Saturday, 11 January 2020

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात वर्षाला जमा होणार 15 हजार रुपये

🔰आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे.
तर या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

🔰तसेच या महिलांच्या खात्यात वर्षाला 15 हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे. हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

🔰जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

सुचेता सतीशला २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार प्राप्त

  🔸 २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार सुचेता सतीशला प्राप्त

🔴 ओळख

  🔸 एका मैफिलीदरम्यान सर्वात जास्त भाषांमध्ये गाणी गायन
  🔸 मुलांची सर्वात मोठी लाइव्ह गायन मैफिल
  🔸 दुहेरी विश्व विक्रम

🔴 सुचेता सतीश बद्दल थोडक्यात

  🔸 १३ वर्षीय
  🔸 दुबई-स्थित भारतीय मुलगी
  🔸 १२० भाषांमध्ये गाणी गायन
  🔸 दुबई भारतीय हायस्कूलची नाइटिंगेल म्हणून ओळख

🔴 पुरस्कार सोहळा वेचक मुद्दे

  🔸 जगभरातील इतर १०० ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजींचा विविध पुरस्कारांनी गौरव
  🔸 २ वर्षांपूर्वी दुबईमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सभागृहात विक्रमाची नोंद
  🔸 मैफिल दरम्यान १०२ भाषांमध्ये ६.२५ तास गायन

🔴 'ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार' बद्दल थोडक्यात

🔴 उद्देश

  🔸 मुलांची प्रतिभाशक्ती कौशल्ये आणि सामर्थ्ये साजरी करणे ज्ञ

🔴 समाविष्ट श्रेणी

  🔸 नृत्य
  🔸 मॉडेलिंग
  🔸 लेखन
  🔸 अभिनय
  🔸 नाविन्य
  🔸 विज्ञान
  🔸 क्रीडा
  🔸 संगीत
  🔸 कला

🔴 पुरस्कार समर्थन

  🔸 डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन
  🔸 संगीत निर्माता ए.आर. रहमान आणि इतर

जागतिक बँकेचा “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स” अहवाल

जागतिक बँकेचा ताजा ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्तवविलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वृद्धिदर हा 5 टक्क्यांवर सीमित राहणार.

अहवालातल्या ठळक बाबी

भारताविषयी

🔸जागतिक बँकेचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय विकासदराचा तो 11 वर्षांतला नीचांक ठरणार.

🔸GDP दरातल्या घसरणीस कारणीभूत असणारे घटकही जागतिक बँकेने नमूद केले आहेत. भारतात खासगी क्षेत्रातून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रयशक्तीही घटल्याचे दिसत असून त्याचाही विकासदरास फटका बसणार.

🔸पुढील आर्थिक वर्षात वृद्धिदर वेग धरणार व आर्थिक वर्ष 2020-21 अखेर हा दर 5.8 टक्क्यांवर पोहोचणार.

जागतिक

🔸वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 2.5 टक्के राहणार असा अंदाज आहे.

🔸दक्षिण आशियाचा GDP वृद्धीदर 2019-20 या वर्षी 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याचे अपेक्षित आहे.

🔸2020 या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांचा एकत्रित वृद्धीदर 1.4 टक्क्यांपर्यंत खालावणार असा अंदाज आहे.

🔸उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर यंदा 4.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी.

◾️भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी. समाजवादी देशभक्त आणि काँग्रेस नेते एवढीच त्यांची ओळख सर्वांना माहित आहे. मात्र, त्यापेक्षाही शास्त्रींचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान खूप मोठे आहे. 

◾️2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तरप्रदेशमधील मुघलसराय प्रांतात रामदुलारी देवी आणि शारदा प्रसाद श्रीवास्तव यांच्या घरी या भारतरत्नाचा जन्म झाला.

◾️'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं थोडक्यात वर्णन शास्त्रींचं केलं जातं. मवाळ आणि शांत स्वभावाचे शास्त्री स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामुळे.

◾️मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शास्त्रींना खरी ओळख मिळाली. 'जय जवान, जय किसान' अशी घोषणा देत शास्त्री भारतीय जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनले. 

◾️ केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपविली गेली.

◾️जून 1964 मध्ये जवाहरलाल नेहरूंचे निधन झाल्यानंतर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. 

◾️'हरित क्रांती'चे जनक अशी त्यांची आणखी एक ओळख.

🔰शास्त्रींबद्दलच्या अशाच अनेक रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. 

1⃣. लाल बहादूर यांचे मूळ आडनाव शास्त्री नव्हते. शास्त्रींचे मूळ नाव लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव होय. मात्र, 1925 मध्ये वाराणसीमधील काशी विद्यापीठात त्यांना 'शास्त्री' या पदवीने गौरविण्यात आल्यानंतर शास्त्री हेच आडनाव त्यांनी पुढे वापरले. काशी विद्यापीठात शास्त्र शाखेतील विद्वानांना 'शास्त्री' या पदवीने गौरविण्यात येत होते.

2⃣. लाल-बाल-पाल यामधील लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या 'लोकसेवक' मंडळाचे ते आजीवन सदस्य होते. लोकांचे सेवक म्हणून शास्त्रींनी अनेक सामाजिक कामेही केली.

3⃣. त्याकाळातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शास्त्रींनी प्राथमिक शिक्षण मौलवींच्या हाताखाली घेतले होते. तेथे मुस्लीम धर्मगुरूंनी शास्त्रींना उर्दू आणि पर्शियन या भाषा शिकविल्या. इंग्रजी भाषा ही देशात अधिकृतपणे वापरायला अजून सुरवात झाली नव्हती. त्या अगोदर उर्दू आणि पर्शियन या भाषाच अनिवार्य भाषा म्हणून शिकविल्या जात होत्या. 

4⃣ देशाच्या पंतप्रधानपदी शास्त्री रुजू झाले. त्यानंतर 1965 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शास्त्रींनी स्वत:चे मानधनही स्वीकारले नव्हते.  

5⃣. एकीकडे युद्धजन्य परिस्थिती तर दुसरीकडे देशात अन्नधान्याचा तुटवडा अशा दुहेरी संकटात पंतप्रधान शास्त्री अडकले होते. तेव्हा भारत-पाक युद्धावेळी भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. आणि देशातील जनता आणि भारतीय सैन्यात नव्याने स्फूर्ती निर्माण झाली. 

6⃣. तत्पूर्वी, 1920 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभागी झाले. गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. 1930 मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये अटक झाल्यानंतर त्यांना दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. याच दरम्यान ते गांधी आणि नेहरूंचे एकनिष्ठ अनुयायी बनले. 

7⃣. शास्त्रींनी आपल्या पगारातील मोठा वाटा विविध गांधीवादी लोकांच्या कल्याणासाठी दान करत. आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी मर्यादेत खर्च करण्यावर भर दिला. त्यामुळे पंतप्रधान असूनही इलेक्ट्रिक वस्तू, गाडी आणि इतर शासकीय गोष्टींचा ते क्वचितच वापर करत असत. 

8⃣पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशातील पहिल्या समितीची स्थापना केली. 

9⃣ 1928 मध्ये शास्त्री हे अधिकृतपणे काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. आणि तेथून पुढील 20 वर्षात त्यांनी स्वतंत्र भारतासाठी सुरू असलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. परकीय राज्यकर्त्यांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात त्यांनी यशस्वी भूमिका बजावली. 

◾️ 11 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला.

◾️10 जानेवारी 1966 ला पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष अय्यूब खान यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना कार्डियाक अॅटॅक आल्याचे सांगितले जाते. मात्र, देशाच्या दुसऱ्या पंतप्रधानाच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ अद्यापही गूढच बनून राहिले आहे. 

◾️राजधानी दिल्लीत असणारे शास्त्रींचे समाधिस्थळ 'विजय घाट' म्हणून ओळखले जाते. आजही शास्त्रींचे हे समाधिस्थळ अनेकांसाठी स्फूर्तिदायी बनून राहिले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फवाद मिर्झाने संपवला भारताचा वनवास; घोडेस्वारीमध्ये मिळवले टोकियो ओलीम्पिकचे तिकीट.

भारताचा युवा घोडेस्वार फवाद मिर्झाने गेल्या दोन दशकांपासूनही भारताची प्रतीक्षा अखेरीस संपवली आहे. २०१८ साली आशियाई खेळांमध्ये तब्बल ३६ वर्षांनी घोडेस्वारी प्रकारात पदक मिळवणाऱ्या फवादला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळालेलं आहे. याआधी भारताच्या इम्तियाज अनिस यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारी (equestrian) मध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं.

