♻️पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या ‘एचजीसीओ 19’ या कोरोना लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना भारतीय औषध महानियंत्रकांकडून मान्यता देण्यात आली आहे. ही देशातील पहिली एमआरएनए आधारीत लस आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिनोव्हाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत लसीच्या प्रगतीची माहिती घेतली होती.
♻️अमेरिकेतील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने ही लस विकसीत करण्यात आली आहे.तर केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने या लसीच्या विकसनासाठी अर्थसहाय्य केले आहे.
♻️जिनोव्हा कडून काही दिवसांपुर्वीच चाचण्यांसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार तज्ज्ञ समितीने काही अटींच्या आधारे चाचण्यांना मान्यता दिली आहे.पहिल्या टप्प्यातील चाचण्यांची अंतरिम माहिती समितीकडे सादर केल्याशिवाय चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करता येणार नाही, असे समितीने म्हटले आहे.
♻️दरम्यान, पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. त्यातच पुण्यातीलच ‘जिनोव्हा’च्या ‘एमआरएनए’ आधारीत लसीचीही लवकरच चाचणी सुरू होणार असल्याने संपुर्ण जगाचे लक्ष पुण्याने वेधले आहे.
No comments:
Post a Comment