  त्यात पहिलं नाव काँग्रेसचे माजी खासदार के. परासरन याचं आहे..

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

🎯 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)

🎯 देशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?
- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी

🎯 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?
- अब्दुल कलम आझाद

🎯 तुरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?
- सुभाषचंद्र बोस

🎯 तुरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?
- चित्तरंजन दास

🎯 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?
- नेहरु अहवाल

🎯 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?
- लोकमान्य टिळक

🎯अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?
- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.

सॉइल हेल्थ कार्डमुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे: राष्ट्रीय उत्पादकता परिषद

राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने (NPC) केलेल्या अभ्यासानुसार, सॉइल हेल्थ कार्ड (SHC) याच्या शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे रासायनिक खतांचा वापर 8 ते 10 टक्क्यांनी कमी झाला आहे.

📚जे शेतकरी बहुतेक सर्व गोष्टींमध्ये खतांचा जास्त प्रमाणात वापर करतात, त्यांना सॉइल हेल्थ कार्ड (SHC) यामुळे हळूहळू त्यांच्या धोकादायक प्रथेपासून दूर केले जात आहे.

📚या उपक्रमामुळे मृदेच्या आरोग्याच्या बाबी समजून घेण्यास आणि मातीच्या पोषक तत्त्वांचा योग्य वापर करुन उत्पादनात सुधारणा करण्यास शेतकर्‍यांना सक्षम केले आहे.

📚पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये आणि बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमधल्या काही भागात मृदेमध्ये सर्व प्रोटीन घटकांना तयार होण्यासाठी आवश्यक असलेले ‘नायट्रोजन’ कमी आहे.

📚हिमाचल, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये आणि बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, आसाम, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या काही भागात मृदेमध्ये वनस्पतींना प्रकाशाला अन्नात रुपांतर करण्यात मदत करणारे ‘फॉस्फोरस’ कमी आहे.

योजनेविषयी

📚खतांच्या अत्याधिक वापरामुळे मृदेमधली पोषकद्रव्ये कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर 2014-15 या आर्थिक वर्षात सॉइल हेल्थ कार्ड योजना लागू केली गेली. कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत चाललेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात (वर्ष 2015-17) 10.74 कोटी कार्डांचे वाटप करण्यात आले, तर दुसर्‍या टप्प्यात (वर्ष 2017-19) 11.69 कोटी कार्डांचे वाटप करण्यात आले.

📚 “आदर्श खेड्यांचा विकास” हा एक पथदर्शी प्रकल्प राबविला जात असून त्याच्या अंतर्गत शेतकर्‍यांच्या भागीदारीने कृषक मातीचे नमुने घेणे आणि त्यांची चाचणी करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. “आदर्श खेड्यांचा विकास” या योजनेचा एक भाग म्हणून वर्ष 2019-20 मध्ये 13.53 लक्ष कार्ड वाटली गेली आहेत.

📚या योजनेंतर्गत ‘मृदा आरोग्य प्रयोगशाळा’ची स्थापना करण्यासाठी, राज्यांना 429 अचल प्रयोगशाळा, 102 नवीन चल प्रयोगशाळा, 8752 लघू प्रयोगशाळा, 1562 ग्राम-स्तरीय प्रयोगशाळा आणि विद्यमान 800 प्रयोगशाळांची सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

📚या योजनेत प्रत्येक दोन वर्षात एकदा राज्य सरकारकडून मृदेच्या रचनेचे विश्लेषण केले गेले आहे जेणेकरून जमिनीतील पोषक द्रव्ये सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतील.

📚योजनेंतर्गत 40 वर्षे वयोगटातले ग्रामीण युवा आणि शेतकरी प्रयोगशाळा स्थापन करण्यास व चाचणी घेण्यास पात्र आहेत. एका प्रयोगशाळेला 5 लक्ष रुपये खर्च येतो, ज्यापैकी 75 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात केंद्र आणि राज्य सरकार देते.

Current affairs questions

भारतात ____ या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.

(A) 30 जानेवारी✅✅
(B) 1 फेब्रुवारी
(C) 31 जानेवारी
(D) 25 जानेवारी

कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ (USMCA) या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?

(A) डोनाल्ड ट्रम्प✅✅
(B) अ‍ॅन्ड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर
(C) जस्टिन ट्रूडो
(D) व्लादीमीर पुतीन

जैव इंधनावर उडणारे IAFचे पहिले स्वदेशी विमान लेहमध्ये यशस्वीरित्या उतरले. त्या विमानाचे नाव काय आहे?

