Monday, 27 January 2020

चीनमधील भारतीयाला घातक विषाणूचा संसर्ग

चीनच्या वुहान आणि शेनझेन शहरात धोकादायक अज्ञात विषाणू फैलावत असून तेथील भारतीय शिक्षिकेला याचा संसर्ग झाला आहे. सिवियर ऍक्यूट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स) सारख्या विषाणूचा संसर्ग झालेला चीनमधील त्या पहिल्या विदेशी नागरिक आहेत.

-शेंजेनव येथील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षिका असलेल्या प्रीति माहेश्वरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रीति यांना संबंधित विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी दिली आहे.

-विषाणूचा संबंध सार्सशी असल्याचे सांगण्यात येत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सार्सने 650 जणांचा जीव घेतला होता. चीनमध्ये रविवारी या विषाणूच्या संसर्गाचे 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असून हे सर्वजण वुहान शहरातील आहेत.

- या विषाणूने शहरात आतापर्यंत 62 जणांनी प्रकृती बिघडविली असून यातील 8 जण गंभीर आहेत.
——————————————

विधान परिषद बरखास्त!; मुख्यमंत्र्यांचा निर्णय


● आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

●  वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याबाबत माहिती दिली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचे विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

          😇  प्रकरण काय  😇
       ----------------------------------
▪ मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना 3 राजधान्या अस्तित्त्वात आणायच्या आहेत, मात्र त्याबाबतचे विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडले आहे.

▪ त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंना धक्का देत, थेट विधानपरिषदच बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.

▪ माजी मुख्यमंत्री अन् टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

▪नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे 21 आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

▪ आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत 58 सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे.

▪ या सभागृहात टीडीपीचे 27 तर वायएसआरचे 9 सदस्य आहेत. विधान परिषदेत जगन मोहन रेड्डी यांच्या राज्याच्या 3 राजधान्या या प्रस्तावाला अडकवले गेले.

--------------------------------------------------------
  
---------------------------------------------------

भारत पर्व 2020: लाल किल्ला मैदानावर कार्यक्रमाचा शुभारंभ झाला

⛔️भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा “भारत पर्व-2020” या पाचव्या वार्षिक महोत्सवाला नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर 26 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली आहे. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

⛔️कार्यक्रमाची संकल्पना: “एक भारत - श्रेष्ठ भारत” आणि “महात्मा गांधींची 150 वी जयंती”

⛔️भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना देशातल्या विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच “देखो अपना देश” ही संकल्पना रुजविणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

⛔️नागरिक कुठल्याही प्रवेश शुल्काशिवाय त्यांचे कोणतेही ओळखपत्र दाखवून दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत भारतपर्व महोत्सवाला भेट देऊ शकतात. या ठिकाणी स्थळांविषयी माहिती देण्यासोबतच विविध कलाकृतींचे प्रदर्शन मांडले जाते.

⛔️यामध्ये भारताची पाक संस्कृती, कला संस्कृती आणि राज्यांच्या विविधतापूर्ण संस्कृती, प्रदर्शनी आणि मेळावे अश्या कार्यक्रमांचे दर्शन घडविले जाते.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 27 जानेवारी 2020.

❇ रोव्हिंग फेडरेशन ऑफ इंडियाने दत्तू भोकानल यांच्यावर बंदी आणली

❇ पाकिस्तानने लाहोर येथे पहिल्या टी -२० मध्ये बांगलादेशला हरविले

❇ ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता चीनकडून जॉर्डनला हलविण्यात आली

❇ राजस्थान सरकारने सीएएविरोधात ठराव पास केला

❇ मध्य प्रदेशचे पहिले एअर कार्गो टर्मिनल जानेवारीअखेर

❇ जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर) पद्मविभूषण २०२० साठी निवड

❇ अरुण जेटली (मरणोत्तर) पद्मविभूषण २०२० साठी निवड

❇ अनेरूड जुगनाथ (मॉरिशस) पद्मविभूषण २०२० साठी निवड

❇ मॅरी कोम (क्रीडा) पद्मविभूषण 2020 साठी निवड

❇ छन्नूलाल मिश्रा (कला) पद्मविभूषण 2020 साठी निवड

❇ सुषमा स्वराज (मरणोपरांत) पद्मविभूषण २०२० साठी निवड

❇ अंद महिंद्रा (व्यापार आणि उद्योग) पद्मभूषण 2020 साठी निवड

❇ मनोहर पर्रीकर (मरणोत्तर) पद्मभूषण २०२० साठी निवड

❇ प्रोफ  जगदीशशेठ (यूएसए) पद्मभूषण 2020 साठी निवड

❇ पी व्ही सिंधू (क्रीडा) पद्मभूषण 2020 साठी निवड

❇ कंगना रनौत (कला) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ एकता कपूर (कला) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇अदनान सामी (कला) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ करण जोहर (कला) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ सुरेश वाडकर (कला) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवडलेला

