Monday, 13 January 2020

ऑस्करची नामांकने जाहीर

✍ टॉड फिलिप्सच्या ‘जोकर’ला सर्वाधिक ११

◾️जगभरात प्रतिष्ठा असलेल्या ९२व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा ‘जोकर’ सर्वाधिक ११ नामांकनांचा मानकरी ठरला आहे. 

✍  क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’,
✍मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि
✍सॅम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकने जाहीर झाली आहेत. 

◾️ दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या ‘पॅरासाइट’ला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.

📌 चित्रपट :
वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड, जोकर,
दी आयरिशमॅन, पॅरासाइट, १९१७,
मॅरेज स्टोरी, जोजो रॅबिट

📌अभिनेत्री :
रिनी झेलवेगर, चार्ीझ थेरॉन, स्कार्लेट जोहान्सन, साओइर्स रोनन, सिन्थिया इरिव्हो.

📌अभिनेता :
जोकीन फिनिक्स, अ‍ॅडम ड्रायव्हर, लिओनार्दो डिकॅप्रिओ, अ‍ॅण्टोनिओ बॅण्डेरस, जोनाथन प्रीस.

📌दिग्दर्शन :
मार्टिन स्कॉर्सेसी, क्वेण्टिन टॅरॅण्टिनो, बोंग जून-हो, सॅम मेंडिस, टॉड फिलिप्स.

जगातील सर्वात उंचीवरील पुलाचे बांधकाम वेगाने सुरू

- डिसेंबर २०२१ पर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडणार

- पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडले जाणार आहे. जगातील सर्वात उंचीवरील या रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने नवी मुदत निश्चित केली आहे.

- हा रेल्वेमार्ग पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच राहील अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कोकण रेल्वेने म्हटले आहे.

- ‘रेल्वेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. काश्मीरला रेल्वेमार्गाने उर्वरित देशाशी जोडणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल’, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

- या पुलाचे बांधकाम म्हणजे स्वातंत्र्यानंतर हाती घेण्यात आलेल्या काश्मीर रेल लिंक प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग आहे. बांधून पूर्ण झाल्यानतंर तो अभियांत्रिकीतील चमत्कार ठरेल, असे गुप्ता म्हणाले.

- अतिशय खडतर अशा भूप्रदेशात उभारल्या जाणाऱ्या कमानीच्या आकारातील या प्रचंड पुलाच्या बांधकामासाठी ५,४६२ टन लोखंड वापरण्यात आले असून, तो नदीच्या पात्रापेक्षा ३५९ मीटर उंचीवर राहणार आहे. ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देता येईल अशी त्याची रचना आहे. ‘अभियांत्रिकी चमत्कार’ ठरणारा १.३१५ किलोमीटर लांबीचा हा पूल बक्कल (कटरा) व कौरी (श्रीनगर) यांना जोडणार आहे.

- उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या कटरा व बनिहाल दरम्यानच्या १११ किलोमीटरच्या पट्टय़ातील हा पूल म्हणजे महत्त्वाचा दुवा आहे.

- सध्या चीनमधील बेपान नदीवरील २७५ मीटर उंचीवरील शुईबई रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच पूल असून, काश्मीरमधील पूल त्याला मागे टाकणार आहे.

- काश्मीर खोऱ्याला भारतीय रेल्वेच्या जाळ्याशी जोडण्याकरिता, जम्मू व काश्मीरसाठी वाहतुकीची पर्यायी आणि विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध करून देण्याकरता उधमपूर- बारामुल्ला- श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्प आत्यंतिक महत्त्वाचा आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन, २००२ साली हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित करण्यात आला होता, अशी माहिती गुप्ता यांनी दिली
---------------------------------------------------

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले

☘☘☘☘☘🌺☘☘☘☘☘☘☘

राकेश शर्मा : चंद्रावर जाणारे पाहिले भारतीय

👨‍🚀  चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हटली कि आपसूकच 'राकेश शर्मा' यांचे नाव डोळ्यांसमोर येते. आज त्यांचा 71 वा जन्मदिवस. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी खास गोष्टी...

🧐 जन्म व शिक्षण : राकेश यांचा जन्म 13 जानेवारी 1949 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केले. राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले. राकेश यांनी पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावली.

🚀 अंतराळ मोहिमेविषयी :

▪ सन 1982 मध्ये इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अवकाश मोहिमेमध्ये राकेश यांची निवड करण्यात आली.

▪ Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत राकेश शर्मा 2 एप्रिल 1984 या दिवशी अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावले. राकेश हे 21 तास 40 मिनिटात अंतराळात वावरले.

