🔰भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
🔰शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेची 19 वी बैठक नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्षपद एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे होते.
❄️ठळक बाबी
🔰शांघाय सहकार संघटनेच्या सदस्य देशांचे एकत्रितपणे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
🔰या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या कलाकृतींचे त्रिमितीय स्कॅनिंग करण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेबजीएल मंच, आभासी जागेचा विनियोग, नवसंकल्पनेतून मांडणी आणि पुरातन वस्तूंविषयीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
🔰बौद्ध तत्वज्ञान आणि मध्य अशियातील कला हे शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) देशांना एकमेकांशी जोडणारे आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये अशिया खंडातल्या विविध संग्रहालयातल्या कलात्मक समृद्धीची झलक पहायला मिळते. त्याचबरोबर बौद्ध शाळांचा विकास कसा टप्प्याटप्याने होत गेला, याची माहिती देणारे आणि ऐतिहासिक काळाचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करणारे प्रदर्शन आहे.
❄️शांघाय सहकार्य संघटना (SCO) विषयी
🔰शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. संघटनेचे मुख्यालय बिजिंग (चीन) येथे आहे. ही एक यूरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे.
🔰SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा संघटनेचा संस्थापक देश आहे. भारताला या संघटनेचे 2017 साली पूर्ण सदस्यत्व मिळाले.
No comments:
Post a Comment