Wednesday, 23 August 2023

मूलभूत कर्तव्य


■पार्श्वभूमी :

◆ समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याच प्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदारया पार पाडणे अपेक्षित असते.

◆कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्याने अधिकराची प्राप्ती होते,म्हणून आर्य चाणक्य ने कर्तव्याला ' स्वधर्म' म्हटलं आहे.

◆ कर्तव्य म्हणजे नीतिमत्ता व कायदा यांच्याद्वारे व्यक्तीवर एखादी कृती करणे वा न करणे ह्या संबंधी टाकलेले बंधन होय.

◆प्रथमतः मूळ संविधानात मु.कर्तव्यांचा समावेश नव्हता.

◆ घटनादूरूस्थी ४२ वी (१९७६) नूसार भाग-४,कलम-५१ (क) मध्ये १० मूलभूत करव्ये समवीष्ट करण्यात आली. 

◆८६ वी घटना दूरस्ती (२००२)-११ वे करव्ये समाविष्ट 

◆मूलभूत कर्तव्ये - स्वीकार - सोव्हिएत रशिया

◆ यु.एस. ए,कँनडा,जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशाच्या घटनेमध्ये मु. कर्तव्ये नाहीत.(जपान याला अपवाद)

◆ समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे. 

■सरदार स्वर्ण सिंह समिति-१८

◆आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने ही समिती स्थापन 

◆ शिफारस-मूलभूत करवव्याचे एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करणे.

◆ त्यांनी १० मूलभूत कर्तव्यांची यादी दिली मात्र ८ च कर्तव्यांची शिफारस केली.

★मूलभूत कर्तव्यांची यादी:-

१) संविधांनाचे पालन करणे आणि संविधानातील आदर्श व संस्था ,राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

२) राष्ट्रीय लढ्यात ज्या उदात्त आद

आदर्शामुळे स्फूर्ती मिळाली. त्या आदर्श तत्वांची जोपासना व अनुकरण करणे.

३) भारताचे सार्वभौमत्व ,एकता ,व एकात्मता  यांचा सन्मान करून त्यांचे रक्षण करणे.

४) देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे.

५) धर्म ,भाषा ,प्रदेश ,वर्गभेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व बंधुभाव वाढीस लावणे,स्त्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणें.

६) आपल्या संमिश्र संस्कृती च्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

७) नैसर्गिक पर्यावरण ज्यात अरण्य,सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, सजीव प्राण्यांबाबत भूतदया बाळगणे.

८) विज्ञाननीष्ठ दृष्टीकोण ,मानवतावाद,शोकबुद्धि व सुधारणावाद यांचा विकास करणे.

९) सार्वजनिक संपत्ती चे रक्षण करणे, हिंसाचार चा निग्रहपूवक त्याग करणे.

१०) आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल ,अश्या प्रकारे सर्व व्यतिगत व सामुदायिक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न शील राहणे.

११) 6 ते 14 वरश्यापर्यंत मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे.(२००२ च्या ८६ व्या घटनादुरीस्ती ने जोडण्यात आले)

★मूलभूत कर्तव्यवरील टीका:-

१) संविधानाविषयी दुराग्रह 

२) सर्व समावेशक नाहीत.

३)मोघम तरतुदी 

४) नैतीकतेची जंत्री

५) नागरिकांच्या गुलामीची सनद

६) व्याहरिक गोंधळ

७) चुकीच्या ठिकाणी समावेश- ही कर्तव्य भाग-४ ला जोडण्या ऐवजी भान-३ ला जोडून त्यांना मु.हक्कच्या बरोबरिचा दर्जा देने आवश्यक 

★मूलभूत कर्तव्याचे महत्व:-

●आपल्या ला देश,समाज व इतर नागरिकांप्रति आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव करून देण्याचे कार्य ही कर्तव्य करतात.

● राष्ट्रविरोधी व समाजविरोधी कृत्य करण्याविरुद्ध ही कर्तव्य ताकीद देतात.

● कर्तव्यामुळे शिस्त व जबाबदारी च्या भावनेशी प्रोत्साहन मिळते.

● एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्या साठी न्यायालयास मु.कर्तव्याचा आधार घेत येतो.उदा: 1992-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात निर्णय दिला की,मु.कर्तव्याची अमलबजावणी करणारा कायदा कलम-१४(कायद्यासमोर समानता)व कलम-१९(सहा स्वतंत्र)च्या संदर्भात 'पर्याप्त 'असल्याचे मान्य केले जाऊ शकते.

★इंदिरा गांधींच्या मते:-"मूलभूत कर्तव्याचे नैतीक मूल्य....लोकांना आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून लोकशाही संतुलन प्रस्थापित करेल".

★ मोरारजी देसाई यांच्या जनता पार्टी सरकारने ४३ व्या,४४व्या घटनादुरुस्थि अन्वेये ४२ व्या घटनांदूरस्थिने समवीष्ट केलेल्या अनेक तरतुदी काढून टाकण्याची प्रयत्न केला ,मात्र मूलभूत कर्तव्यांना त्यांनी स्पर्श केला नाही.

★वर्मा समिती (१९९९):-

मु.कर्तव्याच्या अमलबजावणी साठी करण्यात आलेल्या कायद्याच्या तरतुदी ची ओळख केली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...