Tuesday, 22 December 2020

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस.


💉युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला 850 टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा अभाव ठेवला जाणार नाही, तसेच प्राधान्याने हे काम केले

जाईल.


💉तर करोना प्रतिबंधक लस विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानही वापरली जातील.


💉या जीवघेण्या आजारावर लस विकसित करणाऱ्या देशांकडून गरीब देशांमध्ये 70 हजार फ्रीजची खरेदी करुन ते पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत बसवले जातील.


💉तर या आधुनिक फ्रीजच्या माध्यमातून करोना महामारीच्या लसीच्या उपलब्धतेचा परीघ वाढवण्यात येईल. ‘कोवैक्स’ लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानाची गरज असते. या कामात हे फ्रीज महत्वाची भूमिका बजावतील.तसेच या फ्रीजची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे हे फ्रीज सौर ऊर्जेवर चालतील.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...