०४ जानेवारी २०२०

चीनच्या मदतीने पाकिस्तानने बनवलं JF-17

🎆 राफेल फायटर विमानाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने JF-17 या फायटर विमानामध्ये सुधारणा केली आहे.

🎆 तर राफेल हे आजच्या घडीचे जगातील अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल फायटर जेट विकत घेण्याचा करार केला आहे. त्यातील तीन विमाने भारताकडे सुपूर्द करण्यात आली असून यावर्षी ती इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल होतील.

🎆 तसेच JF-17 हे चीन आणि पाकिस्तानने मिळून संयुक्तपणे विकसित केलेले फायटर विमान आहे. JF-17 च्या नव्या आवृत्तीचा लवकरच पाकिस्तानी हवाई दलात समावेश होणार आहे. या विमानाची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यात विमानाच्या नव्या आवृत्तीने पहिले उड्डाण केले.

🎆 तर दक्षिणपश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडुमध्ये JF-17 ब्लॉक 3 विमानाची उड्डाण चाचणी घेण्यात आल्याची माहिती एअरोस्पेसशी संबंधित असलेल्या मॅगझिनने दिली.

🎆 सध्या JF-17 फायटर विमाने पाकिस्तानी हवाई दलाकडे आहेत.

🎆 मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्यादिवशी पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती. त्यामध्ये JF-17 विमाने सुद्धा होती. JF-17 ही सिंगल इंजिन विमाने पाकिस्तानच्या पीएसी आणि चीनच्या सीएसीने मिळून विकसित केली आहेत.

🎆 चीनकडे असलेल्या अत्याधुनिक J-20 फायटर विमानांपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे तंत्रज्ञान JF-17 च्या नव्या आवृत्तीमध्ये वापरण्यात आले आहे. JF-17 ची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी नव्या आवृत्तीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

🎆 J-10C, J-16 आणि J-20 प्रमाणे JF-17 मध्ये विमानाच्या दिशेने येणाऱ्या मिसाइलची माहिती देणारी इन्र्फारेड सिस्टिम बसवण्यात आली आहे.

🎆 यावर्षी २०२० मध्ये JF-17 च्या नव्या आवृत्तीचा पाकिस्तानी हवाई दलात समावेश करण्यात येईल.

अंधांचे प्रकाशदूत : ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल

💁‍♂ अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत/लिपी विकसित करणाऱ्या लुई ब्रेल यांचा आज जन्मदिन.

👉 फ्रान्समधल्या  एका छोट्याशा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात 4 जानेवारी 1809 या दिवशी लुई ब्रेल यांना जन्म झाला. लुई तीन वर्षांचे झाले आणि अचानक एका अपघातात त्यांची दृष्टी गेली.

👉 वयाच्या तिसर्‍या वर्षी लुई कायमचे अंध झाले परंतु ते खचले नाही तीक्ष्ण बुध्दीमत्तेच्या लुई ब्रेलने रात्रंदिवस प्रयोग करून, संशोधन करून, कठोर परिश्रमाने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी एक अशी लिपी शोधून काढली होती की ज्यामुळे अंध व्यक्ती केवळ बोटांच्या स्पर्शाने अक्षरे वाचू शकेल. ज्या लिपीमुळे अंधांना वाचता येऊ लागले. त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले ती लिपी म्हणजे “ब्रेल लिपी” होय.

👉 लुई ब्रेल वयाच्या सतराव्या वर्षी सातवी, आठवीतल्या अंध मुलांना स्वत:च शोधलेल्या ब्रेल लिपित वाचायला शिकवत असे. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई शिकवत असे.

👉 लुई यांनी ब्रेल लिपित अनेक पुस्तके लिहिली. ते विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते शिक्षक होते, पण दुर्देवाने त्यांना क्षय झाला. त्यांच्या 43 व्या वाढदिवसानंतर अवघ्या दोनच दिवसांनी 6 जानेवारी 1852 ला ते मरण पावले.

👉 आज वापरली जाणारी ब्रेल लिपी सोपी व अत्यंत सोयीची असल्यामुळे लाखो अंधांच्या काळोख्या जगात ज्ञानाचा प्रकाश उगवला आहे; अर्थात हे सर्व, २०० वर्षांआधी एका कर्तबगार तरुणाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच शक्य झाले!

👉 4 जानेवारी 2009 या दिवशी भारत सरकारने लुई ब्रेलच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला. लुई ब्रेल यांचा जन्मदिवसानिमित्त संपूर्ण जगात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा होतो.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (उतरता क्रम)...

