Tuesday, 29 December 2020

दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2020 रोजी दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर (जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत) भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले.


🔰मॅजेंटा मार्गावर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक मार्गामध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत.


✅ठळक बाबी....


🔰‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ सेवेचा दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेस मार्गापर्यंत विस्तार करण्यात आला. गेल्या वर्षी अहमदाबाद शहरात या सेवेची सुरवात करण्यात आली होती.‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रवाश्यांना देशात कुठेही आणि कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना एकीकृत संधी प्रदान करते.


🔰देशातल्या कोणत्याही भागातून प्राप्त झालेले रुपे-डेबिट कार्ड असलेल्या व्‍यक्तिला ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ वापरुन विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येणार अआहे. ही सुविधा 2022 सालापर्यंत संपूर्ण दिल्ली मेट्रो जाळ्यासाठी उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...