(A) मिग-29
(B) मिराज 2000
(C) सुखोई S-30
(D) AN-32✅✅

कोणत्या संघटनेनी ‘कोरोनाव्हायरस’ यामुळे होणार्‍या आजाराच्या उद्रेकास वैश्विक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले?

(A) IMF
(B) WHO✅✅
(C) UN
(D) UNEP

कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?

(A) तेलंगणा
(B) आंध्रप्रदेश✅✅
(C) उत्तरप्रदेश
(D) हिमाचल प्रदेश

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा (दुरुस्ती) विधेयक, 2020ला मंत्रिमंडळाची मंजुरी.


 
⚜पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील गोष्टींना मान्यता दिली..

⚜भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायद (दुरुस्ती ) विधेयक, सादर करणे

⚜20 आयआयआयटी (पीपीपी) मध्ये प्रत्येकी एक आणि आयआयआयटीडीएम कुरनूल (आयआयआयटी-सीएफटीआय) मध्ये एक अशा संचालकांच्या 21 पदांसाठी पूर्वप्रभावाने मंजुरी 

⚜20 आयआयटी (पीपीपी) मध्ये प्रत्येकी एक आणि आयआयआयटीडीएम कुरनूल (आयआयटी-सीएफटीआय) मध्ये एक, याप्रमाणे रजिस्ट्रारच्या 21 पदांसाठी पूर्वप्रभावाने मंजुरी.
 
प्रभाव:

⚜या विधेयकामुळे , उर्वरित 5 आयआयआय टी -पीपीपी बरोबरच  सार्वजनिक खासगी भागीदारीतील विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना पदवी प्रदान करण्याच्या अधिकारांसह  ‘राष्‍ट्रीय महत्वाच्या संस्था’ म्हणून घोषित केले जाईल.

⚜ यामुळे त्यांना विद्यापीठ किंवा राष्‍ट्रीय महत्वाच्या संस्थेप्रमाणे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) किंवा मास्टर ऑफ टेकनॉलॉजी (एम.टेक) किंवा पीएच.डी पदवीच्या नामकरणाचा वापर करता येईल. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशात एक मजबूत संशोधन पाया विकसित करण्यासाठी आवश्‍यक पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतील.
 
विवरण:

⚜2014 आणि 2017 च्या प्रमुख कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा (दुरुस्ती ) विधेयक, 2020 सादर करणे

⚜सुरत , भोपाळ , भागलपुर, अगरतला आणि रायचूर येथील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत  5 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना वैधानिक दर्जा प्रदान करणे आणि त्यांना  भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्‍था (सार्वजनिक खासगी भागीदारी ) कायदा 2017 अंतर्गत विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांबरोबरच राष्‍ट्रीय महत्वाच्या  संस्‍था म्हणून घोषित करणे    

या मंजुरीचा उद्देश..

🔺सुरत, भोपाळ, भागलपूर, अगरतला आणि रायचूर येथील आयआयआयटीना अधिकृत करणे हा आहे.

🔺या आयआयआयटी यापूर्वीच सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत आहेत.

🔺सार्वजनिक-खासगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या इतर  15 आयआयआयटी प्रमाणेच आता आयआयआयटी (पीपीपी) कायदा 2017 अंतर्गतही त्यांचा समावेश केला जाईल.

🔺तसेच आयआयटीआयटी कायदा  2014  नुसार आयआयआयटीडीएम कुर्नूल  स्थापन करण्यात आले आहे आणि आयआयआयटी.

🔺अलाहाबाद, आयआयआयटीएम ग्वाल्हेर, आयआयआयटीडीएम.

🔺जबलपूर, आयआयआयटीडीएम कांचीपुरम या इतर 4 आयआयटी बरोबर कार्यरत आहेत.

🔺या आयआयआयटीमध्ये संचालक आणि रजिस्ट्रार हे पद आधीच अस्तित्त्वात आहे आणि सध्याचा प्रस्ताव त्यांना कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय केवळ औपचारिक करतो.

‘या’ मुस्लीमबहुल देशात सुरू झाले पहिले हिंदू विश्वविद्यापीठ.

🏵इंडोनेशिया या मुस्लीमबहुल देशामध्ये पहिले हिंदू विश्वविद्यापीठ सुरु झाले आहे.
इंडोनेशियाची राजधानी बालीमधील डेनपसार येथे हे विश्वविद्यापीठ सुरू झाले असून सुग्रीव असे नाव या विद्यापीठाचे ठेवण्यात आले आहे.

