Monday, 8 April 2024

पोलीस भरती प्रश्नसंच

 दक्षिण भारतातील गंगा कुठल्या नदीला म्हंटले जाते

१) गोदावरी ✅✅✅

२) कृष्णा

३) भीमा

४) नर्मदा 



 १)गोदावरीची एकूण लांबी १,४६५ km आहे.

२) महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी ८०० km आहे.

३) गोदावरी नदी महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते

 अचूक नसलेली विधाने निवडा.


१) १,२ 

२) २,३ ✅✅✅

३) १,२,३

४) फक्त २

गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर आहे

गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते




 कळसूबाई शिखरावर कुठली नदी उगम पावते

१) प्राणहिता

२) इंद्रावती

३) मांजरा

४) दारणा ✅✅✅


दारणा नदी गोदावरी ची उजवी उपनदी आहे

 १)सातमाळा  डोंगरा वर शिवणा नदी उगम पावते

२) बालाघाट डोंगर रांगेत प्रवरा नदी उगम पावते

३) गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे


बिनचूक विधाने निवडा

१) १,२

२) २,३

३) १,२,३

४) १,३ ✅✅✅✅

बालाघाट डोंगर रांगात सिंधफणा नदी उगम पावते

प्रवरा नदी हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदरा जवळ उगम पावते



नेवासे शहर कुठल्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहावर वसलेले आहे.

१) मुळा मुठा

२) प्रवरा शिवणा

३) मुळा दारणा

४) प्रवरा मुळा ✅



 खालीलपैकी कुठली नदी गोदावरी नदीला डाव्या तिरावरून येऊन भेटते

१) शिवना✅✅✅

२) प्रवरा

३) दारणा

४) बोर


शिवना नदी ही गोदावरी ला डाव्या तिरा कडून येऊन भेटते तर प्रवरा दारणा आणि बोर या नद्या उजवा तीरावरून गोदावरीला येऊन भेटतात


 प्राणहिता नदी खालीलपैकी कुठल्या नद्या मिळून तयार झाली आहे.

१) वर्धा आणि वैनगंगा

२) वर्धा आणि पैनगंगा

३) वैनगंगा आणि पैनगंगा

४) वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा✅✅✅✅




खालीलपैकी कुठल्या नद्या भीमानदीच्या डाव्या उपनद्या आहेत

१)  सीना

२) माण

३) घोड

४) वेळ


१) १,२,३

२) २,३,४

३) १,३,४ ✅✅✅✅

४) वरीलपैकी सर्व 


माण ही नदी भीमा नदीची उपनदी


 १) कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो.

२) कृष्णा नदीच्या नदी प्रवाहाची दिशा उत्तर - दक्षिण आहे

३) कऱ्हाड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो

चूक नसलेली विधाने निवडा

१) १,२

२) २,३

३) १,२,३ ✅✅✅

३) १, 3



 डाव्या किनाऱ्याने कृष्णा नदीस कुठली नदी मिळते

१) दूधगंगा

२) तुळशी

३) पंचगंगा 

४) येरळा ✅✅✅


कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त येरळा नदी येऊन मिळते



तापी नदी कुठल्या राज्यातून वाहते

१) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ✅✅✅✅

२) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड

३) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश

४) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक



खोल घळई मधून कुठली नदी वाहते

१) तापी ✅✅✅

२) गोदावरी

३) कृष्णा

४) भीमा


तापी नदीचे क्षेत्र खचदरी च्या भागात येते म्हणून ही नदी खोल घळई मधून वा



१) कोकणातील नद्या लांबिने खूप लहान असून मंद गतीने वाहतात

२)  कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी आहे.

३) कोकणातील नद्या पञ्चीमवाहिनी नद्या आहेत

४) कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात.


बिनचूक नसलेली विधाने निवडा.

१) १,२

२) २,३

३)  १,३

४) १,४ ✅✅✅


कोकणातील नद्या लांबीने लहान असतात परंतु त्या वेगाने वाहतात

कोकणातील नद्या खाड्या तयार करतात



महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे

१) 65%

२) 81%

३) 70 %

४) 75% ✅✅✅



 महाराष्ट्रातील लांबीनुसार नद्यांचे क्रम लावा

१) गोदावरी, तापी, भीमा, वैनगंगा

२) गोदावरी , भीमा , वैनगंगा ,तापी

३) गोदावरी, भीमा, तापी, वैनगंगा

४) गोदावरी, वैनगंगा, भीमा , तापी ✅✅✅


गोदावरी 668 km

वैनगंगा 495 km

भीमा 451 km

तापी 208 कम



नद्यांच्या खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार नद्यांचा चढता क्रम ओळखा

१) भीमा, वर्धा, कृष्णा, गोदावरी

२) कृष्णा, वर्धा, भीमा, गोदावरी ✅✅✅✅

३) वर्धा, कृष्णा ,भीमा , गोदावरी

४) वर्धा, भीमा, कृष्णा, गोदावरी





खालीलपैकी अचूक विधान ओळखा? 

A)  सातमाळा अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे.

B) गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगामुळे अलग झालेले आहे.

 *पर्यायी* *उत्तरे* 

1) अ आणि ब दोन्ही सत्य

2) अ आणि ब दोन्ही असत्य

3) हे सत्य असून बी असत्य आहे✅✅

4) हे असत्य असून बी सत्य आहे.

 *स्पष्टीकरण* गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट या रंगामुळे अलग झालेले आहे.





महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत?

1) गोदावरी,  मांजरा, तापी✅

2) गंगा गोदावरी कृष्णा

3) महानदी कावेरी तापी




खालीलपैकी अचूक विधाने ओळखा? 

1)  गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किमी आहे. 

2) भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किमी आहे. 

3) कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किमी आहे. 

4) तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किमी आहे.

1 comment: