२६ डिसेंबर २०२०

Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण?



भारताचे माजी पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 


2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.


भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...