१७ जानेवारी २०२०

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फेब्रुवारीत भारत दौरा

🔰 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला पहिला भारत दौरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुढील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

🔰 डोनाल्ड ट्रम्प भारत दौरा करणार असल्याचे निश्चित झाले असून ते फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. गेल्यावर्षी गणराज्य दिनाच्या समारंभासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने निमंत्रण दिले होते. परंतु, ते या समारंभाला आले नव्हते.

🔰 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा निश्चित होत असल्याने भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

🔰 भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये या विषयी चर्चा सुरु आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

🔰 २००९ नंतर भारताचा विकास दर खाली आला आहे. तसेच भारतात सीएए आणि एनआरसीवरून देशभरात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. देशात वातावरण असे असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा दौरा होत आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

🔰 गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता. 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताचा दौरा करणार आहेत.

🔰 ह्युस्टमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प मोदीसोबत व्यासपीठावर दिसले होते. तसेच या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली होती.

महत्त्वाचे पोलीस भरती प्रश्नसंच


1) ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन कोठे होणार आहे?
✅.   भुवनेश्वर

2) कोणता खेळाडू 21 वर्षांखालील पुरुष एकेरी गटाचा जगातला प्रथम क्रमांकाचा टेबल टेनिसपटू ठरला?
✅.   मानव ठक्कर

3) कोणत्या संस्थेनी ‘भारतात साखरेचे सेवन’ या विषयावर पहिला अहवाल प्रसिद्ध केला?
✅.   भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

4) ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॉलेज हब’चे उद्घाटन कुठे झाले?
✅.  नवी दिल्ली

5) 11 वी ‘डिफेन्स एक्सपो इंडिया-2020’ ही प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
✅.  लखनऊ

6) नसीम-अल-बहर हा द्विपक्षीय नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान सुरु आहे?
✅.   भारत आणि ओमान

7) ‘शेतकरी विज्ञान परिषद’ कुठे आयोजित करण्यात आली?
✅.  बेंगळुरू

8) 'कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण' कोणत्या मंत्रालयातील सर्वोच्च मंडळ आहे?
✅.   वाणिज्य व उद्योग मंत्रालय

9) गुजरात राज्य सरकारने 9 लक्ष कर्मचार्‍यांना लाभ देण्यासाठी महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढवला?
✅.  5 टक्के

10) कोणती कंपनी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCD) याच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये उभारणार आहे?
✅.   वेदांत लिमिटेड

11) ‘ASCEND 2020’ ही जागतिक गुंतवणूकदारांची बैठक कुठे आयोजित केली गेली?
✅. कोची

12) बक्सा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
✅.   पश्चिम बंगाल

13) ‘प्रवासी भारतीय दिवस’ कधी साजरा केला जातो?
✅.   9 जानेवारी'

14) स्पेन या देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
✅.   पेद्रो सांचेझ
,-
15) 'सुकन्या' प्रकल्प हा कोणत्या विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी चालू केलेला उपक्रम आहे?
✅.  कोलकाता पोलीस

16) क्रोएशियाचे राष्ट्रपती कोण आहे?
✅.  झोरान मिलानोव्हिक

17) डॉ. वाय.एस.आर. आरोग्यश्री योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
✅.  आंध्रप्रदेश

18) कोणते राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करते?
✅.  मिझोरम

19) ISRO ही संस्था कुठे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर' उभारणार आहे?
✅.   छल्लाकेरे (कर्नाटक)

20) पद्मभूषण अकबर पदमसी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
✅.  पत्रकारिता

21) मराठी भाषेत एकूण वर्ण किती?
✅.  48

22) 'माय प्रेसिडेंशियल इयर्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
✅. आर. व्यंकटरमण

23) म्यानमारच्या समाजजीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ?
✅.  बौध्द धर्म

24) न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?
✅.   केंद्र-राज्य संबंध

25) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे ?
✅.   नवी दिल्ली

26) 2011 च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेत सर्वात शेवटचे राज्य कोणते ?
✅.  राजस्थान

27) 'शांतता ! कोर्ट चालू आहे. ' हे नाटक कोणी लिहिले ?
✅.  विजय तेंडुलकर

28) यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ?
✅.   अलाहाबाद

29) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष कोण असतात ?
✅.  पंतप्रधान

30) भारतातही सर्वात पूर्वेकडे असलेले राज्य कोणते?
✅.  अरुणाचल प्रदेश

GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण:-

● भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
● जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-३०चं यशस्वी उड्डाण केलं आहे.
● GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.
● या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. यापूर्वी इनसॅट-४ए हा उपग्रह २००५मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आता हा नवा उपग्रह लॉन्च करण्यात आला असून त्यामुळे भारतातील दूरसंचार सेवेत सुधारणा होणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. विशेष म्हणजे मोबाइल सेवा ज्या क्षेत्रात अद्याप पोहचू शकलेल्या नाहीत, त्या क्षेत्रात या नव्या उपग्रहामुळे मोबाइल सेवा पोहचू शकणार आहेत. या व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकित वर्तवण्यासाठीह या उपग्रहाची मदत होणार आहे.
● 2020 मध्ये भारताकडून एकूण १० उपग्रह लॉन्च करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल१ उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला २०२०पर्यंत लॉन्च केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह असेल. इस्रोने गेल्या वर्षी ६ लॉन्च वाहन आणि ७ सॅटेलाइट लॉन्च केले होते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...