Thursday, 16 January 2020

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फेब्रुवारीत भारत दौरा

🔰 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला पहिला भारत दौरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुढील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

🔰 डोनाल्ड ट्रम्प भारत दौरा करणार असल्याचे निश्चित झाले असून ते फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. गेल्यावर्षी गणराज्य दिनाच्या समारंभासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने निमंत्रण दिले होते. परंतु, ते या समारंभाला आले नव्हते.

🔰 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा निश्चित होत असल्याने भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

🔰 भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये या विषयी चर्चा सुरु आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

🔰 २००९ नंतर भारताचा विकास दर खाली आला आहे. तसेच भारतात सीएए आणि एनआरसीवरून देशभरात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. देशात वातावरण असे असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा दौरा होत आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

🔰 गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता. 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताचा दौरा करणार आहेत.

🔰 ह्युस्टमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प मोदीसोबत व्यासपीठावर दिसले होते. तसेच या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली होती.

महत्त्वाचे पोलीस भरती प्रश्नसंच


1) ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन कोठे होणार आहे?
✅.   भुवनेश्वर

2) कोणता खेळाडू 21 वर्षांखालील पुरुष एकेरी गटाचा जगातला प्रथम क्रमांकाचा टेबल टेनिसपटू ठरला?
✅.   मानव ठक्कर

3) कोणत्या संस्थेनी ‘भारतात साखरेचे सेवन’ या विषयावर पहिला अहवाल प्रसिद्ध केला?
✅.   भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

4) ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॉलेज हब’चे उद्घाटन कुठे झाले?
✅.  नवी दिल्ली

5) 11 वी ‘डिफेन्स एक्सपो इंडिया-2020’ ही प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
✅.  लखनऊ

6) नसीम-अल-बहर हा द्विपक्षीय नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान सुरु आहे?
✅.   भारत आणि ओमान

7) ‘शेतकरी विज्ञान परिषद’ कुठे आयोजित करण्यात आली?
✅.  बेंगळुरू

8) 'कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण' कोणत्या मंत्रालयातील सर्वोच्च मंडळ आहे?
✅.   वाणिज्य व उद्योग मंत्रालय

9) गुजरात राज्य सरकारने 9 लक्ष कर्मचार्‍यांना लाभ देण्यासाठी महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढवला?
✅.  5 टक्के

10) कोणती कंपनी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCD) याच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये उभारणार आहे?
✅.   वेदांत लिमिटेड

11) ‘ASCEND 2020’ ही जागतिक गुंतवणूकदारांची बैठक कुठे आयोजित केली गेली?
✅. कोची

12) बक्सा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
✅.   पश्चिम बंगाल

13) ‘प्रवासी भारतीय दिवस’ कधी साजरा केला जातो?
✅.   9 जानेवारी'

14) स्पेन या देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
✅.   पेद्रो सांचेझ
,-
15) 'सुकन्या' प्रकल्प हा कोणत्या विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी चालू केलेला उपक्रम आहे?
✅.  कोलकाता पोलीस

16) क्रोएशियाचे राष्ट्रपती कोण आहे?
✅.  झोरान मिलानोव्हिक

17) डॉ. वाय.एस.आर. आरोग्यश्री योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
✅.  आंध्रप्रदेश

18) कोणते राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करते?
✅.  मिझोरम

19) ISRO ही संस्था कुठे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर' उभारणार आहे?
✅.   छल्लाकेरे (कर्नाटक)

20) पद्मभूषण अकबर पदमसी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
✅.  पत्रकारिता

21) मराठी भाषेत एकूण वर्ण किती?
✅.  48

22) 'माय प्रेसिडेंशियल इयर्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
✅. आर. व्यंकटरमण

23) म्यानमारच्या समाजजीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ?
✅.  बौध्द धर्म

24) न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?
✅.   केंद्र-राज्य संबंध

25) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे ?
✅.   नवी दिल्ली

26) 2011 च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेत सर्वात शेवटचे राज्य कोणते ?
✅.  राजस्थान

27) 'शांतता ! कोर्ट चालू आहे. ' हे नाटक कोणी लिहिले ?
✅.  विजय तेंडुलकर

28) यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ?
✅.   अलाहाबाद

29) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष कोण असतात ?
✅.  पंतप्रधान

