Saturday, 19 December 2020

कषी कायदे एका रात्रीत तयार झाले नाहीत, तर…: पंतप्रधान मोदी.



💠नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात या महासंमेलनाला जमलेल्या शेतकऱ्यांचे आभार मानले. तसंच यावेळी पंतप्रधानांनी एमसपी, बाजार बंद होणार नाही.


🌐असा जो प्रचार केला जात आहे तो खोटा असल्याचं सांगत नव्या कृषी कायद्यांविरोधातील भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. कृषी कायदे एका रात्रीत तयार करण्यात आलेले नाहीत. यावर गेल्या २०-३० वर्षांपासून राज्यांशी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी, अर्थतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.


🌐“तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहेत. याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत नव्हतं. परंतु आम्ही आता देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, आता शेतकऱ्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे. यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचं आव्हान केलं आहे,” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment