Thursday, 17 December 2020

भारतीय वंशाचे राजा जॉन ‘नासा’च्या चांद्रवीर चमूत



⚡️अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या अठरा जणांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरुपतूर चारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या चमूत निम्म्या महिला आहेत. 


⚡️चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत. नासाने त्यांची निवड चांद्रमोहिमेतील संभाव्य चांद्रवीरात केली आहे. नासाने बुधवारी १८ संभाव्य चांद्रवीरांची यादी जाहीर केली असून आर्टेमिस चांद्र अवतरण मोहिमेत त्यांच्यापैकी काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे. 


⚡️ही मोहीम २०२४ मध्ये माणसाला चंद्रावर उतरवणार आहे. दशक अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी अस्तित्व निर्माण करण्याचा हेतू या मोहिमेत असून त्याची पहिली पायरी म्हणून २०२४ मध्ये पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे. 


⚡️यापूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमांनी चंद्रावर मानवी मोहिमा राबवल्या होत्या.

No comments:

Post a Comment