२८ डिसेंबर २०२०

महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर.

🔰 राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने, म्हणजेच ‘एनसीआरबी’नं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.


🔰 ‘एनसीआरबी’ने मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे.


🔰 राजधानी दिल्लीत महिला अत्याचाराचे 12 हजार 92 गुन्हे नोंदले गेले तर मुंबईत 6 हजार 519 गुन्ह्यांची नोंद झाली. नागपूरमध्ये अशा गुन्ह्यांची 1 हजार 144 प्रकरणे नोंदली गेली.


🔰 नागपूरमधील गुन्हेगारीचा दर मुंबईपेक्षाही अधिक असल्याचं दिसून आले आहे.


🔰 एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण 13.7 % इतके असल्याचं अहवालात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...