Saturday, 5 December 2020

अक्साई चीनला दाखवलं चीनचा भाग, भारत सरकारचा विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश


🔶ऑनलाइन एनसायक्लोपीडिया विकिपीडियाच्या साईटवरील नकाशामध्ये अक्साई चीनला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. सरकारने विकिपीडियाला तो नकाशा हटवण्यास सांगितले आहे. सरकारने विकिपीडियाला पाठवलेल्या पत्रामध्ये अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला आहे.


🔶 इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत विकिपीडियाला तो नकाशा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. भारत-भूतान संबंधावरील विकिपीडियाच्या पानावर जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. एका टि्वटर युझरने विकिपीडियाच्या या चुकीकडे लक्ष वेधले. त्याने सरकारकडे कारवाई करण्याचीही विनंती केली.


🔶 या तक्रारीची दखल घेत मंत्रालयाने २७ नोव्हेंबरला विकिपीडियासाठी आदेश जारी केला. विकिपीडियाच्या साईटवरील चुकीचा नकाशा म्हणजे भारताच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. त्यामुळे तो नकाशा हटवण्यात यावा असे या आदेशात म्हटले होते. विकिपीडियाने ऐकले नाही, तर भारत सरकार कायदेशीर कारवाई करु शकते असे सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...