❇ पोपटराव पवार (सामाजिक कार्य) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ जितू राय (क्रीडा) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ तरूणदीप राय (क्रीडा) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ झहीर खान (क्रीडा) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ रानी रामपाल (क्रीडा) पद्मश्री पुरस्कार २०२० साठी निवड

❇ वेस्टर्न यूनियन मनी ट्रान्सफर सेवेसाठी एअरटेल पेमेंट्स बँक सोबत सामील झाली

❇ अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची नवीन कादंबरी "बलवा" रिलीज होणार आहे

❇ डब्ल्यूईएफने त्याच्या विश्वस्त मंडळावर क्रिस्टलिना जॉर्जियावा आणि पेट्रिस मोटसेप यांची नियुक्ती केली.

❇ रशियाच्या पावेल पोंक्राटोव्हने चेन्नई ओपन आंतरराष्ट्रीय जीएम बुद्धिबळ स्पर्धा जिंकली

❇ रणवीर सिंगमध्ये ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अ‍ॅस्ट्रल पाईप्स दोर्‍या

❇ रोहित शर्माचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून रस्सीखेच

❇ रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षा पुरविण्यासाठी आयसीजेने म्यानमारला आदेश दिला

❇ ब्राझीलबरोबर सायबर सुरक्षेसह 15 सामंजस्य करार

❇ 50 वी डब्ल्यूईएफ वार्षिक बैठक 2020 स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आयोजित

❇ बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाकामध्ये ई-पासपोर्ट सुरू केले

❇ परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची नायजर आणि ट्युनिशियाच्या 3 दिवसीय भेट

❇ इंडसइंड बँकेने सेट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म सुरू केले

❇ ओडिशाचे माजी मंत्री जगन्नाथ राऊत यांचे निधन

❇ प्रख्यात कलाकार आणि शिल्पकार शेरसिंग कुक्कल यांचे निधन

❇ एलिउड किपचोजे (एम) यांना केनियाच्या स्पोर्ट्स पर्सनालिटी ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले

❇ ओबिरी (एफ) यांना केनियाची क्रीडा व्यक्तिमत्त्व म्हणून नामित केले.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


▪ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश

▪ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : उत्तराखंड

▪ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?
उत्तर : 24 जानेवारी

▪ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : दिव्यांश सिंग पनवार

▪ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?
उत्तर : ICICI बँक

▪ ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)

▪ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी

▪ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
उत्तर : झारिया

▪ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : क्रिकेट

▪ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

महत्त्वाचे प्रश्नसंच


1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार

5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ

6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020

7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख

8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन

9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी

10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency

१) उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणत विधान गैरलागू आहे ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.
   2) दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला.
   3) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.
  4) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.

उत्तर :- 4

२) ........................ हे भारताचे 25 वे राज्य बनले.

   1) गोवा    2) मिझोराम  
   3) सिक्कीम    4) झारखंड

उत्तर :- 1

३)  भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

   1) हदयनाथ कुंझरू 
   2) के.एम. पणीकर 
   3) फाझल अली    
   4) के.एम. मुन्शी

   उत्तर :- 3

४) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला  ?

   1) 2000     2) 2005  
  3) 2010      4) 2011

   उत्तर :- 3

५)  राज्य पुनर्रचनेसंबंधी फाजल – अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी –
   अ) विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे.

   ब) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही.

   क) गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे व्दैभाषिक राज्य करावे.

   ड) मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे.

        वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे  ?

   1) अ फक्त     
   2) अ आणि ब फक्त    
   3) अ आणि क फक्त    
   4) अ, ब, क आणि ड

  उत्तर :- 3

६) गटा बाहेरचा ओळखा :
     विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक

   1) विचार  
  2) श्रध्दा      
  3) उपासना  
  4) सामाजिक

उत्तर :- 4

७) 42 व्या घटना दुरूस्तीव्दारे उद्देश्यपत्रिकेमध्ये ............. आणि .............. शब्द जोडण्यात आले.