30) भारतातही सर्वात पूर्वेकडे असलेले राज्य कोणते?
✅.  अरुणाचल प्रदेश

GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण:-

● भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
● जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-३०चं यशस्वी उड्डाण केलं आहे.
● GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.
● या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. यापूर्वी इनसॅट-४ए हा उपग्रह २००५मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आता हा नवा उपग्रह लॉन्च करण्यात आला असून त्यामुळे भारतातील दूरसंचार सेवेत सुधारणा होणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. विशेष म्हणजे मोबाइल सेवा ज्या क्षेत्रात अद्याप पोहचू शकलेल्या नाहीत, त्या क्षेत्रात या नव्या उपग्रहामुळे मोबाइल सेवा पोहचू शकणार आहेत. या व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकित वर्तवण्यासाठीह या उपग्रहाची मदत होणार आहे.
● 2020 मध्ये भारताकडून एकूण १० उपग्रह लॉन्च करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल१ उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला २०२०पर्यंत लॉन्च केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह असेल. इस्रोने गेल्या वर्षी ६ लॉन्च वाहन आणि ७ सॅटेलाइट लॉन्च केले होते.

पोलीस भरती प्रश्नसंच


1) पोलिओ हा रोग ---------- पासून होतो.

1) जिवाणू
2) विषाणू
3) कँल्शियम
4) वेगळे उत्तर

2) जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने --------या चवीचे ज्ञान  होते.

1) कडू
2) गोड
3) खारट
4) आंबट

3) लोहित पेशी मानवाच्या -----------मध्ये निर्माण होतात.

1) यकृतात
2) हृदयात
3) प्लिहेत
4) अस्थिमज्जेत

4) प्रकाश संश्लेषण क्रियेमंध्ये ----------वायूची गरज असते.

1) आँक्सिजन
2) हायड्रोजन
3) कार्बनडाय आँक्साईड
4) नायट्रोजन

5) 1 किलोबाईट ( केबी)  = -----------बाईटस् .

1) 1048
2) 1000
3) 100
4) 1024

6) गोराळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ?

1) डेक्कन कालेज
2) फर्गुसन काॅलेज
3) वाडिया काॅलेज
4) विल्सन काॅलेज

7) 1857 च्या उठावात नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा --------यांनी केला.

1) ग्रँट डफ
2) वि.म.सावरकर
3) न्यायमूर्ती रानडे
4) गो.ग.आगरकर

8) प्रथम "वैयक्तिक सत्याग्रही " म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे कोण। ?

1) डाँ.राजेंद्रप्रसाद
2) पं.नेहरू
3) वल्लभभाई पटेल
4) सी. राजगोपालचारी

9) "शारदा सदन " ही संस्था कोणी स्थापन केली ?

1) शाहू महाराज
2) महात्मा फुले
3) पंडिता रमाबाई
4) सावित्रीबाई फुले

10) " पाँवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया " हा ग्रंथ कोणी लिहिला ?

1) न्यायमूर्ती रानडे
2) दादाभाई नौरोजी
3) फिरोजशहा मेहता
4) स्वा. सावरकर

11) " रेगूर मृदा " कोणत्या मृदेस म्हणतात ?

1) तांबडी मृदा
2) जांभळी मृदा
3) काळी मृदा
4) गाळाची मृदा

12) जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे ?

1) श्रीलंका
2) आँस्ट्रेलिया
3) व्हँटिकन सिटी
4) हाँगकाँग

13) जागाच्या एकूण भूभागापैकी -----------% क्षेत्र भारताने व्यापले आहे .

1) 2.4
2) 3.8
3) 2.8
4) 3.0

14) "अंकलेश्वर खनिज तेल "क्षेत्र ----------राज्यात आहे.

1) गुजरात
2) आसाम
3) महाराष्ट्रात
4) मध्यप्रदेश

15) भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे ?

1) 9.31%
2) 19.42%
3) 8.90%
4) यापैकी नाही

16) तुटीच्या अर्थ भरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो ?

1) भावसंकोच
2) भाववाढ
3) निर्यात वाढ
4) यापैकी कोणतेही नाही

17) किंमत निर्देशांक तयार करताना पाया वर्ष कोणते असावे ?

1) तेजीचे वर्ष
2) मंदीचे वर्ष
3) युध्दजन्य वर्ष
4) सामान्य वर्ष

18) सध्या देशात खुल्या अर्थव्यवस्थेचे व उदार आर्थिक धोरणाचे वारे वाहत आहेत. आर्थिक क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप कमीत - कमी राहावा,  असे ---------या अर्थशास्त्रज्ञाने आग्रहाने प्रतिपादन केले जाते.

