१. मँगेनीज:- भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.
२. बॉक्साईट- भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे. -
जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे.
जिल्हा - भंडारा.
४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.
५. डेलोमाईट - देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - रत्नागिरी, यवतमाळ.
६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.
जिल्हे - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर.
७. दगडी कोळसा:- महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.
जिल्हे - नागपूर, चंद्रपूर,
८. लोहखनिज- भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.
९. ग्रॅनाईट - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सापडतो.
१०.तांबे - नागपूर व यवतमाळ जिल्हयात अत्यल्प प्रमाणात सापडते.
११.अधक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडते.
१२.टंगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडते.
१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
No comments:
Post a Comment