Wednesday, 22 January 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


(4) कोणत्या खेळाडूने रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?
(1)बबिता कुमारी
(2)विनेश फोगट✅✅
(3)साक्षी मलिक
(4)लुईसा एलिझाबेथ वाल्व्हर्डे

⚛⏩SOLUTION ⏩रोममध्ये झालेल्या रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगट हिने 53 किलोग्रॅम वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकले. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

(5) शांघाय सहकार्य संघटना (SCO) यांच्या सरकारांच्या प्रमुखांची 19 वी परिषद कोणता देश आयोजित करणार आहे?
(1)भारत✅✅
(2)रशिया
(3)चीन
(4)कझाकस्तान

⚛⏩Solution ⏩2020 साली होणार्‍या शांघाय सहकार्य संघटना (SCO) यांच्या सरकारांच्या प्रमुखांची (पंतप्रधानांची) 19 वी परिषद भारत देश आयोजित करणार आहे. शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 2001 साली झाली आणि त्याचे मुख्यालय चीनच्या बिजींग या शहरात आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.  चीन हा याचा संस्थापक देश आहे.

(6)कोणत्या राज्यात प्रथम ‘कृषी मंथन’ (अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातली सर्वात मोठी शिखर परिषद) सुरू झाली?
(1) तेलंगणा
(2) आसाम
(3) दिल्ली
(4) गुजरात✅✅

⚛⏩Solution ⏩गुजरातच्या IIM अहमदाबाद यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम ‘कृषी मंथन’ या अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिखर परिषदेला सुरूवात झाली.

(7) कोणत्या शहरात इंधनाच्या संवर्धनासाठी PCRAच्या 'सक्षम 2020' नावाच्या जागृती मोहीमेला सुरूवात करण्यात आली?
(1)बेंगळुरू
(2)हैदराबाद
(3)नवी दिल्ली✅✅
(4)लखनऊ

⚛⏩Solution ⏩पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेकडून (PCRA) ‘सक्षम’ नावाने इंधन बचतीविषयी महिन्याभराची लोक-केंद्रित मोहीम राबवली जात आहे. 16 जानेवारी 2020 रोजी दिल्लीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन झाले.

(8)29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
(1)के. शिव रेड्डी
(2)ममता कालिया
(3)वासदेव मोही✅✅
(4)यापैकी नाही

⚛⏩SOLUTION ⏩सिंधी लेखक वासदेव मोही ह्यांना त्यांच्या ‘चेकबुक’ शीर्षक असलेल्या कथासंचासाठी 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार देण्यात आला. सरस्वती सन्मान के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जातो.

(9) ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?
(1)दक्षिण आफ्रिका✅✅✅
(2)भारत
(3)ऑस्ट्रेलिया
(4)न्युझीलँड

⚛⏩SOLUTION ⏩‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जात आहे. ही स्पर्धा 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत चालणार आहे.

(10) कोणत्या व्यक्तीची पुढील तीन वर्षांसाठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
(1)मायकेल देबाब्रत पात्रा✅✅
(2)विरल आचार्य
(3)एस. एस. मुंद्रा
(4)एच. आर. खान

⚛⏩SOLUTION ⏩भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. शक्तिकांत दास हे वर्तमान RBI गव्हर्नर आहेत. RBIचे इतर तीन डेप्युटी गव्हर्नर - एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो आणि एम. के. जैन.

⚛⚛ ____________ येथे ‘राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम’ याला सुरुवात झाली.

(A) पुडुचेरी✅✅
(B) रांची
(C) नवी दिल्ली
(D) रायपूर

⚛⚛नुकतेच निधन झालेले रॉकी जॉनसन हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

(A) कुस्ती✅✅
(B) फुटबॉल
(C) क्रिकेट
(D) हॉकी

⚛⚛2019 या सालासाठी जल-विषयक कार्यक्षमतेच्या ध्येयावर आधारित असलेला केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागांच्या क्रमवारीतेमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले?

