Thursday 17 December 2020

बायडेन यांचा व्हाईट हाऊसचा मार्ग मोकळा.



जुने पान उलटून आता नव्याने एकत्र येत जखमांवर फुंकर घालण्याची ही वेळ आहे, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. प्रतिनिधी वृंदानेही त्यांच्या विजयार शिक्कामोर्तब केले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पराभव मान्य करण्यास नकार देतानाच निकालाविरोधात अनेक न्यायालयांत आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.


अमेरिकेतील ५३८ जणांच्या प्रतिनिधिवृंदाने सोमवारी बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले असून आता  व्हाइट हाऊसकडे जाण्याचा बायडेन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकी अध्यक्षीय प्रक्रियेत प्रतिनिधी वृंदाचे शिक्कामोर्तब हा अंतिम टप्पा असतो. पुढील वर्षी जानेवारीत बायडेन हे देशाची सूत्रे हाती घेतील. अमेरिकी निवडणूक पद्धतीत मतदार हे प्रतिनिधी निवडीसाठी मतदान करीत असतात व ते प्रतिनिधी एक आठवडय़ानंतर अध्यक्षीय उमेदवारांसाठी प्रत्यक्षात मतदान करतात.


डेलावेअरमधील विमिंग्टन येथून केलेल्या भाषणात बायडेन यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाने अमेरिकेतील इतिहासाचे एक नवे पान उघडले गेले आहे. या आधीच्या राजवटीत लोकशाहीच पणाला लागली होती. पण निवडणुकीतील निकालानंतर आता ही लोकशाही पुन्हा मजबूत होणार आहे. कायद्याचे राज्य, राज्यघटना व लोकांची इच्छा यांचाच विजय झाला असून  ट्रम्प यांनी निवडणूक निकालास आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न फसला आहे.


लोकशाहीची ज्योत अनेक वर्षांंपूर्वी पेटवली गेली ती कुणीच विझवू शकत नाही. सत्तेचा गैरवापर, कुठल्या रोगाची साथ किंवा अन्य कशाचाही परिणाम न होता ही ज्योत तेवत राहणार आहे. अमेरिकी लोकशाहीच्या मूल्यांचा यात विजय झाला असून ज्या लोकांनी मतदान केले. ज्यांनी लोकशाही संस्थांवर विश्वास टाकला त्यांचा हा विजय असून यातून देशातील एकजूट दिसून आली आहे. आता आपण जुने पान उलटून नव्या पानावर आहोत, सर्वाची एकजूट करु. पूर्वीच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम करावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment