▪️जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.
▪️जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.
▪️विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी असते.
▪️ उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.
▪️जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.
▪️जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.
▪️ पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.
⭕️ क्षारयुक्त जमिनींची सुधारणा ⭕️
▪️ शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.
▪️शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.
▪️ सेंद्रिय खतांचा हेक्टरी 20 ते 25 टन वापर करावा.
▪️जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.
▪️ हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.
▪️ भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.
▪️सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू.
No comments:
Post a Comment