Wednesday, 8 May 2024

भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती


१) तापी नदी :--

    

-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे. 

--तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो. 

--ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते. 

--पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. 

 

-------------------------------------------------


(२) गोदावरी नदी :--


-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब 

अशी नदी आहे. 

--गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र 

आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व 

बंगालच्या उपसागरास मिळते. 

--प्रवरा,मांजरा,प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. 


---------------------------------------------------


(३)कृष्णा नदी :--


-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे 

उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या समुद्राला मिळते. 

--भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत. 


-------------------------------------------------


(४) गंगा नदी :--


-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची 

नदी आहे. 

--या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. 

--ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेशव बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. 


---------------------------------------------------


(५) सिंधू नदी :--


-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू 

नदीच्या काठीच झाला. 

--ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. --ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...