Sunday, 27 December 2020

केरळमध्ये देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ उभारले जाणार



यूएन विमेन या संघटनेच्या मदतीने देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ याची स्थापना करण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे.

‘जेंडर डेटा हब’ म्हणजे यूएन विमेन या संघटनेच्यावतीने महिला सशक्तीकरणासाठी चालविले जाणारे उपक्रम राबविण्यासाठी उपलब्ध असलेले स्थायी ठिकाण होय.


‘जेंडर डेटा हब’चे कार्यक्षेत्र दक्षिण आशिया पुरता निश्चित केले गेले आहे. म्हणजेच त्याठिकाणी दक्षिण आशियातल्या महिलांसाठीच्या जेंडर पार्कसाठी क्षमता-निर्मिती आणि प्रकल्प विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची रचना केली जाणार.


केरळमध्ये स्त्री-पुरुष समानता आणि सशक्तीकरणाच्या दिशेने कार्य करण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने 2013 साली जेंडर पार्कची स्थापना करण्यात आली.


ते संशोधन, धोरण विश्लेषण, क्षमता विकास, पुरस्कार, सामाजिक आणि आर्थिक उपक्रम राबविण्याचे एक व्यासपीठ आहे.

ते स्त्री-पुरुष समानतेसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यामध्ये मदत करण्यास संबंधित हस्तक्षेप तयार करण्यासाठी कार्य करते.


‘युनायटेड नेशन्स एंटिटी फॉर जेंडर इक्वलिटी अँड द एम्पोवेरमेंट ऑफ विमेन’ किंवा ‘यूएन विमेन’ ही जागतिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एकी संघटना आहे. त्याची स्थापना 2 जुलै 2010 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...