Sunday, 20 December 2020

लोकसभेच्या सभापतींचा इतिहास


१) सभापती आणि उपसभापती ही पदे भारतात 1921 मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 1919 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आली.


 २) त्या वेळी सभापती व उपसभापती यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हटले जात होते आणि हीच नामाभिधान 1947 पर्यंत होती.


३) सन 1921 पूर्वी भारताचा गव्हर्नर जनरल केंद्रीय विधीमंडळ परिषदांच्या बैठकांच्या अध्यक्षस्थानी असे. 


४) सन 1921 मध्ये गव्हर्नर जनरलने फेडरिक व्हाईट आणि सच्छितानंद सिन्हा यांची केंद्रीय विधीमंडळाचे अनुक्रमे पहिले सभापती आणि उपसभापती या पदांवर नियुक्ती केली.


 ५) सन 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय विधिमंडळ परिषदेचे पहिले भारतीय व पहिले निर्वाचित सभापती बनले.


६) मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याचा मान जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार यांना मिळाला.


 ७) जी व्ही मावळणकर हे संविधान सभेचे तसेच हंगामी संसदेचे सभापती होते.


 ८) ते 1946 ते 1956 असे सलग दशकभर लोकसभेचे सभापती होते.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...