Monday, 8 April 2024

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार

 

📌उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:-


-250 ते 300 सें.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात ही अरण्ये प्रामुख्याने आढळतात.

-सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, पश्चिम उतारावर आणि विशेषत: दक्षिण कोकणात अशाप्रकारची जंगले आढळतात. 

-रानआंबा ,जांभूळ हे मोठे वृक्ष, रानकेळी, कारवी, नेचे इत्यादी झुडपे आणि वेत यांची ही बरीच गर्दी या जंगलांमध्ये आढळते. 

-या जंगलातील लाकूड कठीण असल्याने आथिर्कदृष्टया तितकेसे महत्त्व नाही.



📌उष्ण कटिबंधीय अर्धसदाहरित अरण्ये:-


-150 ते 200 सें.मी. पाउस असलेल्या प्रदेशात या प्रकारची जंगले आढळतात. -उष्णकटिबंधीयसदाहरित अरण्ये व पानझडी वृक्षांची अरण्ये यांमधील जोडभागात ही अरण्येआहेत. 

-ही तुटक स्वरूपात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पायथ्याकडील भागात व खंडाळयासारख्या ठिकाणी घाटमाथ्याकडील भागात आढळतात.

-या प्रकारच्या अरण्यात सदाहरित व पानझडी या दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात. 

-किंडाळ, शेवरी, आइन, हेदू, कदंब व काही प्रमाणावर बांबू या जंगलामध्ये प्रामुख्याने आहेत. यातील काही जाती आथिर्कदृष्टया महत्त्वाच्या आहेत.



📌पानझडी वृक्षांची अरण्य:-


-पश्चिम घाटाच्या पूर्वेस 100 ते 150 सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही जंगले आढळतात. 

-कोरडया हवेच्या काळात बाष्पाचे प्रमाण टिकविण्यासाठी या प्रकारची झाडे आपली पाने गाळतात. 

-या प्रकारच्या अरण्यांचे पावसाच्या प्रमाणानुसार आर्द्रपानझडी अरण्ये व शुष्क व पानझडी अरण्ये असे दोन प्रकार पडतात. 

-गोंदिया, चंद्रपूर व भंडाराजिल्हे, सह्याद्री पूर्व उतार, महादेव,हरिश्चंद्र व सातमाळरांगा, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतभाग आणि ठाणे जिल्ह्याचा डोंगराळ प्रदेश या भागात ही जंगले आहेत.

-साग, आईन, हिरडा, कुसुम, शेवरी, आवळा, शिरीष, पळस, खैर, शिसव, अंजन इत्यादी जातीचे वृक्ष या जंगलांमध्ये दिसतात. आथिर्कदृष्टया या जंगलांना फार महत्त्व आहे.



📌उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटया वनस्पतीची अरण्ये:-


-पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळआहेत. 

-या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती उगण्याचे कारण आाहे. 

-नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. 

 -बाभूळ, बोर, खैर, निंब हेवृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.



📌मग्रॅुव्ह प्रकारची अरण्ये:-


-किनारपट्टीलगत समुद्रकाठच्या दलदलीच्या प्रदेशात व खाऱ्याजमिनीत 'मॅंग्रुव्ह'(खारफुटी) प्रकारची जंगले आढळतात. 

-यामध्ये चिपी, मारांडी झुडपे व तिस वृक्ष इत्यादी फक्त खाऱ्या जमिनीत वाढणाऱ्या जातीच आढळतात.



📌जगलाखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी 80 पेक्षा अक्षिक जास्त प्रदेश वनखात्याच्या ताब्यात आहे. 

यातील जवळजवळ 65 ते 70 जंगले राखीव व सुरक्षित आहेत. 


-महाराष्ट्रातील जंगले चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे,दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात केंद्रीत झाली आहेत. विदर्भात सर्वात कमी म्हणजे 4.5 जमीन जंगलाखाली आहे.


📌सदाहरित वने:-


-महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधारणत: 1,200 ते 1,400 मी.उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात. 

-या भागात पर्जन्यमान 360 ते 600 सेंमी. असते, या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. 

-पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. 

-या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात. 

-विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी, पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.



📌निमसदापर्णी वने :-


-सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात. 

-या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो. 

-उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, हिन्हई, जांबत वगैरे तर मध्यम झाडोरा आढळतो. 

-सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिकदृष्टया हया वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.


आर्द्र पानझडी वने :---


--घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, काही वेळा सपाटीवर सुध्दा या प्रकारची वने आढळतात.

-पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. 

-जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते

-व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे. 

-वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते. 

-उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष, अर्जुन सादडा,धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

-सागवान इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारतीमालांपेक्षा कित्येक पटीनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते, अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढयांच्या काठी साधारणत: बाबूंची बेटे आढळतात.



📌शष्क पानझडी वृक्षवने :---


-या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.

-उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात.

-अशा रानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण,टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. 

-इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. 


📌खाडीकाठची खाजण वने :--


-कोकण प्रदेशातील काही खाडयांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात. 

-भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते अशा रानातील वृक्षांची उंची 4 ते 6 मी. असते. 

-पाणथळ जमिनीमुळे वृक्षांच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात. 

-अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो.  


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...