   अ) समाजवादी     ब) धर्मनिरपेक्ष  
  क) प्रजासत्ताक      ड) राष्ट्राची एकता

   1) फक्त अ, ब, क  
  2) फक्त अ, ब, ड    
  3) फक्त ब, क, ड    
  4) फक्त अ, क, ड

उत्तर :- 2

८).  भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ............. यातून व्यक्त होते.

   1) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार 

   2) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

   3) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे 

  4) वरीलपैकी एकही नाही

  उत्तर :- 2

९) ............. या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.

    1) 13-1-1976   
    2) 3-1-1977  
    3) 31-1-1978
    4) 1-3-1977

    उत्तर :- 2

१०) फाझल अली कमिशनचे सदस्य ................... होते.

   अ) के. एम. पण्णीकर    
   ब) हदयनाथ कुंझरू
   क) यशवंतराव चव्हाण   
   ड) अण्णा डांगे

   1) फक्त अ, ब  
   2) फक्त क, ड   
   3) फक्त ब, क   
   4) वरीलपैकी सर्व

   उत्तर :- 1

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2019 साली ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरूवातीस त्याचा रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. त्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(A) कार्टोसॅट-1
(B) कार्टोसॅट-2
(C) कार्टोसॅट-3✅✅✅
(D) कार्टोसॅट-4

📌कोणत्या राज्य सरकारने "कलवी तोलाईकाच्ची" नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी सुरू केली?

(A) केरळ
(B) तेलंगणा
(C) आंध्रप्रदेश
(D) तामिळनाडू✅✅✅

📌25 ऑगस्ट 2019 रोजी, द्वैपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या सन्मांनार्थ नरेंद्र मोदी यांना ‘________ ऑर्डर - फर्स्ट क्लास’ हा सन्मान देण्यात आला.

(A) संयुक्त अरब अमिरात
(B) बहरीन✅✅✅
(C) कतार
(D) सौदी अरब

📌कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम सुरू केला?

(A) पंजाब
(B) जम्मू व काश्मीर
(C) गोवा
(D) दिल्ली✅✅✅

📌कोणते शहर इंडोनेशिया या देशाचे नवे राजधानी शहर असणार आहे?

(A) पूर्व कालीमंतन, बोर्निओ✅✅✅
(B) ग्रेटर सुरबाया
(C) बानदंग
(D) मेदान

📌कोणत्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आली?

(A) दिल्ली आणि मुंबई
(B) आग्रा आणि दिल्ली
(C) मैसूर आणि उदयपूर✅✅✅
(D) उदयपूर आणि बंगळुरू

📌कोणत्या राज्य सरकारने लेमरू हत्ती वन प्रकल्प स्थापनेसंबंधी प्रस्तावाला मान्यता दिली?

(A) मध्यप्रदेश
(B) छत्तीसगड✅✅✅
(C) ओडिशा
(D) उत्तरप्रदेश

📌दिल्ली जिल्हा क्रिकेट संघने (DDCA) _ याचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

(A) वानखेडे स्टेडियम
(B) आयएस बिंद्रा स्टेडियम
(C) ब्रेबॉर्न स्टेडियम
(D) फिरोज शाह कोटला स्टेडियम✅✅✅

पोलीस भरती प्रश्नसंच इतिहास

1) .... साली पोर्तुगीज भारतात आले
1)1498.  √
2)1595
3)1597
4)1599

2).....साली "डच" भारतात आले.
1)1497
2)1595.  √
3)1597
4)1599

3).….. साली "जॉन मिलडेन हॉल" भारतात आला.
1)1497
2)1595
3)1597
4)1599.  √

4).... साली "फ्रेंच" भारतात आले.
1)1665.  √
2)1595
3)1597
4)1599

5).....साली 'पोर्तुगीज" भारतातून निघून गेले.
1)1661.   √
2)1561
3)1797
4)1961

6) "जॉन मिलडेन हॉल" कोणत्या देशाचा व्यक्ती होता.
1)भारत
2)इंग्रज.   √
3)पोर्तुगीज
4)डच

7)20 मे 1498 ला  ... हा केरळ च्या "कालिकत" बंदरावर पोहचला.
1)वास्को दि गामा.   √
2)"जॉन मिलडेन हॉल"
3)अमेरिगो व्हसपुसी
4)रॉबर्ट क्लाइव्ह

8)1501 मध्ये .... हा व्यक्ती भारतातून पोर्तुगाल कढे परत निघाला होता.
1)वास्को दि गामा.   √
2)"जॉन मिलडेन हॉल"
3)अमेरिगो व्हसपुसी
4)रॉबर्ट क्लाइव्ह

9)....या व्यक्ती ने "झामोरीन राजाची" हत्या केली होती.