(A) दिल्ली
(B) गुजरात✅✅
(C) मध्यप्रदेश
(D) राजस्थान

शिव केंद्रे:
⚛⚛....यांनी 1929 ते 1944 दरम्यान मद्रास प्रांताचे अँडव्होकेट जनरल म्हणून कार्य केले होते.
1)एन गोपालस्वामी अय्यंगार
2)अल्लादि कृष्णस्वामी अय्यर✅✅
3)स द मुहम्मद सादुल्लाह
4)डॉ के एन मुन्शी

Pratiksha M:
⚛⚛कोणत्या राज्यात “परशुराम कुंड मेळावा’ या उत्सवाला सुरुवात झाली?
(1)हिमाचल प्रदेश
(2)उत्तराखंड
(3)अरुणाचल प्रदेश✅✅
(4)त्रिपुरा

⚛⚛कोणत्या व्यक्तीची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
(1)ए. पी. माहेश्वरी✅✅
(2)एस. एस. देसवाल
(3)राजीव राय भटनागर
(4)रजनी कांत मिश्रा

⚛⚛⏩Solution ⚛केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.

⚛⚛कोणत्या स्थळाचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे?
(1)स्टॅच्यू ऑफ युनिटी✅✅
(2)कॅपिटल कॉम्प्लेक्स
(3)अजिंठा लेणी
(4)बॅसिलिका ऑफ बॉम जिझस

⚛⏩SOLUTION ⏩जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर सात आश्चर्य - तमगलीचा भूप्रदेश (Archaeological Landscape of Tamgaly), कझाकस्तान; डॅमिंग पॅलेस, चीन; इसिक-कुल तलाव, किर्गिस्तान; मुघल घराण्याचा वारसा, पाकिस्तान; गोल्डन रिंग, रशिया; कोही नवरोझ पॅलेस, ताजिकिस्तान आणि बुखाराचे ऐतिहासिक केंद्र, उझबेकिस्तान

⚛⚛______ येथे ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ आहे ?
(1)गुवाहाटी✅✅
(2)इंफाळ
(3)कोहिमा
(4)कोलकाता

⚛⚛SOLUTION ⏩आसामच्या गुवाहाटी या शहरात असलेले ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ (CBTC) ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्य करते.

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून आढावा

🔰 गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

🔰 केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरण रिजीजू यांनी आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद यांच्यासमवेत आयोजित बैठकीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा आढावा घेतला.

🔰 गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2020 या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 

🔰 स्पर्धेत एकूण 37 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

🔰 त्यापैकी दोन क्रीडाप्रकार दिल्ली येथे घेण्यात येतील.

🔰 उर्वरीत 35 क्रीडाप्रकार राज्यात होतील.

🔰 केंद्रीय मंत्र्यांनी आज सचिवालयात झालेल्या बैठकीत तयारीचा आढावा घेतला.

🔰 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व स्टेडिअम सुसज्ज असतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. तसेच 31 ऑगस्ट पर्यंत स्पर्धेसाठीची सर्व साधनं स्टेडिअम आणि इतर ठिकाणी तयार असतील.

🔰 स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या 71 प्रमुख सेवांसाठीच्या कंत्राटाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

🔰 डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअम-बांबोळी, बी के एस स्टेडिअम-म्हापसा, टिळक मैदान- मडगाव आणि जवाहरलाल नेहरु स्टेडिअम-फातोर्दा याठिकाणी प्रमुख क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार आहे.

🔰 राज्यात आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरतील, असे किरण रिजीजू म्हणाले.

🔰 केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून राज्याला स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर

- ग्रीनपीसचा वायू प्रदूषण अहवाल जाहीर; मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित

- भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.

- दिल्ली वर्षांपूर्वी आठव्या स्थानावर होते. झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते देशातील दुसरे प्रदूषित ठिकाण आहे. यात पीएम १० कणांचे प्रमाण देशातील २८७ शहरांत मोजण्यात आले.

- मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित असून त्या खालोखाल मेघालयच्या डोवकी या ठिकाणांचा कमी प्रदूषणात दुसरा क्रमांक आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दहा उत्तर प्रदेशात असून त्यात नॉइडा, गाझियाबाद, बरेली, अलाहाबाद, मोरादाबाद, फिरोजाबाद यांचा समावेश आहे. दक्षिणेकडे सर्वाधिक प्रदूषित शहरात एकूण २८ ठिकाणांचा समावेश असला, तरी त्यात केरळमधील एकही ठिकाण नाही.