▪ बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंगमधील शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे हा राकेश यांचा मोहिमेतील अभ्यासविषय होता.

▪ रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून या अंतराळवीरांनी  टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.

▪ यावेळी इंदिरा गांधी यांनी 'अंतराळातून आपला भारत कसा दिसतो?' असे राकेश यांना विचारले. यावर राकेश यांनी 'सारे जहॉं से अच्छा!', असे उत्तर देत अवघ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.

📍 दरम्यान, या मोहिमेवरून परतल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित केले तर भारत सरकारनेदेखील 'अशोकचक्र' देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

आनंद ५० व्या वर्षीही गुणवान बुद्धिबळपटू

🌷चेन्नई : पाच वेळा जगज्जेतेपद पटकवणारा भारताचा विश्वनाथन आनंदचा खेळ पहिल्यासारखा सर्वोत्कृष्ट होत नसला तरी त्याच्या पन्नाशीच्या मानाने सर्वोत्तम आहे, असे मत माजी विश्वविजेता रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकने व्यक्त केले आहे.

🌷‘‘आनंदने त्याच्या बुद्धिबळ खेळाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मोठी उंची गाठलेली आहे. त्यामानाने आता त्याला यश मिळत नसले तरी ५०व्या वर्षी आनंद सवर्ोेत्तम खेळ करत आहे. या वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खेळणे हे सोपे नाही. पुढची पिढी वयाच्या पन्नाशीपर्यंत आनंदसारखे सातत्य दाखवू शकेल, असे मला वाटत नाही. अजून किती खेळायचे हे आनंदच ठरवू शकतो. जोपर्यंत तो खेळाचा आनंद घेत आहे, तोपर्यंत तो खेळत राहील, हे मात्र नक्की. कारण बुद्धिबळ हा खेळ अन्य खेळांसारखा शारीरिक ताकदीवर अवलंबून नाही. मात्र त्याच वेळेला युवा बुद्धिबळपटूंसोबत खेळणे हेदेखील एक आव्हानच आहे,’’ याकडे क्रॅमनिकने लक्ष वेधले.

🌷‘‘आनंद ज्या वेळेस जगज्जेतेपदाची लढत मॅग्नस कार्लसनकडून २०१३ मध्ये हरला तेव्हाच त्याला निवृत्तीचे सल्ले देण्यात येत होते. मात्र आनंदने आपल्या कामगिरीने सर्वाना उत्तर दिले,’’ असेही क्रॅमनिकने सांगितले. क्रॅमनिकने सध्या चेन्नईत युवा बुद्धिबळपटूंसाठी सराव शिबीर आयोजित केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात यापैकीच सहा मुलांनी फ्रान्स येथे डाऊन क्रॅमनिककडून प्रशिक्षणाचे धडे गिरवले होते.

अमेरिकेच्या संसदेने घटवली ट्रम्प यांची ताकद; घेऊ शकणार नाहीत युद्धाचा निर्णय

🎍इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कृती युद्धाला पोषक ठरत आहे. त्यामुळे केव्हाही या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचे परिणाम केवळ इराण आणि अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या संसदेने ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याबाबतचा एक ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना इराणवर पलटवार करण्याची खुली मुभा मिळणार नाही.

🎍डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी आपले बहुमत असलेल्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव १९४ मतांच्या बहुमतानं मंजूर करण्यात आला. यानंतर आता तो संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे.

🎍डेमोक्रेटिक पक्षाचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी संसदेला माहिती दिल्याशिवाय इराकमध्ये इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ल्याची परवानगी दिली होती. यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या खासदारांना पत्र लिहून राष्ट्राध्यक्षांच्या सैन्य कारवायांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 82 days left


संदर्भ चा फॉर्म अद्याप सगळ्यांनी भरला असेल. पूर्व परीक्षेच्या अभ्यासचा उत्साह वाढला असेल, तसा तो वाढणे गरजेचे आहे.

पुढील 80 दिवस अभ्यास करताना काही मुद्दे लक्षात ठेवा.

1) less is more
संदर्भ पुस्तकांची संख्या कमी ठेवा आणि  तेच पुस्तक वाचण्याची, उजळणी करण्याची संख्या जास्त.

2) इतके दिवस ज्या पद्धतीने अभ्यास केला आहे त्याच पद्धतीने अभ्यास करा.
( कोणतीही नवीन पद्धत आत्मसात करण्याची ही वेळ नाही.) आता टारगेट एकच असलं पाहिजे काही करून पूर्व परीक्षा पास होणे.