1) जाँन माल्थस
2) वि.म.दांडेकर
3) अँडम स्मिथ
4) नीलकंठ रध

19) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पात्र लाभार्थी खालीलपैकी कोण असू शकतात ?

1) अनुसूचित जाति व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील प्रौढ व्यक्ति
2) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या प्रौढ व्यक्ति
3) मागासवर्गीय कुटुंबातील प्रौढ व्यक्ति
4) कुठल्याही कुटुंबातील प्रौढ व्यक्ति

20) भारतात सर्वात जास्त व्यापार -----या संघटनेशी होतो.

1) SAARC
2) OPEC
3) BIMSTEC
4) यापैकी नाही

21) विधेयक वित्त विधेयक आहे किवां नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो ?

1) राष्ट्रपती
2) उपराष्ट्रपती
3) लोकसभेचा सभापती
4) प्रंतप्रधान

22) --------घटना दुरूस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मुलभूत हक्कामधून वगळण्यात आले.

1) 42
2) 44
3) 45
4)46

23) "सत्यमेव जयते " हे बोधवाक्य -----------या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे .

1) ॠगवेद
2) मनुस्मृती
3) भगवदगीता
4) मंड्डकोपनिषद

24) घटनाकारांच्या मते, भारतीय घटनेची गुरूकिल्ली म्हणजे ---------हे होय.

1) घटनेचा मसुदा
2) मुलभूत अधिकार
3) घटनेचा सरनामा
4) मार्गदर्शक तत्वे

25) राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?

1) राष्ट्रपती
2) महान्यायवादी
3) उपराष्ट्रपती
4) प्रंतप्रधान

26) ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी -------------असतात.

1) ज्येष्ठपंच
2) ग्रामसेवक
3) सरपंच
4) पोलीस पाटील

27) जिल्हा परिषद निवडणूक खर्च मर्यादा किती ?

1) तीन लाख
2) दोन लाख
3) पाच लाख
4) आठ लाख

28) महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ---------पासून अंमलात आली.

1) 1 में 1960
2) 1 में 1961
3) 1 में 1962
4) 1 में 1964

29) पोलीस पाटील यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते ?

1) जिल्हाधिकारी
2) प्रांत अधिकारी
3) तहसीलदार
4) गटविकास अधिकारी

30) --------- हे जिल्हा परिषदेचे पदसिध्द सभासद असतात.

1) आमदार
2) जिल्हा परिषद अध्यक्ष
3) सरपंच
4) पंचायत समिती सभापती

Answer key

1-2
2-2
3-4
4-3
5-4
6-2
7-1
8-2
9-3
10-2
11-3
12-3
13-1
14-1
15-1
16-2
17-4
18-1
19-4
20-4
21-3
22-2
23-4
24-3
25-3
26-3
27-1
28-3
29-2
30-4

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1) मराठी भाषेत एकूण वर्ण किती?
उत्तर : 48

2) 'माय प्रेसिडेंशियल इयर्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : आर. व्यंकटरमण

3) म्यानमारच्या समाजजीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ?
उत्तर : बौध्द धर्म

4) न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?
उत्तर : केंद्र-राज्य संबंध

5) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : नवी दिल्ली

6) 2011 च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेत सर्वात शेवटचे राज्य कोणते ?
उत्तर : राजस्थान

7) 'शांतता ! कोर्ट चालू आहे. ' हे नाटक कोणी लिहिले ?
उत्तर : विजय तेंडुलकर

8) यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ?
उत्तर : अलाहाबाद

9) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर : पंतप्रधान

10) भारतातही सर्वात पूर्वेकडे असलेले राज्य कोणते?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

अमेरिकेत शिखांची  स्वतंत्र जनगणना

◾️ अमेरिकेत प्रथमच शिखांची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून जनगणना होणार आहे.

◾️यंदा (२०२० साली) अमेरिकेत होणाऱ्या जनगणनेवेळी शीख धर्मीयांची स्वतंत्ररीत्या गणना करण्यात येणार असल्याची माहिती, येथील अल्पसंख्याक संघटनेने दिली.

◾️सॅन डियागो येथील शीख संघटनेचे अध्यक्ष बलजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख समुदायाची स्वतंत्ररीत्या जनगणना व्हावी यासाठी आम्ही बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो.

