Tuesday, 29 December 2020

करोना आर्थिक मदत योजनेवर ट्रम्प यांची स्वाक्षरी


🧩अमेरिकी लोकांना करोना काळात येत असलेल्या अनेक अडचणी पाहून ९०० अब्ज डॉलर्सच्या मदतीचा समावेश असलेले २.३ लाख कोटी डॉलर्सचे खर्च विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यावर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर स्वाक्षरी केली, अन्यथा अमेरिकेवर आर्थिक टाळेबंदीची नामुष्की येण्याचा धोका होता. कारण अनेक सेवांवरचा खर्च सरकारने मंजूर करणे गरजेचे असते अन्यथा त्या ठप्प होऊ शकतात.


🧩टरम्प यांनी सुरुवातीला या विधेयकास मंजुरी देण्यास नकार दिला होता. यातील तरतुदी अपुऱ्या असून हे विधेयक ‘अपमानास्पद’ आहे असे सांगून ते मंजूर करण्यास ट्रम्प यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली होती. ट्रम्प हे २० जानेवारीला व्हाइट हाऊस सोडणार असून त्यांनी अखेर हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर हे विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव होता.


🧩टरम्प यांनी निवेदनात म्हटले आहे, की बेरोजगार लोकांना आर्थिक लाभ मिळावेत तसेच भाडय़ासाठी मदत मिळावी यासाठी आपण हे विधेयक मंजूर करीत आहोत. आमचे हवाई सेवेतील कर्मचारी परत कामावर येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लस वितरणासाठी निधी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...