3) वाचन आणि प्रश्न सोडविणे आणि त्याचे विश्लेषण याची विभागणी 7:3 असावी.

4) CSAT मध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी प्रयत्न करा.
डोकं शांत ठेवून,  होऊन 70 मिनिटांत 10 उतारे याचा नित्य नियमाने सराव करा.
पेपर 2 चे आयोगाचे पेपर किमान 2 वेळ लावून सोडवा.

5) बहुतेक सगळ्यांची पुस्तक यादी जवळ पास सारखीच असते, त्यामुळे तेच पुस्तक कशा प्रकारे अभ्यासता यावर निकाल बदलतो.
केलेले आठवून पहा. वस्तुनिष्ठ माहितीकडे दुर्लक्ष करू नका.
स्पर्धा परीक्षांचा निकाल हा ज्ञान किती आहे यावर अवलंबून आहे पण त्याही पेक्षा जास्त परीक्षेच्या दिवशी कामगिरी कशी करता यावर अवलंबून आहे.

6) पुढील तीन महिन्याच्या काळात अनेक प्रकारचा दवाब जाणवेल. कधी कौटुंबिक तर कधी इतरांचा अभ्यास जास्त असल्याचे, कधी टेस्ट सीरिज ला 60-70 गुण पडल्याचे तर कधी तुमच्या पेक्षा तुमच्या बरोबर अभ्यास करणाऱ्याला कसेंकाय जास्त गुण मिळाले याचे. या सर्व साहजिक गोष्टी आहेत.

कधी तरी मनात येईल माझ्याकडून हे सगळं होईल का? मी हे सगळं का करत आहे. अशा अनेक गोष्टी तुम्हाला विचलित करतील.

पण हे सगळे विचार अगदी क्षणिक असतात, सगळ्यांच्याच मनात येतात. अशा वेळी स्थिर राहणे जास्त गरजेचे आहे. जितका तुमचा अभ्यास मदत करेल  तेवढाच  तुमचा temperament  तुम्हाला या परीक्षेत यश देणार आहे.

बिनधास्त पण शिस्त बद्ध अभया करा.

7) आयोगाच्या मागील वर्षीच्या पेपर वरून लॉजिक डेव्हलप करा. तेच शेवटी कामाला येत.

एकूणच जोमाने शर्यतीसाठी प्रयत्न करा.
लक्षात ठेवा जो अंतिम शर्यतीत जिंकल्याचा विचार करतो आणि त्यादृष्टीने तगडी तयारी करतो त्याला हरवणे कठीण असते.

तयारी करताना टॉपर माईंड ने करा.

You have it and you can do it

All the best

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?

(A) कटक
(B) भुवनेश्वर✅✅
(C) भोपाळ
(D) गुवाहाटी

📍 पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.

(A) पत्रकार
(B) कलाकार✅✅
(C) अभियंता
(D) लेखक

📍 ISRO या संस्थेनी _ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?

(A) तिरुवनंतपुरम
(B) बेंगळुरू
(C) छल्लाकेरे✅✅
(D) कोची

📍 __ राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करतो.

(A) नागालँड
(B) मिझोरम✅✅
(C) मणीपूर
(D) अरुणाचल प्रदेश

अॅसिड हल्ला पीडितांना १० हजारांचे पेन्शन!

◾️ अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय उत्तराखंडमधील त्रिवेंद्र सिंह रावत सरकारने घेतला आहे.

◾️अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या सत्य घटनेवर आधारित छपाक चित्रपटापासून प्रेरणा घेत उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.

◾️राज्यातील अॅसिड हल्ल्यातील पीडितांना ७ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

◾️अॅसिड हल्ल्यानंतर त्यातून सावरून आपले जीवन पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पीडितांना हे पेन्शन दिले जाणार आहे.

◾️महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

◾️या प्रस्तावावरील मसुद्यावर काम सुरू आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री रेखा आर्या यांनी दिली.

◾️अॅसिड हल्ल्यातील पीडिता हरिद्वार, नैनीताल आणि उधमसिंह नगर या भागात मोठ्या प्रमाणावर राहतात.

◾️ पेन्शन मिळाल्यामुळे पीडितांना आर्थिक आधार मिळून, त्या सन्मानाचे जीवन जगू शकतील. आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकतील, असेही आर्या यांनी सांगितले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

◾️भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

◾️या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

✍होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

◾️पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे.

◾️होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे.

◾️ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

◾️या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत.