- ग्रीनपीसच्या भारतीय शाखेने एअरोपोकॅलप्स ४ अहवाल मंगळवारी जारी केला असून त्यात देशातील शहरांच्या हवा प्रदूषणाचा ताळेबंद मांडला आहे. २०१८ मध्ये देशातील एकूण २८७ शहरांच्या हवेचे ५२ दिवस निरीक्षण करून असे सांगण्यात आले, की २३१ शहरांत पीएम १० कणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपेक्षा अधिक आहे. भारतात पीएम दहा कणांचे २४ तासांना १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर वर्षांला सरासरी ६० मायक्रोग्रॅम घनमीटर इतके प्रमाण सुरक्षित मानले गेले आहे. झारखंडमधील झारिया येथे पीएम १० कणांचे प्रमाण प्रतिघनमीटरला ३२२ मायक्रोग्रॅम होते. धनबाद व नॉइडात ते प्रतिघनमीटरला २६४ मायक्रोग्रॅम होते. गाझियाबादेत २४५ मायक्रोग्रॅम होते.

- कर्नाटकातील बंगळूरु, रायचूर, बेळगावी, तुमकुरु, कोलार, बिजापूर, हुबळी, धारवाड, बागलकोट ही शहरे जास्त प्रदूषित आहेत.

- तमिळनाडूत त्रिची, थुतूकोडी, मदुराई, चेन्नई तर तेलंगणात कोठूर, हैदराबाद, रामगुंडम, करीमनगर, वारंगळ, खम्मम, संगारेड्डी, पटेनतुरू, अदिलाबाद ही शहरे प्रदूषित आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा, विशाखापट्टनम, काकीनाडा, राजमुंद्री, श्रीकाकुलम, अनंतपूर ही ठिकाणे प्रदूषित आहेत. केरळमध्ये एकाही शहरातील हवेत पीएम १० कणांचे प्रमाण धोकादायक दिसले नाही. तेथे कमाल प्रमाण दर घनमीटरला ५७ मायक्रोग्रॅम होते.

▪️सरकारला शिफारस

- भारत सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी) तयार केला असून त्यात जास्त शहरांचा समावेश करावा, असे ग्रीनपीसचे म्हणणे आहे.

केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर प्रदेशातली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू.

🎆 जम्मू-कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात कालपासून प्रीपेड मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

🎆 काश्मीर खोर्‍यात दोन जिल्ह्यातील टू-जी सेवाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली.

🎆 या सेवा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या.

🎆 या प्रदेशात सर्वत्र एस.एम.एस सेवाही सुरू झाली आहे. मोबाईल सिमद्वारे इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांची ओळख पटवण्याचं काम मोबाईल सेवा कंपन्यांनी करायचं आहे.

🎆 ही सेवा जम्मू विभागातल्या सर्व दहा आणि कूपवाडा आणि बांदिपूर या काश्मीर खोर्‍यातील जिल्ह्यांमधे दिली जात आहे. 

🎆 ५ ऑगस्ट २०१९ ला संविधानाच्या ३७० कलमाच्या दुरूस्तीद्वारे जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द होऊन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमधे विभाजन झाल्यानंतर या सेवा थांबवण्यात आल्या होत्या.

🔹

भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन आज दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संयुक्तरित्या होणार

🎆 भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या आज होणार आहे.

🎆 उभय देशांचे प्रधानमंत्री आज सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पाचं उदघाट्न करतील. 

🎆 भारत आणि नेपाळदरम्यान एक हजार ८५० किलोमीटरची सीमारेषा आहे. दोन्ही देशातून नागरिकांची ये-जा सुरु असते.

🎆 यासह जोगबनी-विराटनगर आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र दोन्ही देशांमधल्या व्यापाराचं महत्वाचं स्थान आहे. 

🎆 २६० एकर जागेवर १४० कोटी रुपये खर्च करून ही तपासणी चौकी उभारली आहे.

🎆 परदेशी नागरिकांसाठी इमिग्रेशन व्यवस्था, मालाच्या आयात निर्यातीसाठी सुविधा या चौकीमध्ये आहेत. दररोज सुमारे ५०० ट्रक येतील अशी व्यवस्था यात केलेली आहे. 