International Federation for Equestrian Sports तर्फे मंगळवारी फवादच्या ऑलिम्पिक तिकीटावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलं. २७ वर्षीय फवादने गेल्या काही स्पर्धांमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. 

South East Asia आणि Oceania गटात फवादने अव्वल स्थान पटकावलं होतं. सहा पात्रता फेऱ्यांमध्ये फवादने ६४ गुणांची कमाई केली होती. या कामगिरीच्या जोरावर फवादला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट देण्यात आलं आहे.

२०१९ साली फवादला भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे फवाद ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर

◾️ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली.

◾️दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

◾️जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला.

◾️ त्यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली.

◾️विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला.

◾️ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे.

◾️ छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे.

◾️ लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे.

◾️स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांनीही ठराव मांडला होता.

◾️ परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...

1.पुणे- श्री. अजित अनंतराव पवार

2.मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख

3.मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे

4.ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

5.रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे

6.रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब

7.सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत

8.पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे

9.नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

10.धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार

11.नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

13.अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ

14 सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील

16.सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17.कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18.औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई

19.जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे

20.परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21.हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22.बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण

24.उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

25.लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख

26 अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27.अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28.वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

29.बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30.यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड

31 नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32.वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार

33.भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34.गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख

35.चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

36 गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” : परराष्ट्र मंत्रालयातला नवा विभाग

भारत सरकारच्या केंद्रीय परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने 1 जानेवारी 2020 रोजी घोषणा केली की नवी दिल्लीत मंत्रालयात “नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” नावाने एका नव्या विभागाची स्थापना करण्यात येणार आहे.

वेगाने वाढणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेत अश्या पुढाकाराने परकीय संबंधातून तंत्रज्ञान क्षेत्रात होणार्‍या गुंतवणुकीला आकर्षित करण्याला प्रोत्साहन मिळणार. सध्या भारत देशात 5G नेटवर्क तंत्रज्ञान आणण्यासाठी त्याच्या क्षेत्रात चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी ह्यूवेई कंपनीसारख्या मोठ्या उद्योगांना परवानगी देण्याच्या विचारार्थ सरकार आहे.

ठळक बाबी:-

NEST विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांकरिता मंत्रालयात एक केंद्र म्हणून काम करणार.
5G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी भागीदारांचे सहकार्य घेण्यामध्ये नवा विभाग मदत करणार.

स्थानिक भागधारक आणि परदेशी भागधारक यांच्यादरम्यान समन्वय ठेवण्यासाठी तसेच भारताच्या विकासाची प्राथमिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन धोरणे ठरविण्यामध्ये या विभागाची मदत होणार आहे.

नवा विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संसाधनांविषयीची परकीय धोरणे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट अश्या बाबींचे मूल्यांकन करणार आणि योग्य परकीय धोरण निवड करण्याविषयीची शिफारस करण्यास देखील मदत करणार आहे.

इतिहास प्रश्नमालिका

1. पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक कोण?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
दादोबा पांडुरंग तर्खडकर
गोपाळ हरी देशमुख

● उत्तर - आचार्य बाळशास्त्री जांभेकर

2. खालीलपैकी कोणत्या गोष्टीत नाना जगन्नाथ शंकरशेठच्या सहकार्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही?
जे.जे. स्कूल ऑफ आर्टची स्थापना
एलफिन्स्टन कॉलेजची स्थापना
सत्यशोधक समाजाची स्थापना
ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना

● उत्तर - सत्यशोधक समाजाची स्थापना

3. ६१ दिवसाच्या दीर्घ उपोषणानंतर कोणत्या क्रांतकिरकाचे तुरुंगात निधन झाले?
भगतसिंग 
राजगुरू
जतीनदास
रोशनसिंग

● उत्तर - जतीनदास

4. मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
मुंबई
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
ठाणे

● उत्तर - सिंधुदुर्ग

5. भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते?
विजयालक्ष्मी पंडित 
कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन
सरोजिनी नायडू
डॉ. अॅनी बेझंट

● उत्तर - सरोजिनी नायडू

6. कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनात भारतीयांना सहभागी करण्यात आले?
१८१३
१९०९
१९१९
१९३५

● उत्तर - १९१९

7. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते?
बसवेश्वर
रामानुज
चक्रधर स्वामी
चांगदेव

