Thursday, 10 December 2020

शेतकरी समुह अर्थ व स्थिती


*🔻- अर्थ-*---

  शहरी क्षेत्रात श्रीमंत, मध्यम व गरिब असे तिन गट अाढळतात. आर्थिक स्थितीमधिल तफावतीमुळे या तीन्ही गटाची जिवनपद्धती वेगवेगळी असते. ग्रामिन क्षेत्रातही श्रीमंत वा बागायतदार शेतकऱ्यांचे मध्यम शेतकरी, अल्पभुधारक शेतकरी, व भुमिहीन शेतमदुर असे भिन्न गट आहेत. ग्रामीण समुहात जमिनविषयक संबंध अत्यंत महत्ल़वाचे आहेत. या समुहातुनच हे उपसमुह निर्मान झाले आहेत. या सर्व उपगटाची अार्थिक स्थिती भिन्न असली तरी आचार विचारांची पद्धती , जीवनविषयक दृष्टीकोन यांत काही फारसा फरक नसतो. सर्वात महत्वाचे म्हनजे या सर्वांच्या शेती या व्यवसायाचे स्वरुप. समान असते. निसर्गाची अवकृपा झाली की, त्याचा फटका लहान व मोठ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमानात बसतो. शेतमजुरांची उपलब्धता ही मध्यम शेतकऱ्यांप्रमानेच बागायतदारामचीही समस्या होउ लागली आहे. शेतमालाच्या अल्प किंमती व उत्पादन खर्च जास्त याचा ताळेबंद जमत नसल्यामुळे "शेती करने परवडत नाही " ही ओरडवग्रामीन भागात सार्वत्रिक स्वरुपाची बनली आहे.  या दृष्टीनेच आपन ग्रामीनक्षेत्रामधिल शेतकरी या विशाल आकाराच्या समुहाची ओळख करुन घेत आहोत. 

======


*🔻- भारतिय शे़तकऱ्यांची जिवनविषयक स्थिती -*


विभिन्न शास्त्रांनधिल अध्ययन, सर्वेक्षन, नेत्याचे विचार यांसारख्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनविषयक स्थितीचे चिन्ह पुढील प्रमाने मांडले जाते.

भारतीय शेतकरी कर्दबाजारी आहेत. तेनअल्पशिक्षित व कर्जबाजारी असून परंपरावादी व सनातनी वृतीचे आहेत. ते शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीतून पाहन्यापेक्षा पोट भरन्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहतात. यामुळे शेतीव्यवसायातील उत्पन्न व उत्पादन सिमीत राहिले आहे. ते शासनाने ठरवलेल्या विकास योजनांचा मोकळ्या मवाने स्विकार करत नाहीत. उत्पादन वाढीसाठी खासवप्रयत्न करन्याची प्रेरना व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करन्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. 

         शेती उत्पादनाची हेतु व उत्पादन तंत्र यांमध्ये सुधारना झाल्याशिवाय त्यांच्या आर्थिक व जीवनविषयक स्थितीमध्ये फारसा बदल घडून येने शक्य नाही.

               

*शेतकरी संघटना*---

      सुमारे ७०% लोक शेतीव्यवसायाशि निगडित आहेत. असे असऩुन देखिल शेतकरी संघटित नाहीत. ब्रिचिश राजवटी पासुनचे चित्र गेल्या २०-२५ वर्षांपासुन बदलु लागले आहे. शेतीव्यवसायासी ल़संबंधित विविध प्रश्नानी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्मान झाला आहे. शेतकऱ्यांच्या या असंतोषातुनच अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली व त्यांच्या संघटना निर्माण झाल्या.

शासनाचे धोरन व निर्णय यांवर प्रभाव टाकनाऱ्या संघटित गटांना हितसंबंधि गट व दबाव गट संबोधले जाते. शेतकरी संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातुन प्राप्त झाल़्ल्या अनेक गौष्टींकडे नजर टाकली , की या संघटनेने दबाव गट म्हनुन आपले  स्थान निर्मान करन्यास यश प्राप्त केले आहे. 

औद्योगिक क्षेत्रातिल दबावगटांच्या तुलनेत शेतकरी संघटना या दबावगटाचा प्रभाव फारच कमी आहे. शेतकरी संघटनांची शक्ती व प्रभाव फारसा वृद्धींगत न होन्याची कराने कोनती, हे देखिल तपासुन पाहता येईल. फुमशेती,वनौषधी, जैविक शेति , करन्याकडे शेतकऱ्यांचे मन वळविने , ग्रामीन जीवनात सुधारना घडवून आननाऱ्या चळवळि घडवून आनने, यांसारखी अनेक विधायक काम करन्यास शेतकरी संघटनांना भरपूर वाव आहे असे म्हनता येईल. थोडक्यात , शेतकऱ्यांचे हितसंबंध व त्यांच्या मागन्या शासनासमोर सुस्पष्चपने मांडन्याचे आणि शेतकऱ्यांना संघटित करन्याचे महत्वपुर्ण कार्स शेतकरी संघटनांनी केले आहे. म्हनुनच शेतकरी संघटनेच्या राजकिय, आक्थिक व सामाजिक क्षेत्रामधिल कार्याला तसेच त्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्तवझाले आहे असे म्हनता येईल.

No comments:

Post a Comment