Sunday, 20 December 2020

जीवनसत्त्व क


» याचे रासायनिक नाव अॅस्कॉर्बिक आम्ल आहे. 

» लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, ओला वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, कोबी, बीट व गाजर यांत क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. 

» रोजची गरज ९० मिग्रॅ. असते. संयोजी ऊतीमधील कोलॅजेन तंतूंच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. 

» ते प्रतिऑक्सिडीकारक म्हणून कार्य करते. क जीवनसत्त्व त्रुटीमुळे होणाऱ्या विकारास स्कव्र्ही म्हणतात. 

» या विकारात मनुष्याचे वजन घटते, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ होतात व स्नायू कमजोर होतात, हिरड्या सुजतात, रक्तस्राव होतो आणि सौम्य स्पर्शानेही हिरड्यांमधून रक्त येते. परिणामी दात सैल होतात. 

» या जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...