०२ फेब्रुवारी २०२०

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ .

​​

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. 

गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर

१९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या  शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.

पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.

भारतातील एकूण 27 प्रदेशांचा या यादीत समावेश होता . नुकतेच आणखी 10 स्थळांचा समावेश रामसार  यादीत करण्याची घोषणा पर्यावरण मंत्र्यांकडून करण्यात आली आहे . त्यामुळे ही संख्या 37 होईल .

  सुंदरबन हे सर्वांत मोठे, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वांत लहान आकाराचे क्षेत्र आहे. (जुन्या  यादी प्रमाणे)

चालू घडामोडी प्रश्नसंच


⚛💐
भारतात ________ या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.
(A) 30 जानेवारी✅✅
(B) 1 फेब्रुवारी
(C) 31 जानेवारी
(D) 25 जानेवारी

⚛⚛
कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ (USMCA) या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
(A) डोनाल्ड ट्रम्प✅💐✅
(B) अ‍ॅन्ड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर
(C) जस्टिन ट्रूडो
(D) व्लादीमीर पुतीन
.

⚛⚛
जैव इंधनावर उडणारे IAFचे पहिले स्वदेशी विमान लेहमध्ये यशस्वीरित्या उतरले. त्या विमानाचे नाव काय आहे?
(A) मिग-29
(B) मिराज 2000
(C) सुखोई S-30
(D) AN-32✅💐✅✅

⚛⚛
कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
(A) तेलंगणा
(B) आंध्रप्रदेश⚛⚛
(C) उत्तरप्रदेश
(D) हिमाचल प्रदेश

⚛⚛
कोणत्या संघटनेनी ‘कोरोनाव्हायरस’ यामुळे होणार्‍या आजाराच्या उद्रेकास वैश्विक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले?
(A) IMF
(B) WHO✅💐✅✅
(C) UN
(D) UNEP

⚛⚛
कोणत्या व्यक्तीला नाट्यसृष्टीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स' हा प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान प्रदान केला गेला?
(A) संजना कपूर✅✅✅
(B) सौमित्र चटर्जी
(C) रणवीर कपूर
(D) दिपिका पादुकोण

⚛⚛
______ कंपनीने भारतात प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात साक्षरता पसरविण्यासाठी एका संस्थेला एक दशलक्ष डॉलरचे अनुदान जाहीर केले.
(A) IBM
(B) मायक्रोसॉफ्ट
(C) फेसबुक
(D) गूगल✅✅✅

⚛⚛
_____ ह्या ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला ठरल्या.
(A) टेलर स्विफ्ट
(B) बिली एलिश
(C) एमियर नून✅⚛✅
(D) यापैकी नाही


तुषार कांजिलाल ह्यांचे निधन झाले. ते एक प्रसिद्ध _______ होते.
(A) लेखक✅✅
(B) गायक
(C) कलाकार
(D) पत्रकार

⚛⚛
IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
(A) गिन्नी रोमेटी
(B) अरविंद कृष्ण✅✅
(C) एलोन मस्क
(D) जेफ वेनर

2014-15 आणि 2019-20 च्या जीडीपीच्या प्रमाणात सामाजिक सेवांवरील खर्चात 1.5 टक्के वाढ


मानव विकास निर्देशांकातील 1.34 टक्के वार्षिक वाढीसह सर्वाधिक वेगाने सुधारणा होणाऱ्या देशांत भारताचा समावेश

शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण 2014-15 आणि 2019-20 च्या जीडीपीच्या प्रमाणात 4 टक्क्यांहून 4.7 टक्के

समावेशक विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ आवश्यक आहे. सरकारची सामाजिक उत्थानाप्रतीची कटीबद्धता आर्थिक सर्वेक्षण-2019-20 चे वैशिष्ट्ये आहे. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आज संसदेसमोर आर्थिक सर्वेक्षण-2019-20 सादर केले.

सरकारांचा सामाजिक सेवांवरील खर्च

आर्थिक सर्वेक्षणानूसार, केंद्र आणि राज्य सरकारांचा सामाजिक सेवांवरील खर्च 2014-15 मध्ये 7.68 लाख कोटी रुपयांहून 2019-20 (अर्थसंकल्प अनुमान) मध्ये 15.79 लाख कोटी रुपये झाला आहे. सकल घरगुती उत्पादन (जीडीपीच्या) प्रमाणात सामाजिक सेवांवरील खर्चात 2014-15 ते 2019-20 दरम्यान दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या प्रमाणात 2.8 टक्क्यांहून 3.1 टक्के झाला आहे. तसेच आरोग्यावरील खर्चात 1.2 टक्क्यांहून 1.6 एवढी वाढ झाली आहे.

