Sunday, 11 December 2022

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग 

1]. कोकण किनारपट्टी 

2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट 

3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी


1]. कोकण किनारपट्टी :


🔸 सथान: अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.


🔸 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.


🔸 लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  


🔸कषेत्रफळ: 30,394 चौ.कि 

----------------------------------------------

2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :


🔸 सथान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.


🔸 यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.


🔸 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. 

उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

------------------------------------------------

3]महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :


🔸 सथान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.


🔸 लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.


🔸 ऊची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.


🔸 महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...