Tuesday, 29 December 2020

ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना राज्य सरकारचे अर्थसाहाय्य


⛺️टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंना सोमवारी राज्य सरकारद्वारे प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. राज्यातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.


⛺️या खेळाडूंमध्ये नेमबाज राही सरनोबत, नेमबाज तेजस्विनी सावंत, धावपटू अविनाश साबळे तसेच पॅरालिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. वर्षां येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘खेळाडू हे राज्याचे वैभव आहेत. टोक्यो ऑलिम्पिकसाठी राज्यातील पाच खेळाडू पात्र ठरले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवावी लागतात, त्यासाठी कठोर परिश्रमासह एकाग्रता महत्त्वाची असते. राज्यातील हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून राज्यासह देशाची मान उंचावतील, अशी आशा आहे.’’


⛺️नमबाज राही सरनोबत हिने सांगितले की, ‘‘आम्ही सर्व खेळाडू पदक जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत. सरकारच्या पाठिंब्यामुळे आम्ही ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यशस्वी होऊन राज्याचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करू.’’

No comments:

Post a Comment