१० डिसेंबर २०२०

माऊंट एव्हरेस्टच्या नव्या उंचीची अधिकृत घोषणा


📍 जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची ८,८४८.८६ मीटर असल्याची अधिकृत घोषणा नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी केली. 


👉 माऊंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा ०.८६ सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली. 


✨ जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर आज मंगळवारी नेपाळने एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर केली. 


🎯 दरम्यान, भूकंपानंतर हे शिखर काहीसं खचलं असल्याची शक्यता असल्याने पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे नेपाळ सरकारकडून सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...