Sunday, 20 December 2020

भारतीय रेल्वे-महत्वपुर्ण माहिती-

1)  16 एप्रिल 1853 ला  बोरीबंदर ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. भारतभर रेल्वेची 7,500 स्थानके आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील सर्वात व्यस्त स्थानक दिल्ली किंवा मुंबई नसून ते लखनऊ आहे. 



2) दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेला 1999 मध्ये  युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. रेल्वेचे सर्वात जुने इंजिन फेअरी क्वीन आहे. ते 1855 मध्ये वापरात आले आहे.



3) नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी रेल्वे एक्सप्रेस असून सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे गाडी मेतूपालायम-उटी निलगिरी ही आहे. 



4) देशात सर्वाधिक लांबीचा रूट विवेक एक्स्प्रेस ही गाडी पार करते. ती आसाममधील दिब्रुगड पासून कन्याकुमारी पर्यंत 4273 कि.मी.चे अंतर पार करून येते. तर सर्वात छोटा रूट नागपूर-अजनी आहे. हा मार्ग केवळ 3 कि.मी.चा आहे.



5) रेल्वे स्टेशनमधील सर्वात मोठ्या नावाचे स्टेशन चेन्नईतील वेंकटनरसिंहराजुवारिपेटा हे आहे तर सर्वात लहान नावाचे स्टेशन आहे ओरिसातील आयबी व गुजराथेतील ओडी. 



6) तिरूअनंतपुरम निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला फक्त दोन थांबे आहेत व हे अंतर आहे 528 कि.मी. तर अमृतसर हावडा एक्स्प्रेसला तब्बल 115 थांबे आहेत.



7) गुवाहाटी तिरूअनंतपुरम ही दीर्घ अंतर तोडणारी रेल्वे नेहमीच 10 ते 12 तास लेट असते. तिच्या नियमित प्रवासाची वेळ 65 तास 5 मिनिटे आहे. 



8) रेल्वेमार्गावरील सर्वात मोठा बोगदा पीर पंजाल हा असून तो 11.215 कि.मी. लांबीचा आहे. 2012 मध्ये तो जम्मू काश्मीर मार्गावर बांधला गेला आहे. 



9) रेल्वेचा सर्वाधिक उंचीवरचा पूल चिनाब नदीवर 1180 फुटांवर बांधला गेला असून ही उंची कुतुबमिनारच्या पाचपट आहे. 



10) सर्वाधिक लांबीचा प्लॅटफॉर्म गोरखपूर येथे असून तो 1.35 कि.मी. लांबीचा आहे.                      



11)भारतातील पहिली मोनोरेल चेंबूर ते वडाळा(मुंबई )दरम्यान धावली ती 2014 मध्ये अंतर 8.8 km.                                        


12)भारतात सध्या रेल्वे विभाग एकुण 17 आहेत त्यापैकी महाराष्ट्रात दोन रेल्वे विभाग आहेत.1.मध्य रेल्वे विभाग-मुंबई सी.एस.एम.टी. 2.पश्चिम रेल्वे विभाग -मुंबई चर्चगेट.                                               


13)भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण 1951 यावर्षी करण्यात आले.     

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...