◾️ अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत अनेकदा बैठका घेण्यात आल्या. त्याचे फळ आज मिळाले आहे. या निर्णयाचा केवळ शीख धर्मीयांनाच नव्हे, तर अमेरिकेतील सर्व अल्पसंख्याक समुदायांना पुढच्या काळात फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

◾️अमेरिकेत पहिल्यांदाच एखाद्या अल्पसंख्याक समुदायाची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून गणना होत असून, त्यांना विशिष्ट प्रकारचा संकेतांक (कोड) दिला जाणार आहे.

◾️ या संकेतांकामुळे स्वतंत्ररीत्या गणना करताना अधिक पारदर्शकता आणि अचूकता राहील, अशी माहिती अमेरिकेतील जनगणना कार्यालयाचे उप-संचालक रॉन जर्मिन यांनी दिली.

◾️शीख संघटनांच्या दाव्यानुसार, आजमितीस अमेरिकेतील शिखांची संख्या दहा लाख असून, जनगणनेनंतर त्यात निश्चितच वाढ झालेली दिसून येईल.

महत्वाचे १० प्रश्न


1. एका पदार्थाचे वस्तुमान 5 kg आहे. त्याच्यात 2 m/sec² त्वरण निर्माण करण्याकरिता किती बळ लागेल?

1)  0.4 N
2) 1 N
3)  2.5 N
 4) 10 N

उत्तर : 10 N

2. 2, 8, 5 हे इलेक्ट्रॉन स्वरूप असलेले मूलद्रव्य ——

1)  फॉस्फरस
2) सिलिकॉन
3)  अॅल्युमिनियम
4)  सल्फर

उत्तर : फॉस्फरस

3. कर्करोग —– मुळे होतो.

1)  परजीवी आदिजीव
2)  जीवाणू
3)  बाह्यपरजीव
4) पेशींचे आंनियंत्रित विभाजन

उत्तर : पेशींचे आंनियंत्रित विभाजन

4. बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस —– रोगावर वापरतात.

1)  कॉलरा
2)  क्षय
3) पोलिओ
 4) हिवताप

उत्तर : क्षय

5. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर —– पदार्थात होते.

1)  ग्लुकोज
2)  माल्टोज
3)  नायट्रोजन
4) जीवनसत्व-ब

उत्तर : ग्लुकोज

6. खालीलपैकी कोणती जीवनप्रकिया प्राण्यांच्या जीवनात घडून येत नाही?

1)  श्वसन
2) प्रकाश संश्लेषण
3)  प्रथिन संश्लेषण
 4) ग्लुकोज अपघटन

उत्तर : प्रकाश संश्लेषण

7. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता?

 1) एल्फिन्स्टन
 2) क्लाईव्ह
 3)  रिपन
 4) कर्झन

उत्तर : एल्फिन्स्टन

8. इ.स. 1829 आमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला?

1)  क्लाईव्ह
2) डलहौसी
3)  बेंटिक
4) वेलस्ली

उत्तर : बेंटिक

9. इ.स. 1850 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

 1) न्या.म.गो. रानडे
 2) गोपाळ हरी देशमुख
 3) दादोबा पांडुरंग
 4)  विठ्ठल रामजी शिंदे

उत्तर : दादोबा पांडुरंग

10. ‘आधुनिक मराठीचे जनक’ म्हणून —– यांना संबोधिले जाते.

1)  प्र.के. अत्रे
2)  गोपाळ हरी देशमुख  
3)  शिवरामपंत परांजपे
4) विष्णुशास्त्री चिपळूणकर

उत्तर : प्र.के. अत्रे
-----------------------------------------------------------

दत्तक प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सर्व संबंधितांनी सुधारणा करावी-स्मृती झुबीन इराणी

✴️दत्तक कायदा केवळ मुलांना घरी आणण्यापुरता मर्यादित नाही. तर मुलाचे सर्व हक्क आणि अधिकार सुरक्षित करण्याची आणि दत्तक पालकांकडे त्याची जबाबदारी हस्तांतरीत करण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे, असे महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

✴️नवी दिल्ली येथे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने ‘दत्तक’ विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात त्या आज बोलत होत्या.मुलांचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन सर्व संबंधितांनी दत्तक प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सुधारणा करावी, असे इराणी यांनी सांगितले.

