Thursday, 17 December 2020

'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM



कृषी उत्पन्नासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) याने त्यांच्या व्यासपीठावर 'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM नामक एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट मंच स्थापित केला आहे. BSE इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या त्याच्या सहाय्यक कंपनीमार्फत BEAM मंचाचे व्यवस्थापन केले जाणार आहे.


हा मंच उत्पादक, मध्यस्थ, ग्राहक तसेच सहाय्यक सेवांचा समावेश असलेल्या मूल्यवर्धित साखळीमधला व्यवहार सुलभ करणार.


वैशिष्टे


यात व्यापारी व शेतकर्‍यांना तसेच भागधारकांना विविध कृषी वस्तूंची जोखीम मुक्त खरेदी व विक्री सुलभ करून देण्याच्या हेतूने सोयीस्कर उपाययोजना उपलब्ध करुन देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला आहे.


मंच कमी खर्चाची मध्यस्थी, उत्पादकांची वर्धित प्राप्ती, सुधारित खरेदी कार्यक्षमता आणि अधिक प्रतिस्पर्धात्मक किंमती याची खात्री देणार. तसेच खरेदी आणि व्यापाराशी संबंधित अडथळे दूर करण्यात देखील मदत करणार.


शेतकरी देशभरातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकणार आणि त्यांच्या उत्पन्नाचा लिलाव करू शकणार. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित कृषी-उत्पन्नाला उत्कृष्ट किंमत मिळण्यास मदत होणार.

No comments:

Post a Comment