🎆 नेपाळमध्ये भूकंपानंतर भारताच्या मदतीनं सुरु असलेल्या घर पुनर्निर्माण प्रकल्पाच्या प्रगतीचा नरेंद्र मोदी आणि के. पी. ओली आढावा घेतील.

🎆 नेपाळच्या गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यात पन्नास हजार घरं बांधण्यासाठी  भारतानं नेपाळला आर्थिक मदत दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ९१ टक्के घरं बांधून पूर्ण झाली आहेत. 

आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर.

🎆 आंध्र प्रदेशात विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत.

🎆 सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर केलं.

🎆 या विधेयकानुसार विशाखापट्टणम कार्यपालीकेची, तर अमरावती विधिमंडळाची आणि कुर्नुल न्यायपालिकेची राजधानी प्रस्तावित आहे. 

🎆 राज्याचे विविध विभाग पाडण्याची तरतूद या विधेयकात आहे. विभागीय योजना आणि विकास मंडळं स्थापन करणं हा यामागचा उद्देश आहे.

🎆 आज हे विधेयक आंध्रप्रदेशाच्या विधानपरिषदेत मांडलं जाईल. ५८ सदस्य असलेल्या विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाचे केवळ ९ सदस्य असल्यामुळे हे विधेयक मंजूर करून  घेणं हे सरकारपुढचं आव्हान आहे. 

हिंदी महासागरात चीनवर वचक ठेवणार भारताचा ‘टायगर’.

🎆 बंगालची खाडी आणि हिंदी महासागर क्षेत्राचा भागभारतासाठी रणनितीक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे.

🎆 अलीकडच्या काळात या भागात चिनी नौदलाच्या हालचाली मोठया प्रमाणात वाढल्या आहेत.

🎆 चीनच्या या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारताकडे आता घातक शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत.

🎆 शत्रूच्या विमानवाहू युद्ध नौकांना दूर अंतरावरुन तसेच महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.

🎆 तर रात्रीच्यावेळी किंवा कुठल्याही वातावरणात शत्रूवर अत्यंत अचूकतेने प्रहार करता येईल.

🎆 तामिळनाडूतील तंजावर एअर बेसवर इंडियन एअर फोर्स सुपसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली सुखोई-30 एमकेआयची स्क्वाड्रन तैनात करणार आहे.

🎆 तसेच सुखोई-30 हे खास नौदलासाठी विकसित केलेले विमान नाही. पण या फायटर जेटवर समुद्रातील टार्गेटसना लक्ष्य करण्याची जबाबदारी असेल.

🎆 ब्रह्मोसमुळे सुखोईची हल्ला करण्याची क्षमत कैकपटीने वाढली आहे असे एअर फोर्स प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले.

🎆 सुखोई आणि ब्रह्मोस एकत्र आल्यामुळे एअर फोर्सला दूर अंतरावरुनच समुद्र किंवा जमिनीवरील कुठल्याही लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची क्षमता प्राप्त करुन देण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे असे ब्रह्मोस प्रकल्पाचे महासंचालक सुधीर मिश्रा म्हणाले.

ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर.

🎆 ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर येत्या शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. 26 जानेवारीला होणाऱ्या 71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे ते प्रमुख पाहुणे असतील. 

🎆 त्यांच्यासोबत सात मंत्र्यांचं प्रतिनिधी मंडळ, ब्राझीलच्या संसदेतले ब्राझील-भारत मैत्री गटाचे अध्यक्ष, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचं मोठं प्रतिनिधीमंडळही, भारत भेटीवर येत आहे. 

🎆 बोल्सोनॅरो, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 25 जानेवारीला भेट घेणार असून राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित; हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.

✅ ग्रीनपीस इंडिया संस्थेचा अहवाल

🎆 भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे.

🎆 मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे.

🎆 ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

🎆 हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे.

🎆 मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

🎆 मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येते.

🎆 सुमारे वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातदेखील मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या उत्सर्जनात वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते.

🎆 जानेवारी २०१९ मध्ये भारतासाठी पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

🎆 याअंतर्गत २०१७ पासून २०२४ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक शहरासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

🎆 ग्रीनपीसच्या अहवालात असेही म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ १२२ सर्वाधिक प्रदूषित शहरे ओळखली आहेत. ही १२२ शहरे २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

🎆 त्यातील १६६ शहरांनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या शहरांचाही समावेश सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत करावा.

