Sunday, 20 December 2020

जीवनसत्त्व के

 

» या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव मिथिल नॅप्थोक्विनोन आहे. 

» एच्. डाम आणि ई. ए. डॉइझी या वैज्ञानिकांना के जीवनसत्त्वावर केलेल्या संशोधनासाठी १९४३ सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

» के जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्यांत, विशेषत: पालक या भाजीत भरपूर प्रमाणात असते. 

» कोबी, फुलकोबी, टोमॅटो, सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक व माशांचे चूर्ण यांतही ते असते. 

» लहान आतड्यातील जीवाणू अन्नपदार्थातील पूर्वगामी घटकांपासून हे जीवनसत्त्व तयार करतात. 

» प्रौढ व्यक्तीला दररोज सु. १२० मायक्रोग्रॅम के जीवनसत्त्व आवश्यक असते. 

» रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी प्रोथ्राँबिन या प्रथिनाची गरज असून ते यकृतात तयार होते. यकृतात प्रोथ्राँबिन तयार होत असताना के जीवनसत्त्व विकराचे काम करते. प्रोथ्राँबिन हा थ्राँबिन या प्रथिनाचा पूर्वगामी आहे. 

» या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठायला वेळ लागतो. अतिरक्तस्राव टाळण्याचे कार्य के जीवनसत्त्व करते. 

» अतिरक्तस्रावाची शक्यता असल्यास गर्भवती मातांना प्रसूती आधी आणि नुकत्याच जन्मलेल्या बालकांना के जीवनसत्त्व देतात.

» जलविद्राव्य जीवनसत्त्वाच्या  गटात ब समूह जीवनसत्त्वे आणि क जीवनसत्त्वाचा समावेश होतो.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...