✴️मुलांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची प्रतिक्षायादी मोठी आहे. तरीही देशातील अनाथालये आणि आश्रयगृहात राहणाऱ्या मुलांच्या संख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष दत्तक संख्या कमी आहे, असे त्यांनी सांगितले.

✴️या चर्चासत्रात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी आणि संबंधित उपस्थित होते. चर्चासत्रात दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ करणे, मोठ्या आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे पुनर्वसन, दत्तक प्रक्रियेत शासकीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली.

शॅनन मिलर मुंबई मॅरेथॉनची अ‍ॅम्बेसीडर

--सात वेळची ऑलिम्पिक पदकविजेता, अमेरिकन जिम्नॅस्ट आणि नऊ वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या शॅनन मिलरची 17 व्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसीडर म्हणून घोषणा करण्यात आली. 19 जानेवारी 2020 ला ही मॅरेथॉन होणार आहे.

-- 42 वर्षीय ही खेळाडू अमेरिकन जिम्नॅस्टिकमध्ये दिग्गज असून, अमेरिकेच्या ऑलिम्पिक 'हॉल ऑफ फेम'मध्ये 2006 (वैयक्तिक) आणि 2008 (सांघिक) असा दोन वेळा तिचा समावेश करण्यात आला आहे. असे करणारी ती पहिली महिला अ‍ॅथलिट आहे.

-- तिने 1992 ऑलिम्पिकमध्ये पाच पदक (दोन रौप्य, 3 कांस्यपदक) मिळवत कुठल्याही क्रीडाप्रकारात अमेरिकन अ‍ॅथलिटने मिळवलेले हे सर्वाधिक पदक ठरले.

-- यासोबत तिने 59 आंतरराष्ट्रीय व 49 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवले आहेत. दोन जागतिक ऑल राऊंड जेतेपद मिळवणारी ती पहिली अमेरिकन जिम्नॅस्ट आहे.

-- 1996 गेम्समध्ये अमेरिकन महिलांनी पहिल्यांदा सांघिक सुवर्णपदक मिळवले. तसेच बॅलन्स बीममध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली अमेरिकेन जिम्नॅस्ट ठरली.

अमेरिकेच्या संसदेने घटवली ट्रम्प यांची ताकद; घेऊ शकणार नाहीत युद्धाचा निर्णय.

🎍इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कृती युद्धाला पोषक ठरत आहे. त्यामुळे केव्हाही या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचे परिणाम केवळ इराण आणि अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या संसदेने ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याबाबतचा एक ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना इराणवर पलटवार करण्याची खुली मुभा मिळणार नाही.

🎍डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी आपले बहुमत असलेल्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव १९४ मतांच्या बहुमतानं मंजूर करण्यात आला. यानंतर आता तो संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे.

🎍डेमोक्रेटिक पक्षाचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी संसदेला माहिती दिल्याशिवाय इराकमध्ये इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ल्याची परवानगी दिली होती. यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या खासदारांना पत्र लिहून राष्ट्राध्यक्षांच्या सैन्य कारवायांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.

सिंधु संस्कृती

ही भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे
. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्यांच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहरली.

🌸सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरूप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला.
यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल (पुरातत्त्वविभागाचे महासंचालक,इ.स. १९०२ ते १९२८), इ. जे. एच्. मॅके, माधोस्वरूप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

🌸🌸🌸☘🌸🌸🌸☘🌸🌸🌸☘🌸

ओझोन अवक्षय (Ozone depletion)