2018 (66 वां)अमिताभ बच्चन हिन्दी
2017 (65वां)विनोद खन्ना हिन्दी
2016 (64वां)कसिनाथुनी विश्वनाथ तेलुगू
2015 (63वां)मनोज कुमार हिन्दी
2014 (62वां)शशि कपूर हिन्दी
2013 (61वां)गुलजार हिन्दी
2012 (60वीं)प्राण हिन्दी
2011 (59वां)सौमित्र चटर्जी बंगाली
2010 (58वां)के. बालचन्दर तमिल & तेलुगू
2009 (57वां)डी. रामानायडू तेलुगू
2008 (56वां)वी. के. मूर्ति हिन्दी
2007 (55वां)मन्ना डे बंगाली & हिन्दी
2006 (54वां)तपन सिन्हा बंगाली & हिन्दी
2005 (53वां)श्याम बेनेगल हिन्दी
2004 (52वां)अडूर गोपालकृष्णन मलयालम
2003 (51वां)मृणाल सेन बंगाली
2002 (50वां)देव आनन्द हिन्दी
2001 (49वां)यश चोपड़ा हिन्दी
2000 (48वां)आशा भोसले हिन्दी&मराठी
1999 (47वां)ऋषिकेश मुखर्जी हिंदी
1998 (46वां)बी. आर. चोपड़ा हिन्दी
1997 (45वां)कवि प्रदीप हिन्दी
1996 (44वां)शिवाजी गणेशनतमिल
1995 (43वां)राजकुमारकन्नड़
1994 (42वीं)दिलीप कुमार हिन्दी
1993 (41वां)मजरूह सुल्तानपुरी हिन्दी
1992 (40वां)भूपेन हजारिका असमिया
1991 (39वां)भालजी पेंढारकर मराठी
1990 (38वां)अक्कीनेनी नागेश्वर राव तेलुगू
1989 (37वां)लता मंगेशकर हिन्दी, मराठी
1988 (36वां)अशोक कुमार हिन्दी
1987 (35वां)राज कपूर हिन्दी
1986 (34वां)बी. नागी. रेड्डी तेलुगू
1985 (33वां)वी. शांताराम हिन्दी&मराठी
1984 (32वां)सत्यजीत रे बंगाली
1983 (31वां)दुर्गा खोटे हिन्दी&मराठी
1982 (30वां)एल. वी.प्रसाद-हिन्दी,तमिल&तेलुगू
1981 (29वां)नौशाद हिन्दी
1980 (28वां)पैडी जयराज हिन्दी&तेलुगू
1979 (27वां)सोहराब मोदी हिन्दी
1978 (26वां)रायचन्द बोराल बंगाली&हिन्दी
1977 (25वां)नितिन बोस बंगाली&हिन्दी
1976 (24वां)कानन देवी बंगाली
1975 (23वां)धीरेन्द्रनाथ गांगुली बंगाली
1974 (22वां)बोम्मीरेड्डी नरसिम्हा रेड्डी तेलुगू
1973 (21वां)रूबी मयेर्स (सुलोचना)हिन्दी
1972 (20वां)पंकज मलिक बंगाली एवं हिन्दी
1971 (19वां)पृथ्वीराज कपूर हिन्दी
1970 (18वां)बीरेन्द्रनाथ सिरकर बंगाली
1969 (17वां)देविका रानी हिंदी

17 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (1969) पासून "दादासाहेब फाळके" पुरस्कार देण्यात येतो.

देशातील आतापर्यंतचे 48 'भारतरत्न'

💁‍♂ 'भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् - भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान

46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Current affairs questions bank

📍 कोण अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणारी महिला ठरली?

(A) जेसिका मीएर
(B) अ‍ॅन मॅक्लेन
(C) सॅली राइड
(D) क्रिस्टीना कोच ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "ड्रीम्स ऑफ ए बिलियन: इंडिया अँड ऑलिम्पिक गेम्स" हे पुस्तक ___ ह्यांनी लिहिले.

(A) चेतन भगत
(B) पी. टी. उषा
(C) उसेन बोल्ट
(D) बोरिया मुजूमदार ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 02 जुलै रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ........ यांच्याविरुद्ध एक विशेष मोहीम सुरू केली.

(A) बँकेची फसवणूक करणारे✅✅
(B) आयकर चुकविणारे गुन्हेगार
(C) मानव तस्करी करणारे
(D) वरील सर्व

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 38 अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या वाटाघाटीसह जगातला सर्वात महागडा घटस्फोट घेणार्‍या महिलेचे नाव काय आहे?

(A) मारिया मॅकेन्झी
(B) शेरल वुड्स
(C) श्रेया सिम्पसन
(D) मॅकेन्झी बेझोस✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 तामिळनाडूच्या राज्य सरकारने घोषित केलेल्या राज्य फुलपाखरूचे नाव काय आहे?

(A) साऊर्थन बर्ड विंग्ज
(B) कॉमन पिकोक
(C) तामिळ योमन✅✅
(D) मलबार बॅंडेड पिकोक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क (MFIN) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

(A) विनीत छत्री
(B) हर्ष श्रीवास्तव
(C) मनोज कुमार नांबियार✅✅
(D) ग्यान मोहन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ______ यांनी ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण केले.

(A) नागरी उड्डयन मंत्रालय✅✅
(B) अर्थमंत्रालय
(C) पर्यटन मंत्रालय
(D) वस्त्रोद्योग मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 _______ प्रकल्प हा नागरी उड्डयनाच्या क्षेत्रात भारत सरकारच्या ‘ई-गव्हर्नन्स’ उपक्रमाच्या अंतर्गत "कागदविरहित कार्यालय" साकारण्याची कल्पना केली.