1)"जॉन मिलडेन हॉल"
2)अमेरिगो व्हसपुसी
3)रॉबर्ट क्लाइव्ह
4)वास्को दि गामा.   √

10).....च्या लोकांना "डच" म्हणत.
1) भारतीय
2) इंग्रज
3) नेदरलँड.  √
4) पोर्तुगीज

11).....हे बेटे "लवंग" साठी प्रसिद्ध होते.
1) अंदमान - निकोबार
2) जावा - सुमात्रा.  √
3) दिव - दमण
4) कालिकत (केरळ)

राज्यसेवा 2020 – CSAT Best Strategy

राज्यसेवा २०२० - CSAT

CSAT पूर्वपरीक्षा पास करण्यासाठीचा अनिर्वार्य घटक. 2013 पासून अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला हा घटक आपणापैकी काहींसाठी मित्र आहे तर काहींसाठी कट्टर शत्रू ….शेवटी हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. आपण CSAT ला का घाबरतो? त्याचे मला सापडलेले उत्तर म्हणजे त्याबद्दल निर्माण करण्यात आलेले गैरसमज आणि सोबतच अतिशयोक्ती सुद्धा गैरसमज यासाठी या विषयासाठी काय काय करावे याचे अनेक साधक मार्गदर्शन उपलब्ध आहे परंतु कसे कसे करावे यांच्या मार्गदर्शनाचा अभाव .अतिशयोक्ती यासाठी कोणताही क्लास लावण्याची गरज नाही अशी मांडण्यात आलेली गृहीतके! मार्गदर्शनाशिवाय याला पर्याय नाही हे अमान्य असलेले सत्य आहे.

मित्रांनो , Aptitude म्हणजे काय ? तर तुमचा बुद्धांक होय . तो तर गणित , बुद्धिमत्ता या विषयातून तपासला जाऊ शकत होता . मग उताऱ्यांची संकल्पना का बर परीक्षकांना सुचली असेल ? याचे उत्तर असे आहे की आयोगाला तुमच्यातला Spark, झटपट निर्णय घेण्याची क्षमता , कोड सोडविण्याची हातोटी , शासनाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे कसब किती आणि ते कोणत्या प्रमाणात आहे ते शोधून काढायचे आहे आणि म्हणूनच CSAT ची चाळण त्यांनी तयार केली .

CSAT च्या सर्व पेपर चे घटकनिहाय विश्लेषण येथे दिले आहे संपूर्ण निरीक्षणाअंती हे स्पष्ट आहे की दरवर्षी आकलन या घटकाचे 50 प्रश्न निश्चितच आहेत वर्षागणिक बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची संख्या वाढत जात आहे तर गणिताच्या प्रश्नांची संख्या कमी होत आहेत तसेच निर्णय क्षमता या घटकाचे पाच प्रश्न निश्चित आहेत आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करावा याचा संदर्भ पाहू.

आकलन –
आपण जेव्हा उतारे सोडवतो तेव्हा त्यांना आपल्या ज्ञानाची तपासणी करायचीच नाहीये . त्यांना आपण ते सांगतात किंवा आदेश देतात ते पाळण्यासाठी किती तयार आहोत हे तपासायचे आहे . म्हणूनच उतारे सोडविणे ही एक कला आहे . ज्याच्या आधारे आपण पूर्वपरीक्षेचे बरेच मोठे अंतर पार करु शकतो . उतारे सोडविणे ही एक कला आहे असे मी त्यासाठीच म्हटले की पाठ करुन , सगळ्या Trick , क्लुप्त्या वगैरे वगैरे करुनच हे करता येत नाही , तर याचा एकमेव म्हणजे एकमेव मार्ग हा विपुल सराव करणे हाच आहे . पण त्याआधी आयोगाचे उतारे समजून घेऊन यांची प्रश्न पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे .

बरचे जण २०१३ ते २०१९ – हे आयागाचे पेपर बघणे साडेविणे हे महत्त्वाचे समजतच नाहात . ते बाह्य पुस्तकावरच जास्त अवलंबून राहतात . तसे करणे हे अतिशय नुकसानदायक आहे . कारण , कोणताही क्लास , पुस्तक तुम्हाला अधिकारी बनविणार नाही . तुम्हाला अधिकारी पदावर आयोगच नेऊन बसविणार आहे . त्यामुळे आयोगाच्या अटी , दिशा पाहणे अत्यावश्यक आहे .

मागच्या ७ वर्षाच्या पत्रिकांचे विश्लेषण आपण केले तर आपल्या असे लक्षात येईल की , २०१३ – १४ पेक्षा नंतरचे पेपर हे जास्त कठीण आहेत . २०१३ – १2 मध्ये उतारे आणि त्यांचे प्रश्न यामध्ये ससत्रता वगेळ्या प्रकारचा होती . तर २०१५ – २०१६ – २०१७ यामध्ये उताऱ्यांचा दर्जा हा वगेळा होता . तो तपासायचा , समजून घ्यायचा म्हणजे उतारे सोडविताना अनुचित आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल . २०१८ चा पेपर हा त्यामानाने सोपा असा म्हणता येईल . . . पण तरीही त्यामध्ये आयोगाने निश्चित केलेली पातळी गाठणे शक्य झालेले नाही . २०१९ चा पेपर हा समसमान काठिण्य पातळीचा ठरला .

1) Reading Comprehension –
उतारे सोडवितांना लक्षात घ्यावयाच्या प्रमुख बाबी :

१ ) आधी उतारा वाचाया की प्रश्न वाचावेत ? — माझे तुम्हाला हेच स्पष्ट सांगणे असेल की आधी उतारा वाचावा . कारण त्यामुळे प्रश्न सोडविताना गोंधळ होणार नाही . सामान्यपणे आपण आधी प्रश्न वाचतो मग उतारा वाचतो . त्यामुळे मूळ उद्देश – आकलन यालाच धमा पोहचतो कारण आपण फक्त त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावरच नजर भिरभिरवतो . आकलन होत नाही , मग उतारे चुकतात . म्हणून आधी उताराच वाचावा .

२ ) उताऱ्याचे वाचन कसे करावे ? —
याचे योग्य आणि सोपे उत्तर असे आहे की उताऱ्यातील प्रत्येक शब्द फोड करत करत वाचावा . वाक्यामध्ये असणाऱ्या विराम चिन्हांचा म्हणजेच पूर्णविराम , स्वल्पविराम , अवतरणचिन्हे , काळ यांचा व्याकरणीय दृष्टीकोनातून विचार करावा . आपण वाचताना सरळसरळ वाचत सुटतो . विरामाचिन्हांचा विचार करत नाही . हीच चूक कटाक्षाने टाळावी .

३ ) Key – Words किंवा महत्त्वाचे शब्द — बऱ्याचदा आपल्याला महत्त्वाचे वाटणारे शब्द हे प्रश्न कत्यांना महत्त्वाचे वाटतातच असे नाही किंवा त्याने ज्या दृष्टीकोनाने प्रश्न विचारला आहे तो आपल्या जवळ असेलच असेही नाही . मग यावर नेमका उपाय कोणता ? तर वाचन करत असताना की , च , आणि , व , परंतु , किंवा यांसारख्या शब्दांना गोल करा , काही शब्दांचे समानार्थी शब्द शोधा . सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला असणारे ज्ञान आणि उताऱ्यामध्ये दिलेली माहिती यात गल्लत करु नका . समजा उताऱ्यात असे नमूद केले की , राहुल गांधी भारताचे पंतप्रधान आहेत . तर हेच अंतिम सत्य मानावे . In short , Don’t put your own knowledge .

४ ) वेळेचे नियोजन —
१२० मिनीटात आपल्याला ८० प्रश्न सोडवायचे आहेत . त्यामुळे त्यातील ५० प्रश्न उताऱ्याशी संबंधित येतात . एकूण १० उतारे असतात तर प्रत्येक उतारा हा ७ मिनीटात सोडवावा . म्हणजे ७० मिनीटे होतील . Decision Making ५ मिनीटात ५ पूर्ण करावे . अशाप्रकारे केवळ ७५ मिनीटात आपण १३७ . ५ गुणांचे प्रश्न पूर्ण सोडवतो . उर्वरित ४५ मिनीटात गणित व बुद्धिमत्ता सोडवावे आणि शेवटची ५ मिनीटे हे एकदा चेकींगसाठी द्यावेत . सर्वसाधारणपणे ७० – ७५ प्रश्न सोडवणे हे सर्वोत्तम आहे . त्यापेक्षा जास्त सोडवत असाल तर Accuracy चेक करत राहा . उतारे सोडवताना तमचा आत्मविश्वास हाच मोठा साथीदार आहे . आणि तो तुमचा तो तुमच्या सरावानेच विकसित होणार आहे .

2) बुद्धिमत्ता व अंकगणित –
या घटकाचे महत्त्वाचे मुद्दे एकाच गोष्टीशी संबंधित आहेत आणि ती गोष्ट म्हणजे सराव !सराव !! सराव !!!आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत ,प्रश्नांचा बदलत जाणरा trend , कोणत्या घटकाला किती आणि कसं महत्त्व दिले ते पहा .प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आलेले या घटकांचे प्रश्न सोडवणे. सरावासाठी R S Agrawal हा उत्तम पर्याय आहेच पण तो सोडवण्यासाठी खूप संयमाची आवश्यकता आहे .सध्या तर बुद्धिमत्तेचे अनेक प्रश्नही निव्वळ आकलनाच्या आधारेही सोडविता येतात. म्हणून हा घटक कमी गुणांना दिसत असला तरी त्याचीही महत्त्वही अनन्यसाधारण आहे.

3) निर्णयक्षमता –
या घटकाचे प्रयोजन तुम्ही निर्णय घेऊ शकता की नाही हे तपासणे नसून कोणत्या पदावर राहून कसा आणि कोणता विचार करता हे तपासणे आहेच .आपली भूमिकाही प्रशासन व सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून पाहण्याची आहेत यासाठी चार गोष्टींचा विचार करावा. त्याम्हणजे —
१.तुमची भूमिका कोणती आहे ? ( Role )
२.परिस्थिती काय दिलेली आहे ? ( Situation )
३.कोणत्या भागाशी संबंधित आहेत ? ( Area )
४.घेतलेल्या निर्णयाचा परिणाम कोणावर होणार आहे? ( Effect )

थोडक्यात परंतु अंतिम महत्त्वाचे काही मुद्दे –
१ . उतारा काळजीपूर्वक वाचला आहे सर्व संपूर्ण समजले आहे म्हणून सर्वच प्रश्न सोडवले गेलेच पाहिजे असा अट्टहास करु नका . एखादा प्रश्न सोडला तरीही चालेल .

२ . प्रश्न काळजीने लक्षपूर्वक वाचावा . म्हणजे काय विचारले आहे ते समजून घ्या . अयोग्य , अचूक , फक्त , केवळ हे शब्द विशेष अधोरेखीत करा . मग विधाने वाचा . प्रत्येक विधानाला स्वतंत्रपणे विचारात घ्या . ते चूक आहे की , बरोबर ते तिथेच ठरवा आणि अंतिम पर्याय निवडा .

३ . कोणताही उतारा पूर्णपणे सोडू नका . उतारा वाचताना तो अवघड वाटत असला तरी आपण २ – ३ प्रश्न नक्कीच सोडवू शकतो . म्हणून तो वाचायचाच .

४ . अनेकदा एखाद्या उताऱ्यावर आपण गरजेपेक्षा जास्त वेळ रेंगाळतो . त्यामुळे पुढचे वेळेचे आपले गणित चूकते . म्हणून अशा चूका करायचे टाळा .

५. पेपर चे कोणतेही नियोजन करण्याआधी पेपर हातात आला की तो दोन-तीन मिनिटांत पूर्ण पहा नेहमीप्रमाणेच असेल तर नियोजनाची अंमलबजावणी करा परंतु वेगळा असेल तर

First plan out Your Strategy then work out Your Plan…

या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या तर एक गोष्ट ठळकपणे स्पष्ट होते की , पूर्व परीक्षा पास करायचीच असेल तर CSAT आणि त्यामध्येही उताऱ्यांना काहीच पर्याय नाही . त्यामुळे वर्षभर ज्याच्या मागे आपण अविरतपणे पळत असतो तो GS थोडासा मनातून डोक्यातून बाजूला सारुन निखळ , स्पष्ट विचारहीन मन आणि बुद्धी यांचा समतोल ताळमेळ साधणे गरजेचे आहे . वेळेत सराव करणे , वेळेचे योग्य नियोजन करणे , Accuracy चे शिखर गाठणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आणि जितकं सांगितले आहे , त्यावरच भर देणे हेच CSAT चे खरे सूत्र आहे .