📚करोना काळात इस्रोने अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपलं मिशन पार पाडलं आहे. ISRO PSLV -C49 चं लाँचिंग करुन भारताने आणखी एक इतिहास घढवला आहे.
📚३ वाजून २ मिनिटांनी हे PSLV C49 लाँच करण्यात येणार होतं मात्र यासाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागला. इस्रोचं हे ५१ वं मिशन आहे. या प्रक्षेपणाचं लाइव्ह प्रसारण इस्त्रोची वेबसाइट, यूट्युब चॅनल, फेसबुक आणि ट्विटरवरही करण्यात आलं.
📚अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.
📚दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचं या मोहिमेसाठी कौतुक केलं आहे. आपला देश करोना संकटाशी लढत असतानाही देशाच्या वैज्ञानिकांनी जे यशस्वी लाँचिंग करुन दाखवलं त्याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केलं आहे.
📚EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला.
No comments:
Post a Comment