🏵तर देशातील प्रसिद्ध धार्मिक नेते ‘आयगुस्ती बागस सुग्रीव'(I Gusti Bagus Sugriwa)यांच्या नावावरुन ‘आयगुस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोओ विदोडो यांनी या विश्वविद्यापीठाचे उद्घाटन केले.

🏵तसेच पहिले या विश्वविद्यापीठाचे नाव हिंदू धर्म स्टेट इंस्टीट्यूट होते. पण, ‘मुस्लीमबहुल देशात ‘आय गुस्ती बागस सुग्रीव’ यांनी हिंदू धर्मासाठी केलेले काम, त्यांना हिंदू धर्माच्या संस्कृतीबाबत असलेली जाणीव आणि त्यांची हिंदू धर्माची नीतिमत्ता याबाबत अधिकांश जणांना माहिती मिळावी’ यासाठी विडोडो प्रशासनाने विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे.

🏵1993 मध्ये हिंदू धर्म अध्यापन करण्यासाठी स्टेट अकादमीच्या धर्तीवर ही संस्था सुरु झाली होती. 1999 मध्ये त्याचे हिंदू रिलीजन स्टेट कॉलेजमध्ये परिवर्तन झाले आणि 2004 मध्ये ते आयएचडीएनमध्ये बदलले गेले होते. गेल्या शुक्रवारी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर संस्थेचे नवे स्टेट्स जाहीर केले गेले आहे.

भारत जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक

​​

पोलाद मंत्रालय

🎯जागतिक पोलाद संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक ठरला आहे.

🎯2018 आणि 2019 मध्ये चीन नंतर भारताने क्रमांक पटकावला असून,

🎯जपानला मागे टाकत भारताने हे
स्थान प्राप्त केले आहे.

🎯2018 मधे भारताचे क्रुड स्टील उत्पादन
📌109.3 मेट्रिक टन
होते.

🎯2017 मधल्या 101.5 मेट्रीक टन उत्पादनाच्या तुलनेत यात 7.7 टक्के वाढ झाली.

🎯केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान
यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा: रेपो दर कायम

- भारतीय रिझर्व्ह बँकेनी चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा 6 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर केला आहे. ही पतधोरण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी आहे.

- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय आढावा समितीने एकमताने व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

दर पुढीलप्रमाणे आहेत –

▪️रेपो दर – 5.15 टक्के
▪️रिव्हर्स रेपो दर – 4.9 टक्के
▪️बँक दर – 5.4 टक्के
▪️कॅश रिझर्व्ह रेशियो (CRR) - 4 टक्के
▪️स्टॅट्यूटरी लिक्वीडिटी रेशियो (SLR) - 18.5 टक्के
पुढील दोन महिन्यांसाठी रेपो दर 5.15  टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेनी रेपो दर कायम ठेवले आहे.

▪️रिझर्व्ह बँकेचे वक्तव्य

- 2020-21 या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) किंवा विकास दर 6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

- तसेच अर्थव्यवस्थेची अवस्था कुमकुवत असून, उत्पादनांना असलेली एकूण मागणी कमी राहण्याची शक्यता आहे.

- RBIने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा रेपो दरात कपात केली होती.
——————————————

झांसीमध्ये ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारणार

- उत्तरप्रदेशाच्या झांसी या शहरात ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारण्याची भारत सरकारची योजना आहे. सध्या विकसित करण्यात येत असलेल्या बुंदेलखंड प्रदेशात संरक्षण मार्गिका तयार केली जात आहे, त्यांच्याच एक भाग म्हणून ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ची उभारणी केली जाणार आहे.

- ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ याचा परिसर 6 हजार एकर पर्यंत पसरलेला असेल. प्रकल्पामध्ये अंदाजे 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

- हा प्रकल्प युक्रेनच्या कंपन्यांच्या सहकार्याने ‘टायटन एव्हिएशन अँड एरोस्पेस इंडिया लिमिटेड’ ही कंपनी विकसित करणार आहे.

- हा प्रकल्प चार टप्प्यात विकसित करण्याचे नियोजित आहे. तेथे एव्हिएशन यूनिवर्सिटी, एरोस्पेस लॅबोरेटरीज तसेच एअरबस, बोईंग, रशियन हेलिकॉप्टर अश्या वाहनांसाठी सिम्युलेटर सुविधा उभारली जाणार आहे. विमानांसाठी प्रगत देखरेख व दुरुस्ती केंद्र आणि ड्रोनची निर्मिती अश्या अत्याधुनिक सुविधा देखील असणार आहे.

- याशिवाय धावपट्टी, निवासी वसाहत, विमानांसाठी सुट्या भागांसाठी उत्पादन केंद्र आणि विमानबांधणी केंद्र देखील असणार आहे.

जिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)


📌वैज्ञानिकांनी जैविक ‘स्टेम सेल’ पासून एक रोबोट तैय्यार केला आहे, ज्याला त्यांनी "झेनोबॉट्स" हे नाव दिले आहे. "झेनो" हा शब्द बेडकाची पेशी (झेनोपस लेव्हिज) पासून घेतला गेला आहे कारण त्याच पेशीपासून हा रोबोट तयार झाला आहे.

📌या शोधात ईशान्य अमेरिकेतल्या टुफ्ट्स यूनिवर्सिटीचे अ‍ॅलन डिस्कव्हरी सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट इथल्या संशोधकांचा सहभाग आहे.

झेनोबॉटची वैशिष्ट्ये

📌हे निसर्गासाठी “संपूर्णपणे नवीन जीवन-रूप” आहे.

📌झेनोबॉटची लांबी-रुंदी 1 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. ते 500-1000 जिवंत पेशींना एकत्र करून बनलेले आहे. ते विविध आकारात तयार करण्यात आले आहेत, असे की ज्यात चार पाय सुद्धा आहेत.

📌ते सरळ रेषेत किंवा गोलाकार पद्धतीने घरंगळत मार्गक्रम करू शकतात, एकत्र होऊ शकतात आणि लहान वस्तू हलवू शकतात.

📌पेशीतली ऊर्जा (cellular energy) वापरुन ते 10 दिवस जगू शकतात.

📌झेनोबॉट्स बनविण्यासाठी महासंगणकाचा वापर करण्यात आला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या आकाराविषयी तसेच कार्यांविषयी विविध संशोधन केले जात आहे.

📌अश्या जैव-रोबोटमुळे मानवी, प्राणी आणि पर्यावरण-विषयक आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकते. हे यंत्र अतीसूक्ष्म प्लास्टिक गोला करून प्रदूषित महासागरे साफ करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच त्यांचा वापर विषारी किंवा किरणोत्सर्गी सामग्री इत्यादींसाठी मर्यादीत किंवा धोकादायक भागात प्रवेश करण्यासाठी केला जाऊ शकतो.

📌मानवी शरीरात प्रवास करण्यासाठी ते सक्षम आहेत. ते चालतात आणि पोहू शकतात, काही आठवडे जेवण न करता जगू शकतात आणि एकत्र गटातही काम करतात.

भारत जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक

🔸जागतिक पोलाद संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक ठरला आहे.

🔸2018 आणि 2019 मध्ये चीन नंतर भारताने क्रमांक पटकावला असून, जपानला मागे टाकत भारताने हे स्थान प्राप्त केले आहे.

🔸2018 मधे भारताचे क्रुड स्टील उत्पादन 109.3 मेट्रिक टन होते.

🔸2017 मधल्या 101.5 मेट्रीक टन उत्पादनाच्या तुलनेत यात 7.7 टक्के वाढ झाली.

🔸 केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Super - 30 Questions

1.  “सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती” विषयक दोन दिवसांची प्रादेशिक परिषद कोठे भरली?
✅.  : जम्मू

2.  8 वी आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
✅.   भारत

3.   कोणत्या अंतराळ संस्थेनी ‘अल्टिमा थुले’ या खगोलीय खडकाला ‘अ‍ॅरोकोथ’ असे नाव दिले?
✅.   NASA

4.  कोणत्या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योग परिषद’ आयोजित करण्यात आली?
✅.    म्हैसूर

5.    कोणत्या राज्याने 15 नोव्हेंबर रोजी आपला स्थापना दिन साजरा केला?
✅.   झारखंड

6.    भारतातल्या कोणत्या राज्याने “शिशू सुरक्षा” अॅप सादर केले?
✅.  आसाम

7.  कोणत्या राज्यात ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा करण्यात आला?
✅.  पश्चिम बंगाल

8.    कोणत्या राज्यात “बाली जत्रा” उत्सव साजरा केला जातो?
✅.  ओडिशा

9.  2019 सालाचा ‘BRICS-यंग इनोव्हेटर पुरस्कार’ कोणी जिंकला?
✅.  रवी प्रकाश

10.   “ढाका ग्लोबल डायलॉग” हा कार्यक्रम कोणत्या देशाने आयोजित केला?
✅.  बांग्लादेश