ओझोन अवक्षय म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणार्‍या ओझोन वायूच्या थरातील त्याचे प्रमाण कमी होणे. ओझोन हे ऑक्सिजन या मूलद्रव्याचे उच्च ऊर्जा असलेले एक बहुरूप आहे. सामान्य ऑक्सिजनामध्ये दोन अणू (O2) असतात, तर ओझोनाच्या प्रत्येक रेणूत ऑक्सिजनाचे तीन अणू (O3) असतात. १८७२ सालामध्ये बी. ब्रॉडी यांनी ऑक्सिजनाचे तीन अणू एकत्र येऊन ओझोनाचा रेणू बनलेला असतो हे सिद्ध केले. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण ०.००००६ टक्के इतके अल्प असते. सूर्याची अतिनील किरणे वातावरणातून येताना भूपृष्ठापासून ६०-८० किमी. उंचीच्या पट्ट्यात त्यांची ऑक्सिजनाशी रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन वायू तयार होतो. हा वायू स्थितांबरातील १२ ते ४० किमी. उंचीच्या थरात जमा होतो. २० ते २५ किमी. च्या पट्ट्यात त्याचे सर्वाधिक प्रमाण असते. वातावरणातील ९० % ओझोन स्थितांबरात आढळतो. स्थितांबरातील ओझोनाच्या या आवरणालाच ‘ओझोनांबर’ असे म्हणतात. ध्रुवीय प्रदेशात ओझोनाच्या थराची जाडी अधिक असते. विषुववृत्तीय भागात तुलनेने कमी असते.
स्थितांबरात असणार्‍या ओझोनामुळे सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो. सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते. जर ओझोनाचा थर नसता तर अतिनील किरणे जशीच्या तशी भूपृष्ठावर पोहोचली असती आणि मानवासह सर्व सजीवांना अनिष्ट परिणाम भोगावे लागले असते. या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार इ. अनेक विकार जडतात. स्थितांबरातील या ओझोनाच्या रूपाने पृथ्वीभोवती जणू एक संरक्षक कवच निर्माण झाले आहे.

नैसर्गिक रीत्या वातावरणात ओझोनाचे संतुलन राखले जाते. परंतु अलीकडील काही दशकात मानवी कृतींमुळे हे संतुलन बिघडत चालले आहे आणि ओझोन थरातील त्याचे प्रमाण घटत आहे. सजीवसृष्टीच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे. ओझोन अवक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे सीएफसी (क्लोरोफ्ल्युओरोकार्बन). सीएफसी हा वायूचा शीतक, अग्निरोधक, औद्योगिक द्रावक, वायुकलिल (एरोसोल), फवार्‍यातील घटक व रासायनिक अभिक्रियाकारक म्हणून उपयोग होतो. हा वायू वातावरणाच्या वरच्या भागापर्यंत पोहोचतो. तेथे त्याचे विघटन होते आणि त्यातून क्लोरीन वायू निर्माण होतो. हा क्लोरीन ओझोनाचे अपघटन ऑक्सिजनामध्ये करतो.

सीएफसीशिवाय अन्य क्लोरीनयुक्त वायूंमुळेही ओझोन नष्ट होऊ शकतो. या वायूंचे स्रोत काही प्रमाणात नैसर्गिक (ज्वालामुखी उद्रेक, सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिक विघटन इ.) असले तरी प्रामुख्याने ते मानवनिर्मित आहेत.

वातावरणातील ओझोनाची संहती (रेणूंची संख्या) कमी झाल्यामुळे त्याचा अवक्षय दिसून येतो. ओझोनाच्या थराच्या जाडीत फरक होत नाही. १९७० च्या दशकाच्या शेवटी वैज्ञानिकांना अंटार्क्टिका खंडावरील वातावरणातील ओझोनच्या अवक्षयाची खरी जाणीव झाली. १९८५ मध्ये ब्रिटिश वैज्ञानिकांनी ओझोनाचे छिद्र (ओझोनाची संहती लक्षणीय रीत्या कमी झालेले क्षेत्र) १९६० पासून वाढत असल्याचे निदर्शनाला आणून दिले. अंटार्क्टिकावरील काही जागी ओझोनाची संहती ५० % पर्यंत कमी झालेली आढळली.

जागतिक स्तरावर ओझोनाचा अवक्षय थांबवून जीवसृष्टीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न सुरू झाले आहेत. सीएफसीच्या उत्पादनास प्रतिबंध घालणे, त्यांचे उत्पादन कमी करणे किंवा त्याला पर्यायी रसायने शोधणे इ. उपायोजना केल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संरक्षण समितीने सप्टेंबर १९८७ मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार केला. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून १६ सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो. १९८७ चा माँट्रियल करार व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून सीएफसीची निर्मिती २० टक्क्यांनी कमी झाली आहे. ओझोन समस्येबाबत भारत हे एक जवाबदार व जागरूक राष्ट्र आहे. ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने १९९२ मध्ये माँट्रिऑल करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र या प्रकारचे करार हे जगातील सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने सामान्य व न्याय्य स्वरूपाचे असावेत, ही भारताची ठाम भूमिका आहे. भारताने ओझोनाचा नाश करणार्‍या द्रव्यांच्या उत्पादनावर व व्यापारावर बंदी घातलेली आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...