Saturday, 19 December 2020

E20 इंधन.


🔰भारत सरकारने इथॅनॉल सारख्या हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘E-20 इंधन’ स्वीकारण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली आहे आणि त्याबाबत नागरिकांकडून मते आमंत्रित केली आहेत.


🔰‘E-20 इंधन’ म्हणजे मोटरगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिन इंधनात 20 टक्के इथॅनॉल मिसळणे होय.‘E-20 इंधन’मुळे कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोकार्बन अश्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार.


🔰‘E-20 इंधन’च्या वापरामुळे तेलाची आयात कमी केली जाऊ शकते. त्यामधून विदेशी चलन वाचणार आणि ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार.


🔰इथॅनॉल (आण्विक सूत्र: ‘C2H5OH’) हा एक अल्कोहोल प्रकार आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण गंधसह एक स्पष्ट, रंगहीन द्रव आहे. शिवाय, इथॅनॉल एक ज्वलनशील द्रव आहे. त्याचे वितळण बिंदू ‘-114.1’ अंश सेल्सियस   आहे, आणि उकळण बिंदू ‘78.5’ अंश सेल्सियस आहे.


🔰 इथॅनॉल एक ध्रुवीय कंपाऊंड आहे. झिमेझ एंजाइमचा वापर करून साखर किण्वन प्रक्रियेद्वारे इथॅनॉल सहज मिळवता येते.


🔰पय म्हणून इथॅनॉल उपयुक्त आहे. इथॅनॉलच्या टक्केवारीनुसार, वाइन, बिअर, व्हिस्की, ब्रॅन्डी, अरॅक इत्यादींसारखे विविध प्रकारचे पेये आहेत.ते पेय म्हणून वापरण्याशिवाय आपण सूक्ष्मजीवांपासून पृष्ठभाग साफ करण्यासाठी एंटीसेप्टिक म्हणून इथॅनॉल देखील वापरू शकता येते. तसेच, वाहनांमध्ये इंधन आणि इंधन जोड म्हणून उपयुक्त आहे.

No comments:

Post a Comment