Friday, 11 December 2020

देशातील सर्वात मोठ्या मद्यनिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला




भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीत हिना नागराजन यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी कंपनीनं याबाबत माहिती दिली. सध्या आनंद कृपालू हे या पदावर कार्यरत आहेत. 


आता आनंद कृपालू यांची जागा या हिना नागराजन या घेणार आहेत. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.


आनंद कृपालू हे २०१४ या कंपनीत रूजू झाले होते. ते युनाटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. हिना नागराजन या १ जुलै २०२१ पासून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रं स्वीकारतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.


हिना नागराजन या सध्या USL ची मूळ कंपनी जियाजिओ मध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...