मानव विकास

भारताचे मानव विकास निर्देशांकातील स्थान सुधारले आहे. वर्ष 2017 मध्ये भारत १३० व्या  स्थानावर होता तो आता 2018 मध्ये 0.647 गुणांच्या वाढीसह 129 वर पोहचला आहे. मानव विकास निर्देशांकात भारत सर्वाधिक सुधारणा होणारा देश आहे. ब्रिक्स देशांच्या यादीत चीन (0.95), दक्षिण आफ्रिका (0.78), रशिया (0.69) आणि ब्राझील (0.59) यांच्यापेक्षा भारत वरच्या स्थानावर आहे

‘संप्रीती-9’: भारत आणि बांग्लादेश यांच्यातला संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव

3 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2020 या कालावधीत मेघालयाच्या उमरोई गावात ‘संप्रीती-9’ नावाचा भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा ‘संप्रीती’ या नावाने संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जातो. यावर्षीचा कार्यक्रम हे या मालिकेतले नववे संस्करण आहे.

सरावादरम्यान कमांड पोस्ट एक्सरसाइज (CPX) आणि फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (FTX) घेण्यात येणार आहे. दोन्ही देश दहशतवादविरोधी कारवाईच्या बाबतीत त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणार आणि योग्य पद्धतींचा सराव करणार.

युरोपियन युनियनच्या संसदेत ‘सीएए’विरोधात ठराव; भारताने घेतला तीव्र आक्षेप : 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या विरोध आंदोलनांनंतर आता हे प्रकरण युरोपियन युनियनच्या संसदेत पोहोचले आहे. सीएएच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावावर युरोपियन युनियनच्या संसदेत चर्चा आणि मतदान होणार आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला असून हा आमचा देशांतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

भारताने यासंदर्भात म्हटले की, युरोपियन युनियनच्या संसदेला असे कृत्य करायला नको होते ज्यामुळे लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. जगभरातील अधिकाधिक देशांनी हे मान्य केलं आहे की, सीएए हा पूर्णतः भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. उलट युरोपच्या संसदेत हा ठराव आणणाऱ्यांनी आणि याचे समर्थन करणाऱ्यांनी याबाबतची तथ्थ्ये जाणून घेण्यासाठी भारताशी संपर्क साधावा.

या ठरावाद्वारे भारताला आवाहन करण्यात आले आहे की, भारताने सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांसोबत रचनात्मक चर्चा करावी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांना संपुष्टात आणण्यावर विचार करावा. सीएएमुळे भारतात नागरिकत्व निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये धोकादायकरित्या बदल होईल. भारत याला अंतर्गत बाब सांगत असला तरी अनेक देश या कायद्याला मानवाधिकारांशी जोडून पाहत असून प्रश्न उपस्थित करीत आहे.

परदेशी माध्यमंही यावर सातत्याने आक्रमक भुमिका घेत आहेत. यामुळे जगात मोठे संकट निर्माण होऊ शकते आणि हे मोठे कठीण काम होऊन बसेल. युरोपियन युनियनच्या संसदेत या ठरावावर बुधवारी चर्चा होणार असून त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी यावर मतदानही घेतले जाणार आहे.

DRDO गुजरात विद्यापीठात एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार


- संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार आहे. त्यासाठी गुजरात विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे.

- विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन अँड रिसर्च अँड इनोव्हेशन (CERI) नावाने हे केंद्र उभारण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.

- पुढच्या आठवड्यात DRDO विद्यापीठातल्या पायाभूत सुविधा पाहण्यास आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाशी कसे सहयोग करावे आणि विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग कसा असावा हे पाहण्यासाठी एक पथक पाठवविणार आहे.

▪️ DRDO विषयी

-संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारत सरकारची एक संस्था आहे,
- ज्याकडे लष्करी क्षेत्रात संशोधन आणि विकासाची जबाबदारी आहे. संस्थेची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
——————————————

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...