◾️कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वदेशी ‘तेजस’ विमान: जहाजावर अरेस्टेड लँडिंग करणारे भारताचे पहिले विमान

- नौदलात दाखल होण्याच्या मार्गावर असलेल्या स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ या वजनाने हलक्या लढाऊ विमानाने दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी INS विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर यशस्वीपणे अरेस्टेड लँडिंग केले.

- या अरेस्टेड लँडिंगनंतर नौदलासाठी डबल इंजिन तेजस विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- INS विक्रमादित्य ही मुंबईतील पश्चिम कमांड मुख्यालयाचा एक भाग असून मुंबई अंतर्गत अरबी समुद्रात ही चाचणी झाली.

- ही यशस्वी लँडिंग कमांडर जयदीप मावलंकर यांनी केली.

- या यशामुळे भारत आता अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन यासारख्या देशांच्या निवडक गटात प्रवेश करणार ज्याने 200 मीटर लांबीच्या धावपट्टीवर अरेस्टेड लँडिंग करण्यास सक्षम असे विमान विकसित केले आहे.

- सामान्य अवस्थेत धावपट्टीवर उतरण्यासाठी 1 किलोमीटरची धावपट्टी लागते. अरेस्टेड लँडिंगमध्ये एका लवचिक तारेच्या मदतीने विमानाला रोखले जाते.

▪️तेजस विमान

- तेजस देशात विकसित करण्यात आलेले पहिले एक इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे.

- या विमानाला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजंसीने रचले आणि विकसित केले आहे.

- तेजस भारतीय हवाई दलाच्या 45 व्या स्क्वाड्रन ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ चा भाग आहे.

- हवाई दलाने डिसेंबर 2017 मध्ये HALला 83 तेजस जेट तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती.

- पहिल्यांदा ‘तेजस’ विमान 1980च्या दशकात रशिया, फ्रान्स आणि रशियाकडून तंत्रज्ञान घेवून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केले होते.
--------------------------------------------

सराव प्रश्नमालिका

1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - राशबिहारी बोस

3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्य

7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो.कृ.गोखले
रामकृष्ण मिशन द्यानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

अमरावती जिल्ह्यातुन सातव्या आर्थिक जनगणनेस प्रारंभ

●  अमरावती जिल्ह्यातील सर्व उद्योग-व्यवसाय आणि सेवा यांची माहिती संकलित करण्यासाठी सातव्या आर्थिक जनगणनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

●  माहिती संकलनासाठी आपल्याकडे येणाऱ्या संगणकांना संबंधितांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल यांनी केले आहे.

●  या कामासाठी १५९७ प्रगणक आणि ८९७ पर्यवेक्षक आवश्यक आहेत त्यापैकी १२१२ प्रगणक आणि ६५६ परीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना ओळखपत्र देण्यात आली तीन महिन्याच्या कालावधीत सर्व माहिती संकलित करून शासनास सादर करण्यात येणार आहे.  

विद्यापीठ' दर्जा मिळवणारे 'फर्ग्युसन' राज्यातील पहिले महाविद्यालय

• पुण्याच्या डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या 'फर्ग्युसन' महाविद्यालयाला स्वतंत्र्य विद्यापीठाचा दर्जा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

•  १३५ वर्ष जुने असलेले हे महाविद्यालय विद्यापीठाचा दर्जा देणारे पहिलेच महाविद्यालय ठरले.

• २०१८ मध्ये यूजीसीने फर्ग्युसन महाविद्यालयसह बंगळूरु येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय आणि सेंट जोसेफ कॉलेजला विद्यापीठ म्हणून पात्र ठरवले होते

फर्ग्युसन महाविद्यालय:-
• १८८५ साली लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने महाविद्यालयाची स्थापना झाली

• जुलै २०१५ मध्ये हेरिटेज वास्तूचा दर्जा
• २०१६ मध्ये स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता
• २०१८ मध्ये विद्यापीठ म्हणून मान्यता मिळावी यासाठी अहवाल पाठविण्यात आला

• मे २०१८ मध्ये राष्ट्रीय उच्चस्तर अभियान (रुसा) ची मान्यता मिळाली
• गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट अशा उच्च शिक्षणाची परंपरा असणारे हे महाविद्यालय भारतातील महाविद्यालयांच्या एनआयआरएफ मानांकनात 19 व्या स्थानावर असून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे.
• जानेवारी २०१९ मध्ये राज्य मंत्री मंडळाची मान्यता

• आयआयटी आयआयएम सारख्या संस्था आणि परदेशी विदयापीठांसोबत फर्ग्युसनला टाय अप करता येणार.