Thursday, 13 June 2024

आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये

🔻- लक्षणे 


१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.


२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.

उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.


३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे  आदिवासी समुह आहेत.


४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.


५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.


६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.


७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.


८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.


९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.

=========

आदिवासी समुह वैशिष्ट्य


१) विशिष्ट भूप्रदेश

   एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते. 

उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि. 

कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात. 


२) समूहाचा आकार

   आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.


३) रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह

   आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात. 


४)  विवाहपद्धती 

   विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.


५)  कुटुंबपद्धती 

   या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.


६)  आर्थिक स्थिती 

   आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात. 

उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.


७)   धर्म व जादूचा प्रभाव 

   आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.


८)  शिक्षण व मनोरंजनाची साधने 

   दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नकला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.


९)  स्त्रियांचा दर्जा

   आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.


१०)  जीवनपद्धती

   आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.

============================================



No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...