(A) ई-पेपर
(B) ई-एव्हिएट
(C) ई-BCAS✅✅
(D) ई-हुर्रे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ ______ यासाठी आहे.

(A) हरवलेला मोबाईल फोन✅✅
(B) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करणे
(C) गायींची गणना अद्ययावत करणे
(D) जनगणना 2021 अद्ययावत करणे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ताज्या ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?

(A) आंध्रप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात _____ची वाढ झाली आहे.

(A) 100 चौरस किलोमीटर
(B) 54 चौरस किलोमीटर✅✅
(C) 1500 चौरस किलोमीटर
(D) 2050 चौरस किलोमीटर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दुसरी ‘तेजस’ रेलगाडी ____ या शहरांच्या दरम्यान धावणार आहे.

(A) मुंबई आणि ठाणे
(B) अहमदाबाद आणि मुंबई✅✅
(C) लखनऊ आणि दिल्ली
(D) चेन्नई आणि त्रिची

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोण अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणारी महिला ठरली?

(A) जेसिका मीएर
(B) अ‍ॅन मॅक्लेन
(C) सॅली राइड
(D) क्रिस्टीना कोच ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "ड्रीम्स ऑफ ए बिलियन: इंडिया अँड ऑलिम्पिक गेम्स" हे पुस्तक ___ ह्यांनी लिहिले.

(A) चेतन भगत
(B) पी. टी. उषा
(C) उसेन बोल्ट
(D) बोरिया मुजूमदार ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 02 जुलै रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ........ यांच्याविरुद्ध एक विशेष मोहीम सुरू केली.

(A) बँकेची फसवणूक करणारे✅✅
(B) आयकर चुकविणारे गुन्हेगार
(C) मानव तस्करी करणारे
(D) वरील सर्व

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 38 अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या वाटाघाटीसह जगातला सर्वात महागडा घटस्फोट घेणार्‍या महिलेचे नाव काय आहे?

(A) मारिया मॅकेन्झी
(B) शेरल वुड्स
(C) श्रेया सिम्पसन
(D) मॅकेन्झी बेझोस✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 तामिळनाडूच्या राज्य सरकारने घोषित केलेल्या राज्य फुलपाखरूचे नाव काय आहे?

(A) साऊर्थन बर्ड विंग्ज
(B) कॉमन पिकोक
(C) तामिळ योमन✅✅
(D) मलबार बॅंडेड पिकोक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क (MFIN) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

(A) विनीत छत्री
(B) हर्ष श्रीवास्तव
(C) मनोज कुमार नांबियार✅✅
(D) ग्यान मोहन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Super - 30 Questions Current Affairs

1).   ‘अर्थशॉट पारितोषिक’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
✅.  हवामानातले बदल

2.  धोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’ कोणत्या राज्यात आहे?
✅.  अरुणाचल प्रदेश

3.   NITI आयोगाच्या ‘शाश्वत विकास ध्येये निर्देशांक’ यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे?
✅.  केरळ

4.   दुसरी ‘तेजस’ रेलगाडी कोणत्या शहरांच्या दरम्यान धावणार आहे?
✅.  अहमदाबाद आणि मुंबई

5.   ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली आहे?
✅.   54 चौरस किलोमीटर

6.   ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?
✅.  कर्नाटक

7.   नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ कशासाठी आहे?
✅. हरवलेला मोबाईल फोन

8.   ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण कोणत्या मंत्रालयाने केले?
✅.   नागरी उड्डयन मंत्रालय

9.   कोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2019’ मिळाला?
✅.   अमिताभ बच्चन

10.   तृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे?
✅.  उत्तरप्रदेश

11.   2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती कोण?
✅.   रतन टाटा

12.   ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
✅.  उपराष्ट्रपती वेंकैया नायडू

13.   ओडिशा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला?
✅. बालांगीर

14.   ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण कोणत्या मंत्रालयाकडून झाले?
✅.  संरक्षण मंत्रालय

15.   UIDAI संस्थेनी केलेल्या घोषणेनुसार, किती लोकांकडे आधार पत्र आहे?
✅.   125 कोटी

16.   कोणत्या राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली?
✅.  हरयाणा

17.  डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे कोण होते?
✅.  राजकीय व्यंगचित्रकार

18.   फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?
✅.   फिलीपिन्स

19.   कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?
✅.  रशिया

20.  प्रथम ‘मंडू महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आले?
✅.   मध्यप्रदेश
- @mpsctopper7

21.  ‘विस्डेन’संस्थेच्या ‘दशकातले पाच क्रिकेटपटू’ च्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे?
✅.   विराट कोहली

22.   पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
✅.  भारत

23.  26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
✅.  शहीद उधम सिंग

24.   कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
✅.   वर्ष 2011

25.   मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
✅.  तामिळनाडू

26.   क्युबा देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
✅.  मॅन्युएल मरेरो क्रूझ

27.  QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेनी घेतली आहे?
✅.   संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)

28.   पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
✅.  गुलजार अहमद

29.   आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ कोणत्या नावाने ओळखले जाते?
✅.  ऑक्टोपस

30.    ICCच्या ताज्या 2019 कसोटी मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
✅.   विराट कोहली

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...