● उत्तर - चक्रधर स्वामी

8. खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
बार्डोली सत्याग्रह 
चंफारण्य सत्याग्रह
काळ्या कायाघाचा निषेध
खेडा सत्यांग्रह

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह 

9. तात्या टोपे हे नानापेशवे यांचे कोण होते?
मंत्री 
सचिव
लष्करप्रमुख
प्रशासकीय अधिकारी

● उत्तर - लष्करप्रमुख

10. महात्मा गांधीजानी मजुर महाजन संघाची स्थापना कोठे केली?
मद्रास 
अहमदाबाद
पोरबंदर
सुरत

● उत्तर - अहमदाबाद

चालू घडामोडी प्रश्न

१. कृत्रिम लिंग निर्धारित रेतन लॅब (प्रयोगशाळा) महाराष्ट्रात ----------- या शहरात सुरु करण्यात येणार आहे :-औरंगाबाद

२.  कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे ---- हे देशातील पहिले राज्य ठरले :- महाराष्ट्र

३. चौथी आपत्ती व्यवस्थापन परिषदेत ----------- येथे आयोजित करण्यात आली होती:- मुंबई

४. महाराष्ट्र राज्यात लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम-1971 नुसार लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांची निर्मिती करण्यात आली. अशी पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील --------राज्य ठरले होते:- पहिले

५. ‘इंडिया रबर एक्स्पो’२०१९ हे आशियातील सर्वात मोठे रबर प्रदर्श कोणत्या शहरात भरले होते:- मुंबई

६. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी २०१९ रोजी -------या शहरात भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन केले :- मुंबई (शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील संग्रहालय सल्लागार समितीने या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या संग्रहालयाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नाविन्यपूर्ण संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती.)

७. संयुक्त राष्ट्रांच्या दिव्यांगजन अधिकार ठरावाच्या धर्तीवर केंद्र सरकारने व्यंगांची संख्या सात वरुन -----पर्यंत वाढवण्यात आली :- २१

८. पहिल्या आंतरराष्ट्रीय भोजपुरी महोत्सवाचे आयोजन ------- हा देश करणार आहे :-मॉरिशस

९. जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून -------- या योजनेची ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.:-पहल

१०.  ---------- या देशाकडून २०१९ हे सहिष्णुतेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे?:- संयुक्त अरब अमिरात

११. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या .......या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत? :-गीता गोपीनाथ

१२.  भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ‘अटल भाषांतर योजना’ सुरू केली आहे?:- परराष्ट्र कल्याण मंत्रालय

१३. कोणते भारतीय राज्य सार्वभौमिक आरोग्य सेवा पुरविणारे पहिले राज्य बनले आहे?:- उत्तराखंड

१४. कोणत्या नदीच्या भागावर भारतामधील सर्वांत दीर्घ ‘बोगिबील पूल’ उभारण्यात आला आहे? :- ब्रह्मपुत्रा

१५.  राष्ट्रीय ग्राहक दिन २०१८’ या दिवसाची संकल्पना काय आहे?;- टाइमली डिस्पोझल ऑफ कंझ्युमर कम्पलेंट्‌स

१६. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या 2018 च्या अहवालातील मानांकनात भारत सध्या --------- स्थानावर आहे:- तिसऱ्या

१७. ------ देशांच्या नागरिकांसाठी भारताने सध्या ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली आहे :- १६६

१८. शेतकऱ्यांचे उत्पन्न ---------- पर्यंत दुपटीने वाढवण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे :- २०२२

१९. पहिली जागतिक विमान वाहतूक शिखर परिषद ---------- येथे भरविण्यात आली होती:- मुंबई

२०. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दूरदर्शन, प्रसारभारतीच्या सहकार्याने -------- आणि ----- हे दोन विज्ञान उपक्रम सुरू केले.:-डीडी सायन्स,इंडिया सायन्स

२१.  --------या ठिकाणी देशातले पहिले ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ उभारण्यात आले - नवी दिल्ली (‘इंडिया गेट’ च्या परिसरात)

२२. भारत हा जगातला -------व्या क्रमांकाचा सर्वात मोठा CO2चा उत्सर्जक देश आहे – चौथा.

२३.  देशाची २२ वी अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) येथे उभारली जात आहे – मनेठी (रेवाडी, हरियाणा).

