भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.
परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.
परराष्ट्रमंत्र्यांची यादी
नाव (कार्यकाळ)
▪️जवाहरलाल नेहरू (२ सप्टेंबर १९४६ - २७ मे १९६४)
▪️गलझारीलाल नंदा (२७ मे १९६४- ९ जून १९६४)
▪️लाल बहादूर शास्त्री (९ जून १९६४- १७ जुलै १९६४)
▪️सरदार स्वरणसिंग (१८ जुलै १९६४- १४ नोव्हेंबर १९६६)
▪️एम.सी. छगला (१४ नोव्हेंबर १९६६- ५ सप्टेंबर १९६७)
▪️इदिरा गांधी (६ सप्टेंबर १९६७- १३ फेब्रुवारी १९६९)
▪️दिनेश सिंग (१४ फेब्रुवारी १९६९- २७ जून १९७०)
▪️सरदार स्वरणसिंग (२७ जून १९७०- १० ऑक्टोबर १९७४)
▪️यशवंतराव चव्हाण (१० ऑक्टोबर १९७४- २४ मार्च १९७७)
▪️अटलबिहारी वाजपेयी (२६ मार्च १९७७- २८ जुलै १९७९)
▪️शयाम नंदन प्रसाद मिश्रा (२८ जुलै १९७९- १३ जानेवारी १९८०)
▪️पी.व्ही. नरसिंह राव (१४ जानेवारी १९८०- १९ जुलै १९८४)
▪️इदिरा गांधी (१९ जुलै १९८४- ३१ ऑक्टोबर १९८४)
▪️राजीव गांधी (३१ ऑक्टोबर १९८४- २४ सप्टेंबर १९८५)
▪️बलीराम भगत (२५ सप्टेंबर १९८५- १२ मे १९८६)
▪️पी. शिवशंकर (१२ मे १९८६- २२ ऑक्टोबर १९८६)
▪️नारायण दत्त तिवारी (२२ ऑक्टोबर १९८६- २५ जुलै १९८७)
▪️राजीव गांधी (२५ जुलै १९८७- २५ जून १९८८)
▪️पी.व्ही. नरसिंह राव (२५ जून १९८८- २ डिसेंबर १९८९)
▪️विश्वनाथ प्रताप सिंग (२ डिसेंबर १९८९- ५ डिसेंबर १९८९)
▪️इदर कुमार गुजराल (५ डिसेंबर १९८९- १० नोव्हेंबर १९९०)
▪️विद्याचरण शुक्ला (२१ नोव्हेंबर १९९०- २० फेब्रुवारी १९९१)
▪️माधवसिंह सोळंकी (२१ जून १९९१- ३१ मार्च १९९२)
▪️पी.व्ही. नरसिंह राव (३१ मार्च १९९२- १८ जानेवारी १९९३)
▪️दिनेश सिंग (१८ जानेवारी १९९३- १० फेब्रुवारी १९९५)
▪️परणव मुखर्जी (१० फेब्रुवारी १९९५- १६ मे १९९६)
▪️सिकंदर बख्त (२१ मे १९९६- १ जून १९९६)
▪️इदर कुमार गुजराल (१ जून १९९६- १८ मार्च १९९८)
▪️अटलबिहारी वाजपेयी (१९ मार्च १९९८- ५ डिसेंबर १९९८)
▪️जसवंत सिंग (५ डिसेंबर १९९८- २३ जून २००२)
▪️यशवंत सिन्हा (१ जुलै २००२- २२ मे २००४)
▪️नटवर सिंग (२२ मे २००४[१]- ६ नोव्हेंबर २००५)
▪️मनमोहन सिंग (६ नोव्हेंबर २००५- २४ ऑक्टोबर २००६)
▪️परणव मुखर्जी (२४ ऑक्टोबर २००६[३]- २२ मे २००९)
▪️एस.एम. कृष्णा (२२ मे २००९- २६ ऑक्टोबर २०१२)
▪️सलमान खुर्शीद (२८ ऑक्टोबर २०१२- २६ मे २०१४)
▪️सषमा स्वराज (२६ मे २०१४- )
No comments:
Post a Comment