✅✅ २० शहरे अतिप्रदूषित :

🎆 हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत(पीएम१०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.

🎆 डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी येथील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे.

🎆 ग्रीनपिसच्या अभ्यासानुसार, डोंबिवली, ठाणे, पिंपरी, चिंचवड, नवी मुंबई आणि भिवंडी ही शहरे नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत.

🔹

शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश.

🎆 शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला.

🎆 सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे.

🎆 येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी करायला सांगितलं आहे.

🎆 शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाणी पिण्याची घंटा-वॉटरबेल वाजवण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत.

🎆 काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

🎆 शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा अशी घंटा वाजवण्याची सूचना यात केली आहे. 

🎆 मुलांनी दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

अर्थशास्त्र - PSI/STI/ASO चे questions

1) अन्न वस्त्र निवारा याबरोबरच ....ही व्यक्तीची मूलभूत गरज आहे.
1)शिक्षण.   √
2)पाणी
3)विश्रांती
4)प्रवास

2)भारताच्या पंतप्रधानांनी "जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण कार्यक्रम .... रोजी सुरू केली.
1)2001
2)2002
3)2004
4)2005.   √

3)सौर शक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे?
1)व्यापारी
2)व्यापारेत्तर
3)अपारंपरिक.   √
4)पारंपरिक

4)शहरी भागातील दर .....लोकसंख्येमागे एक पीसीओ हे राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 1994 चे एक उद्दिष्ट होते.
1)500.   √
2)1,500
3)2,500
4)5000

5)रशियातील राष्ट्रीय खनिज संशोधन केंद्र स्कोचीन्स्की खनिज संस्थेशी सहयोग करार कोणी केला?
1)HPCL
2)NTPC
3)GAIL
4)ONGC.   √

6)अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील सरकारी संस्था कोणती?
1)इंडियन पेट्रोकेमिकल लि
2)पेट्रोलियम कॉन्झव्हेरशन रिसर्च असोसिएशन.   √
3)हिंदुस्तान पेट्रोकेमिकल लि
4)नॅशनल थर्मोपावर कंपनी

7)सार्वजनिक क्षेत्रातील अनेक प्रकल्प सध्या कोणत्या तत्वानुसार केले जात आहेत?
1)नफा
2) ना नफा ना तोटा
3)बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा.   √
4)सीमांत खर्च

8)भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा महामार्ग कोणता आहे?
1)रस्ते
2)रेल्वे
3)जल.   √
4)हवाई

9)दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत साधन कोणते आहे?
1)दूरदर्शन
2)रेडिओ
3)पोस्ट
4)कृत्रिम उपग्रह.    √

10)एकात्मतिक ग्रामीण विकास कार्यक्रम  कोणी पुरस्कृत केला.
1)राज्य सरकार
2)जिल्हा परिषद
3)महानगरपालिका
4)केंद्र सरकार.    √

11)"नागरी सुधारणांची ग्रामीण भागात तरतूद" हा कार्यक्रम .....यांनी सुचवला.
1)डॉ मनमोहन सिंग
2)डॉ ए पी जी अब्दुल कलाम.  √
3) श्री राजीव गांधी
4)श्रीमती इंदिरा गांधी

12)महाराष्ट्राचे भारनियमनाचे प्रमुख कारण कोणते आहे?
1)वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती.  √
2)योग्य व्यवस्थापणेचा अभाव
3)पाराशेणातील गळती
4)चुकीचे सरकारी धोरण

13)" बांधा चालावा आणि हस्तांतरित करा" (BOT) शी संबंधित कायदा कोणता?
1)राज्य महामार्ग कायदा 1994
2)(BOT) कायदा 1993
3)राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995.  √
4)खाजगीकरण कायदा 1991

14)आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
1)बँका, वित्त आणि विमा
2)सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार
3)विज्ञान आणि तंत्रज्ञान
4)वरील पैकी सर्व.  √

15)रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये MSRDC  ची स्थापना कधी झाली?
1)1993
2)1994
3)1995
4)1996.  √

16) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते
1)केंद्र सरकार
2)राज्य सरकार
3)1 व 2    √
4) यापैकी नाही