२४. ‘राष्ट्रीय गंगा नदी (पुनरुज्जीवन, संरक्षण व व्यवस्थापन) विधेयक-२०१८ ’ अंतर्गत केंद्र सरकारचे सशस्त्र दल म्हणून-------- या नावाने नवे दल तयार केले जाणार - गंगा प्रोटेक्शन कॉर्प्स (गंगा सुरक्षा दल).

२५. ५-६ फेब्रुवारी २०१९ रोजी -------- ठिकाणी ‘आशिया LPG शिखर परिषद २०१९ ’ आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली (भारत).

२६.  उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) याचा 30 वा सदस्य - मॅकेडोनिया.

२७. जागतिक कर्करोग दिन २०१९ ची थीम ----- ही होती:- आय एम अॅण्ड आय वील.

२८.  ICC तर्फे 'वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू'चा मान म्हणून ‘रिचेल हेहोइ फ्लिंट’ पुरस्कार------ या भारतीय क्रिकेटपटू ला मिळाला :- स्मृती मंधाना (भारत).

२९.  ICCची 'सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू' या पुरस्काराची विजेती - अलायसा हीली (ऑस्ट्रेलिया).

३०. ३० वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा आठवडा २०१९ ----------- या कालावधी मध्ये साजरा करण्यात आला:-४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी

३१.  १ फेब्रुवारीला ------या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘स्मार्ट खेडे मोहीम’ राबविण्यास मंजुरी देण्यात आली - पंजाब.

३२.  १८६९ वर्षी प्रथमच प्रकाशित करण्यात आलेल्या रासायनिक घटकांच्या ‘पिरियोडिक टेबलचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ --------- हे वर्ष घोषित केले :-२०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 20 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील ‘लक्षणार्थ’ सूचित करणारा शब्द कोणता?

     ‘आमच्या दारावरुन हत्ती गेला’
   1) आमच्या    2) दारावरून   
   3) हत्ती    4) गेला

उत्तर :- 2

2) समानार्थी शब्द सांगा : ‘हिरमोड’

   1) पदरमोड    2) विरस     
   3) अपयश    4) वाईट वळण

उत्तर :- 2

3) ‘राव’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.

   1) कृश      2) मित्र     
   3) रंक      4) शूर

उत्तर :- 3

4) ‘दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो.’ - या अर्थाची म्हण ओळखा.

   1) अडला हरी गाढवाचे पाय धरी    2) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
   3) इकडे आड तिकडे विहीर    4) उंदराला मांजर साक्ष

उत्तर :- 2

5) ‘मिश्यांना तूप लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय शोधा.

   1) उगीच ऐट करणे    2) शक्तीमान नसणे
   3) सशक्त असणे      4) फजिती होणे

उत्तर :- 1

6) “रात्री हिंडणारे” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) निशाचर    2) उभयचर   
   3) जलचर    4) स्थलचर

उत्तर :- 1

7) पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा.

   1) साहाय्यक    2) साह्यक   
   3) सहायक    4) सहाय्यक

उत्तर :- 3

8) मराठी वर्णमालेतील ‘ह’ हा कोणता वर्ण आहे ?

   1) महाप्राण    2) अल्पप्राण   
   3) लघुप्राण    4) दीर्घप्राण

उत्तर :- 1

9) रंग + छटा = ?

   1) रंगछटा    2) रंगच्छटा   
   3) छटारंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

10) ‘तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.’ या विधानातील अधोरेखित शब्दांच्या नामाचे कार्य ओळखा.

   1) विशेषनाम    2) सामान्यनाम   
   3) सर्वनाम    4) नाम

उत्तर :- 2

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

   1) उपमा    2) उत्प्रेक्षा    3) रूपक      4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) तुरट    2) आंबट चिंबट    3) खारट      4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील
    अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) लक्ष्यार्थ    2) वाच्यार्थ    3) वाक्यार्थ    4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.

   1) दैत्य    2) दानव      3) राक्षस      4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) नापीक    2) सुकाळ    3) अवर्षण    4) कोरडा

उत्तर :- 2

6) या टोपीखाली दडलंय काय?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

   1) सात    2) आठ     
   3) नऊ    4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.

     ‘मधू लाडू खात जाईल’
   1) साधा भविष्यकाळ    2) अपूर्ण भविष्यकाळ
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

   1) पुल्लिंगी    2) नपुंसकलिंगी   
   3) स्त्रीलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...