11.   ई-सिगारेटचा शोध कोणी लावला?
✅.  हर्बर्ट ए. गिल्बर्ट

12.    BBPS याचे पूर्ण रूप काय आहे?
✅.  भारत बिल पेमेंट सिस्टम

13.    राय क्रिडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
✅.   कपिल देव

14.   LRO याचे पूर्ण रूप काय आहे?
✅   लुनार रिकोनैसेन्स ऑर्बिटर

15.  दूरदर्शनची सुरुवात कधी करण्यात आली?
✅.   15 सप्टेंबर 1959

16.   भारतात हिंदी दिन कधी साजरा केला जातो?
✅.   14 सप्टेंबर

17.  10 वी आशियाई प्रशांत युवा खेळ स्पर्धा कोठे झाली?
✅.  व्लादिवोस्तोक, रशिया

18.  इटालियन ग्रँड प्रिक्स 2019 या शर्यतीचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅.  चार्ल्स लेकलर्क

19.   कोणत्या पुरुष टेनिसपटूने यूएस ओपन 2019 ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
✅.   राफेल नदाल

20.   राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल कोण?
✅.  कलराज मिश्रा

21.  ‘COP-14’ सत्राचे आयोजन कोठे करण्यात आले?
✅.  ग्रेटर नोएडा

22.   RCEP या समूहात किती देशांचा समावेश आहे?
✅.   16

23.  ‘हिंद महासागर परिषद 2019’ कुठे आयोजित करण्यात आली?
✅.  माले, मालदीव

24.   दुलीप करंडक 2019 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?
उत्तर : इंडिया रेड

25.   जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर : जिनेव्हा, स्वित्झर्लंड

26.   भारताचे नवे गृह सचिव कोण आहेत?
✅.  अजय कुमार भल्ला

27. कॅटालिना खाडी ओलांडणारा पहिला आशियाई जलतरणपटू कोण आहे?
✅.  सतेंद्र सिंग लोहिया

28.  MMR याचे पूर्ण रूप काय आहे?
✅.   मोबाइल मेटलिक रॅम्प

29.   एसो अल्बेन कोणत्या क्रिडाप्रकारासाठी ओळखला जातो?
✅.   सायकलिंग

30.  फिजी देशाची राजधानी कोणती आहे?
✅.   सुवा

Super -30 Questions

1.  सातवाहनाची राजधानी कोणती?
✅. - रत्नागिरी. 

2.    रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे?
✅.   - अलिबाग. 

3.   महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?
✅. - सिंधुदुर्ग. 

4. रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे?
✅.  - कोकण. 

5. कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यानचा पर्वत कोणता?
✅. - सहयाद्रि. 

6. महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात?
✅. - चार. 

7.  बोरीवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे?
✅. - 103 चौ.कि.मी. 

8.  कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे?
✅.  - सडा.

9.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे?
✅. - गोवा. 

10.  कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत?
✅.  - सह्याद्रि पर्वतामुळे. 

11.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता?
✅.  - मुंबई.

12.  कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात?
✅.  - सिंधुदुर्ग. 

13.  कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे?
✅.   - रत्नागिरी. 

14.   तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत?
✅. - महाराष्ट्र-गोवा. 

15.  महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो?
✅.  - कोकण. 

16.   महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो?
✅. - कोकण.

17.  कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो?
✅.  - सह्याद्रि. 

18.  कोकणात सर्वाधिक पाऊस पाडण्याचे कारण?
✅.   - अरबी समुद्रावरील चक्रीवादळ. 

19.  खारे वारे कसे वाहतात?
✅.  - दिवसा समुद्राकडून जमिनीकडे. 

20.  माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - रायगड. 

21.  कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट लागतो?
✅. - अंबाघाट. 

22.   कोल्हापूर - सावंतवाडी या मार्गावर कोणता घाट लागतो?
✅.  - अंबोली. 

23.   कराड - चिपळून रस्त्यावरील घाट कोणता?
✅.  - कुभांर्ली. 

24.  पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे?
✅. - प्रस्तरभंगामुळे. 

25.    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
✅. - अंबोली. 

26.  गवताळ जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - ठाणे. 

27.    मुशी गवताचे सर्वाधिक प्रमाण कोठे आहे?
✅.  - ठाणे. 

28.  अती पाउस पडणार्‍या महाराष्ट्रातील भागात कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात?
✅. - सदाहरित. 

29.  कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - रायगड. 

30.  तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - ठाणे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...