Sunday, 1 September 2024

महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

No comments:

Post a Comment