०१ जानेवारी २०२१

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटी



भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

RRB NTPC Exams -2021 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )

#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा #2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाध...